विजय दिन
भारताने सोळा डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता.
हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. या युद्धात आपले प्राण पणाला लावून विजय खेचून आणणार्या सर्व सैनिकांना मिसळपावातर्फे मानाचा मुजरा.
हे युद्ध ३ डिसेंबर ला सुरु होवून १६ ला संपले.
बांग्लादेशातील नागरीकांना व बांगलामुक्ती वाहिनीला भारताने मदत करू नये यासाठी, याह्याखानाने हवाई दलाला आदेश देवून रॅपीड ऍक्शन द्वारे भारताची कुरापत काढली व भारतीय हद्दीत ३५० किमी आग्र्या जवळ येवून भारतीय धावपट्यांवर बाँब टाकून त्या निकामी केल्या. अवघ्या काही तासांच्या अवधीत भारतीय लष्कराने त्या धावपट्ट्या पुर्ववत करून हवाई हल्ल्याची तयारी केली.
भारताला गुंतवून,ठेवण्यासाठी, त्याच वेळी पाकिस्तान ने पाकिस्तान सीमेवरही हल्लाबोल केले. याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने पाकिस्तानचा १४०००(?) किमी प्रदेश ताब्यात घेतला. (हा प्रदेश १९७२ च्या शिमला करारात चक्क फुकटात परत केला गेला!). पुढे भारताने आपले डावपेच जास्त प्रखर करून समुद्र मार्गेही पाकिस्तानची नाकेबंदी केली. दोन पाकिस्तानी डिस्ट्रॉयर्स बुडवून, भारतीय नौदलाने कराची बंदरात पाकिस्तानला नामोहरम केले.
पाकिस्तानच्या बांग्लादेशातल्या हवाई विभागावर हवाई हल्ले करून पाकिस्तानी हवाई दल उध्वस्त केले गेले. अशा रीतीने भारताने एक बलशाली सत्ता व अभेद्य हवाईदल हा नावलौकीक स्थापन केला. पाकिस्तानने युद्धात शरणागती पत्करली व युद्ध थांबले.
या युद्धाआधी इंदिरा गांधींनी युरोप चा दौरा केला व ब्रिटन व फ्रांस यांच्या सहीत जागतिक मत भारताकडे वळवले. त्याच वेळी रशिया बरोबर करार करून दडपण आणून चीनलाही या युद्धापासून दूर ठेवण्यात यश मिळवले.
पाकिस्तानी सैन्याने या युद्धात बांगलादेशीयांवर अन्वनित अत्याचार कनित. याच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत.
या ह्यायाखानाचे पुढे काय झाले? कुणी सांगु शकेल का?
या युद्धावर आधारीत असलेली मराठी पुस्तके, लेख कोणती याची यादी कुणी देईल का?
तसेच पाकिस्तान बरोबरच्या या युद्धात गाजलेले शौर्याचे प्रसंग तसेच उल्लेखनिय गोष्टी सदस्यांनी येथे द्याव्यात व या गौरवशाली आठवणी जागृत कराव्यात ही विनंती.
जय हिंद!
आपला
गुंडोपंत
(ही चर्चा व्यक्तिगत नसून देशभक्तीपर आहे. माननिय सदस्य, इतर चर्चा येथे घुसडल्या जाणार नाहीत, याचे भान ठेवतील ही अपेक्षा आहे)
वाचने
8605
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
चांगला लेख..
माफ करा..
In reply to माफ करा.. by प्राजु
चालेल सांगा
ह्म्म..
In reply to ह्म्म.. by प्राजु
अरेच्चा!!
१६ डिसेंबर
In reply to १६ डिसेंबर by स्वाती दिनेश
हेच
सोळा डिसेंबर १९७१ ....
विजय दिनाचे अजून एक महात्म्य !!!
In reply to विजय दिनाचे अजून एक महात्म्य !!! by छोटा डॉन
कशाशी काय?
In reply to कशाशी काय? by गुंडोपंत
हेतू फक्त आणि फक्त विनोदच होता ..... माफ करा
In reply to विजय दिनाचे अजून एक महात्म्य !!! by छोटा डॉन
विनोद
माझे विचार
अत्यंत मार्मिक लिखाण
मी ऐकलेला किस्सा..