Skip to main content

विष्णुगुप्त - १

लेखक पुष्कर यांनी मंगळवार, 18/12/2007 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळची सूर्याची कोवळी किरणं डोळ्यांवर येण्यापूर्वीच विष्णु झोपेतून जागा झाला. अजून सूर्योदय व्हायचा होता, तरी थोडासा उजेड होता. समोरच्या रस्त्यावर फार काही वर्दळ नव्हती. गवळ्यांचे पाय गोरसदोहनाकरिता गोठ्याकडे वळले होते. काही गृहिणी कमरेवर घागर घेऊन पाण्यासाठी सिंधूतीरावर निघाल्या होत्या. काही नागरिक सूर्यदर्शनाकरिता घराबाहेर पडले होते. कोंबड्याच्या आरवण्याखेरीज इतर पक्ष्यांनीही आपल्या कूजनाने सूर्योदयाची चाहूल दिली होती. त्या थोड्याश्या नीळसर तांबूस प्रकाशानेही रात्री चमकणार्‍या तारामंडलांना आकाशातून नाहीसं करून टाकलं होतं.

बालचित्रवाणी, संस्कार, गोट्या आणि असेच काही

लेखक ॐकार यांनी मंगळवार, 18/12/2007 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
मुलामुलांचीऽऽऽ मजेमजेचीऽऽऽ बालचित्रवाणी फुले पाखरे आनंदाने , आनंदाऽऽनेऽऽ फुले पाखरे आनंदाने गाती गंमत गाऽणीऽ बालचित्रवाणीऽऽ , बालचित्रवाणी तात्यांचा लेख वाचून मी ही जुन्या काळात रमलो आणि आठवण आली ती बालचित्रवाणीची. त्यातल्या गाण्यांची, छोट्या छोट्या कार्यक्रमांची. अगदी पाण्याचे उपयोग, फळे-भाज्या यांतील जीवनस्त्त्वे यांची उजळणी करणारे छोटे छोटे प्रसंग ते दात स्वच्छ ठेवण्याबाबत दाखवली जाणारी "शीऽऽऽ, दात किती किडलेत हिचे' ही ओळ आठवून देणारी छोट्या मुलीची आणि सोबत तिच्या बाहुलीची प्रतिमा; अशी असंख्य क्षणचित्रं डोळ्यासमोर तरळली. त्याचसोबत 'किलबिल किलबिल पक्षी बोलती....

नेमेची येतो मग संकल्प

लेखक देवदत्त यांनी मंगळवार, 18/12/2007 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
नेमेची येतो मग पावसाळा प्रमाणे, नेमेची येते नवीन वर्ष आणि नेमेची येतो नवीन वर्षाचा संकल्प. १५ दिवसांनी नवीन वर्ष सुरू होणार. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासोबतच बहुतेक जण प्रश्न विचारणार," मग नवीन वर्षाचा काय संकल्प केलास?" आता काय म्हणावे. दरवर्षीच सुरूवातीला ठरवतो की हे करणार, ते करणार. पण ते अमलात आणणे नीटसे जमत नाही. आहे, त्यात आळस हा भाग आहेच. परंतु काही वेळा वाटते, एवढे काय आपल्याला करायचे असते की जे इतके वर्ष आपण करावयाचे ठरवतो आणि मग करत नाही. सगळे नेहमीचेच. हो, जर मी ठरविले की दररोज सकाळी लवकर उठायची सवय लावीन, तर प्रयत्न करू शकतो.

आपण यांना पाहिलंय का?

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 18/12/2007 01:57 या दिवशी प्रकाशित केले.
मलाही तात्यांचा लेख वाचून तीच भावना पद्यात मांडणारी माझीच एक कविता आठवली. तात्या, हि सुद्धा तशी शिळीच कविता! पण आठवली म्हणून इथे देतोय.. आपण यांना पाहिलंय का? ********* अजुनही आठवतय,आईचं बोट धरून रोज शाळेत जाणं.. तिचं लक्ष नसतानाही हजार शंका विचारणं... जगातल्या प्रत्येक गोष्टीकडे कुतुहलाने पहाण... माझ्या ह्या अहर्निश बडबडीला आता ग्रहण लागलय का? रोजच्या धावपळीत माझी निरागसता हरवली आहे... आपण यांना पाहिलंय का?? चिंब पावसात भिजुन..
Taxonomy upgrade extras

समभागांची चर्चा..

