Skip to main content

हिंदी-इंग्रजी चित्रपटांची मराठी नावे

लेखक इनोबा म्हणे यांनी शनिवार, 02/02/2008 02:43 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी किंवा इंग्रजी चित्रपट भाषांतर करुन, त्याचा रिमेक करुन मराठीत प्रदर्शीत करायचा आमचा विचार आहे. आमच्या 'शिमगा प्रॉडक्शनला' अशा पटकथांची गरज आहे. इच्छूक पटकथा लेखकांनी(भट्ट कँप छाप) त्वरीत प्रस्ताव मांडावा. तूर्तास पटकथा सांगायची गरज नाही;केवळ शिर्षक सांगावे. आम्हाला आवडल्यास आम्ही प्रतिसाद देऊ.

निवेदन- नावातील साधर्म्य

लेखक वरदा वैद्य यांनी शुक्रवार, 01/02/2008 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी वरदा वैद्य. मनोगत आणि उपक्रमावर वरदा नावाने माझे सदस्यत्व आहे आणि विज्ञान विषयावर काही प्रमाणात लेखन केले आहे. त्यामुळे मिसळपावावरील वरदा ही मीच असेन असा काही लोकांचा गैरसमज होऊन त्यांनी माझ्याकडे त्याबद्दल विचारणा केली. काहींचा गैरसमज होऊनही त्यांनी विचारणा केली नसेल. वरदा हे तसे सहज आढळणारे नाव नव्हे. तसेच, मिसळपावावरील वरदाप्रमाणे मीही अमेरिकेत राहत असल्यामुळे कोणाचा गैरसमज होणं साहजिक आहे, जरी माझी लेखनशैली येथील वरदाशी मिळतीजुळती नसली तरी. मिसळपावावर माझे सदस्यत्व आजपर्यंत नव्हते.

शिर्डीतून मराठी हद्दपार? म.टा.तील लेख.

लेखक शरुबाबा यांनी शुक्रवार, 01/02/2008 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेला हा लेख . शिर्डीतून मराठी हद्दपार? शिर्डी महाराष्ट्रातच आहे का याची शका यावी अशा तामिळ, इंग्रजी पाट्या येथे बहुसंख्य दुकानांवर दिसतात. रुम चाहिए ? मंदिर के पासही लॉज है। दर्शन करोगे ? व्ही . आय . पी . पास भी दिलादुँगा ... लक्झरी , व्होल्वो बसका तिकीट चाहिए ? टॅक्सी भी मिलेगी .....' साईबाबांच्या शिर्डी भूमीत पाऊल टाकताच पदोपदी असे ऐकायला मिळतेच ; पण फुलवाल्यापासून हॉटेल , लॉजींगवाल्यापर्यंत सर्वच व्यावसायिकांच्या पाट्यांकडे नजर टाकल्यास मराठीचे कुठेही दर्शन घडत नाही .

द ग्रेट अन"लॉयल' सर्कस...

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 01/02/2008 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
""बाबा, सर्कसला जाऊया?'' "नको रे...कंटाळा आलाय. शिवाय गावाबाहेर आहे ती. खूप लवकर निघावं लागेल.''" "शी बाबा! तुम्हाला नेहमीच कंटाळा. अहो, बरेच प्राणी असतात त्यात. मला बघायचेत.''" "नको म्हटलं ना! आणि हल्ली मेनकाताईंच्या कृपेनं त्यात कुठलेच प्राणी नसतात. फक्त कुत्री-मांजरी, पोपट-मैना असतात.''" "वाघ, सिंह, हत्ती नसतात?''" "अजिबात नाही!''" "मग...सर्कसमध्ये बघायचं काय?'' "अरे...सांगितलं ना, बघण्यासारखं काहीच नसतं हल्ली''" "पण ते झुल्यावरच्या कसरती, मृत्युगोल, गाड्यांच्या कसरती तरी असतातच की!''" "तू अगदी हट्टी आहेस बघ. अगदी आईवर गेलायंस. आपलं बोलणं खरं केल्याशिवाय राहणार नाहीस.

ऑर्गन रसास्वाद! वादन-गप्पा-संवाद...

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 01/02/2008 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, येत्या रविवारी, म्हणजे ३ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता सहयोग मंदिर, घंटाळी ठाणे येथे 'ऑर्गन रसास्वाद! वादन-गप्पा-संवाद...' हा कार्यक्रम ठाण्यातील कलारसिक मंडळ या संस्थेने आयोजित केला आहे. पं. विश्वनाथ कान्हेरे यांचा शिष्य अनंत जोशी (उच्चारी अन्ता जोशी! ;) हा आमचा दोस्त. आमचा अन्ता हा हिंदुस्थानी ख्याल गायनाला संवादिनीची उत्तमपैकी साथसंगत करणारा तरूण पिढीतील एक उमदा कलाकार. 'ऑर्गन रसास्वाद! वादन-गप्पा-संवाद..' या कार्यक्रमाची मूळ संकल्पना ही अन्ताची आहे. ऑर्गन या वाद्यावर आमचेही अत्यंत प्रेम!