लेखक संजय अभ्यंकर यांनी सोमवार, 17/12/2007 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार संजय अभ्यंकर साहेब, तात्या, जे.पी. असोसिएट्स, का कोसळ्ला? तो कितीने स्प्लीट होतोय? संजय अभ्यंकर आपल्या वरील प्रश्नाबद्दल धन्यवाद. परंतु केवळ एका कंपनीच्या समभागाकरता स्वतंत्र चर्चाविषय नको असे वाटले म्हणून सर्वच कंपन्यांच्या समभागाकरता हा सामाईक चर्चाविषय आम्ही इथे सुरू करत आहोत. म्हणजे इतरही कुणाला अन्य एखाद्या कंपनीच्या समभागाबद्दल इथे लिहिता येईल किंवा काही विचारता येईल, त्याबाबत चर्चा करता येईल. असो, आता आपल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.. आमच्या माहितीप्रमाणे जे पी असो. हा कोसळला नसून स्प्लीट झाला आहे.

खूप काही हरवलं आहे!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 17/12/2007 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आज बर्‍याच दिवसांनी सुमन कल्याणपुरांचं एक भावगीत कानी पडलं आणि मी खूप वर्ष मागे गेलो. कुठलं होतं ते भावगीत? 'केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर!' अगदी साधंसुधंच परंतु हृदयाला हात घालणारं असं हे भावगीत! पूर्वी आकाशावाणी मुंबई 'ब' नांवाचा एक प्रकार होता. त्यावर कामगारविश्व, आपली गाणी, इत्यादी कार्यक्रमात अशी भावगीतं लागायची हे मला आठवतंय. खूप सुख वाटायचं ही गाणी ऐकताना. साधारणपणे ८०-८५ चा तो काळ असेल! किंवा त्याही आधीचा. साधारणपणे ७५ ते ८५ चं दशक असावं. तेव्हा दूरदर्शनचं आगमन झालं होतं. पण आकाशवाणी मुंबई 'ब' चा तेव्हा बराच प्रभाव होता एवढं मला आठवतंय.

समुद्रपक्षी

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 17/12/2007 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
Richard Bach च्या 'जोनाथन लिंग्विस्टन सी गल ' चे मुक्त/स्वैर रुपांतरः आहे मी एक समुद्रपक्षी, माहित आहेत मर्यादा,माझ्या मला...पण, मर्यादा आणि आकांक्षा,प्रमाण आहे व्यस्त उंच आकाशात भरारी घ्यायची आहे मला मस्त! कार्वर म्हणतो, Start where you are, with what you have make Something of it Never be satisfied! मग मी का नाही जायचं,उंच उंच आकाशात? माझे दोन चिमुकले पंख, पेलतील ना हे शिवधनुष्य! आणि,होईल त्याचंच इंद्रधनुष्य,सप्तरंगी! कारण,जोडीला माझी जिद्द आहे, आहे आकांक्षा आणि माझी इच्छाशक्ती, माझी मनोदेवता,माझा आतला आवाज! नाह
Taxonomy upgrade extras

चारोळी

लेखक सुशील यांनी सोमवार, 17/12/2007 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या प्रेमासाठी झालो दिवाणा तझ्या नकाराने होइन का शहाणा? -सुशील

विजय दिन

लेखक गुंडोपंत यांनी सोमवार, 17/12/2007 06:05 या दिवशी प्रकाशित केले.
भारताने सोळा डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता. हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. या युद्धात आपले प्राण पणाला लावून विजय खेचून आणणार्‍या सर्व सैनिकांना मिसळपावातर्फे मानाचा मुजरा. हे युद्ध ३ डिसेंबर ला सुरु होवून १६ ला संपले. बांग्लादेशातील नागरीकांना व बांगलामुक्ती वाहिनीला भारताने मदत करू नये यासाठी, याह्याखानाने हवाई दलाला आदेश देवून रॅ‍पीड ऍक्शन द्वारे भारताची कुरापत काढली व भारतीय हद्दीत ३५० किमी आग्र्या जवळ येवून भारतीय धावपट्यांवर बाँब टाकून त्या निकामी केल्या.

एडीपस आणि कूटप्रश्न

लेखक धनंजय यांनी सोमवार, 17/12/2007 01:37 या दिवशी प्रकाशित केले.
एडीपस आणि कूटप्रश्न "प्रभाते चतुष्पाद, मध्ये उभा जो, दिसा शेवटी तीन पायी भ्रमे तो, किती रे विकारी असे बंधु माझा..." चिरंजीव ती स्फिंक्स हेरी तयाला. कधी एक माणूस त्या ठायि आला उखाण्यात पाहे जणू आरशाला स्वतःलाच जाणून कोड्यात साचा - स्वतःच्या विकारा, स्वतःच्या गतीला "असू तुल्य सारेच एडीपसाशी विलंबीत काळात त्या श्वापदाशी; भविष्यात होऊ, नि भूतात होतो..." असे ज्ञान झाल्यास गात्रांस गाळू! "न हो हे..." म्हणे देव मोठा कृपाळू विकारक्रमाने स्मृतिभ्रंश देतो.
मूळ कवी : होर्हे लुईस बोर्हेस, मूळ भाषा : स्पॅनिश (एडीपस याबाबत बहुतेक लोकांना हा तपशील म
Taxonomy upgrade extras