झांज..

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 01/02/2008 03:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजू यांची सांज.. ही अप्रतिम कविता वाचून काहि ओळी सुचल्या पंढरीचा ठेका उदरी घेऊन झांज आली चिपळ्या-ढोलकाला साथ देऊन झांज आली गाभार्‍यात पेटलेले निरांजन तेलवातीचे गजरात माऊलीचे समाधान पाहून झांज आली हरीनामाचा गजर आसमंतात भरलेला कृतकृत्य विठ्ठलाला निरखून झांज आली ना संपतो कोलाहल, भोवती गर्दीही लोटलेली गुलाल अबीर बुक्क्यात रंगून झांज आली वारकर्‍यांच्या रिंगणाची, गावास ओढ लागलेली दिंडी पोचली वेशीवरी सांगून झांज आली कृष्णेकाठचा सोहळा पाहूनी शहारली गात्रे बेहोष होऊन वाळवंटी नाचून झांज आली.. -ऋषिकेश
Taxonomy upgrade extras

तू असता तर...!

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 01/02/2008 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रीतीची मौज राजसा फेसाळते किनाऱ्यावर.. हात घेऊनी माझा हाती सजणा, तू असता तर......! सोनेरी रुपेरी रंगांची ही नक्षी उमटे रेतीवर त्या नक्षीमध्ये रंग भरण्या सजणा, तू असता तर......! बघ क्षितिजाला भेटे नभ हे चढली लाली पटलावर लाली ती मम भाळी भरण्या सजणा, तू असता तर......! फिदा लहरी रूपावरी त्या चंद्रमा झळके अवनीवर चांद तो मम मुखी पाहण्या सजणा, तू असता तर......! खर्जातली ऐक गाज त्याची खारा वारा अंगावर कुंतल माझे मुक्त करण्या सजणा, तू असता तर......! - प्राजु. ( मनोगत दिवाळी अंकात ही कविता प्रकाशित झाली होती.)
Taxonomy upgrade extras

सांज..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 01/02/2008 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
संधिकालचे गीत ओठी घेऊन सांज आली अंबराला नवी किनार देऊन सांज आली घरांघरांतून पेटली ती चूल लिंपलेली निरांजनाची ज्योत इवली लाऊन सांज आली गुरे वासरे आणि पाखरे घरी परतलेली अस्ताचलाच्या झळाळीला बिलगून सांज आली संपला कोलाहल अन् चाहूल लोपलेली उदास नूर त्या बाजाराला देऊन सांज आली पाऊलाला घरट्याची त्या ओढ लागलेली वाटेवरती नजर कोणती लावून सांज आली तप्त चेतना, शुष्क ओठ अन् गात्रे थरारली गूज रात्रीचे सांगत वेडी लाजून सांज आली.. - प्राजु
Taxonomy upgrade extras

ताज्या दमाचे गायक!

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 31/01/2008 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
यू-ट्यूबवर मध्यंतरी राहुल देशपांडेचे "बगळ्यांची माळ फुले" ऐकायला मिळाले. फारच सुंदर वाटले. पं.वसंतराव देशपांड्यांचा (भाईकाकांच्या भाषेत "वसंत खाँ!") हा नातू. डोळे मिटून ऐकले तर वसंतरावांच्या आवाजातली झार राहुलच्या आवाजातही सहीसही कळते! देवाचे देणे - आपण फक्त ऐकणे!! चतुरंग

दीदीना भाईकाकांच्या नावचा पुरस्कार!

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 31/01/2008 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
काय मोठा योग आहे, लतादीदींचा सत्कार भाईंच्या नावच्या पुरस्काराने! दीदीही धन्य, पुरस्कारही धन्य आणि ते पाहण्याचे भाग्य मिळालेले त्याहूनही धन्य!! भाईंच्या शेवटच्या दिवसातली दीदीनी सांगितलेली आठवण...भर ऑफिसमधे डोळ्यात पाणी हो! काय व्यक्तिमत्व असेल, जे स्वतःच्या टोकाच्या आजारपणात स्वतःवरच विनोद करु शकते! देवसुद्धा रडला असेल हो भाईकाकांना न्यायला लागलं म्हणून!! बातमी वाचा.