Skip to main content

छातीत निर्भय श्वास दे...

लेखक सृष्टीलावण्या यांनी शनिवार, 16/02/2008 06:42 या दिवशी प्रकाशित केले.
शिवाजी महाराजांच्या युद्धशास्त्रावरील "वेध महामानवाचा" ह्या सुंदर पुस्तकाच्या मलपृष्ठावरची कविता. कवि अज्ञात.

व्हॉट्स राँग विथ यू मि. राज?

लेखक इनोबा म्हणे यांनी शनिवार, 16/02/2008 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्ताच्या राजू परुळेकर यांनी घेतलेली राज ठाकरे यांची मुलाखत. राज यांनी उपस्थीत केलेल्या परप्रांतीयांच्या मुद्दयावरुन मिडीयावाल्यांनी केलेला पक्षपातीपणा,गुंड उत्तर भारतीय आणि त्यांचे गुंड नेते.महाराष्ट्राला मिळणारी सापत्न वागणूक...आणि बरेच काही (कट्टर मराठी) -इनोबा

राम राम !

लेखक लिखाळ यांनी शुक्रवार, 15/02/2008 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी ! आज दोन महिन्यांनंतर पुन्हा रुजू होत आहे. तसे ही आम्ही प्रतिसादापुरतेच जास्त असल्याने आपण अभिजात साहित्याला मुकला आहात असे मुळीच नाही. ( स्वतःला, आम्ही असे म्हणवून घ्यायची संधी आम्हाला इतरत्र कुठे मिळत नसल्याने संधीचा भरपूर उपयोग आम्ही इथे करत असतो. हे सांगणे न लगे :) तर काय ! आज इथे येवून पुन्हा लिहायला सुरुवात केल्यावर आनंद झाला आहे. पुन्हा सर्वांच्या गाठी-भेटी होतील. खरडवह्यांतून महत्वाच्या माहितीची आदानप्रदान होईल असा विचार करता मन कसे प्रफुल्लीत झाले आहे.

ही नेहमीचीच हो माझी रामकहाणी...

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 15/02/2008 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता मी दुःख विसरण्यासाठी गातो गाणी... ................................................... ही नेहमीचीच हो माझी रामकहाणी...! ................................................... ही नेहमीचीच हो माझी रामकहाणी तोंडाचे माझ्या बघा पळाले पाणी ! ओढून इथे मज तिने आणले होते कोणी न तिथे हे,नीट जाणले होते... आहेच सखीही माझी खूप शहाणी ! काळोखच होता खरा...

कोणी भारत दर्शन केलं आहे का??

लेखक बुध्दू बैल यांनी शुक्रवार, 15/02/2008 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सुट्ट्या मिळाल्या की बॅगा भरून गावाला पळतो; नाहीतर केसरी टुर्स किंवा सचिन ट्रॅव्हल्सबरोबर कुठेतरी फिरून येतो. त्यामुळे आपलं बरचसं भारत दर्शन झालेलं असतं. आपण सर्व कुठेतरी जाऊन आला आहात. त्यामुळे आपले अनुभव मिपाच्या सदस्यांबरोबर 'शेअर' करून बघा. मग बघाच, संपूर्ण भारत-दर्शन मिपावर घडेल की नाही ते. माझे अनुभव तसा मी ब-याच ठिकाणी जाऊन आलो आहे. पण मसूरी बद्दलच्या काही ताज्या आठवणी आहेत, त्या शेअर करतोय, मसूरीला केसरीच्या संगतीत गेलो होतो. तशी आमच्याबरोबर आलेली जवळ जवळ सर्व प्रवासीमंडळी जरा जास्त 'प्रौढ' होती. तरी तिथल्या थंडगार वातावरणात मन रमून गेलं.

झोप २

लेखक बुध्दू बैल यांनी शुक्रवार, 15/02/2008 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
वडापावरावांच्या(आधीचे पाणीपुरी) झोप ह्या कवितेमुळे खडबडून जागा झालो व उत्साहाच्या भरात कविता सुचत गेली स्वप्ननगरीत माझ्या मी सोन्याने न्हाऊन निघालो आईने पाणी शिंपडल्यावर खडबडूनि जागा झालो स्वप्ननगरीत माझ्या ताकाचे प्याले मी प्यालो जरा जास्तच प्यायल्यामुळे खडबडूनि जागा झालो जिंकूनि क्रिकेट वर्ल्डकप मी माझ्या मायदेशी आलो मॅच हरल्याच्या बोंबा ऐकून खडबडूनि जागा झालो जेव्हा खरोखर जाग आली तेव्हा कळले झोपेत होतो आई म्हणाली मला माझी मी झोपेत बडबडत होतो -(सूर्यवंशी) बुध्दू बैल
Taxonomy upgrade extras

काव्यशास्त्रविनोद:। (काव्यशास्त्राद्वारे विनोद)

लेखक सृष्टीलावण्या यांनी शुक्रवार, 15/02/2008 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
चितां प्रज्वलितां दृष्ट्वा वैद्य: विस्मयम् आगत: । नाहं गतो न मे भ्राता कस्य इदं हस्तलाघवम् ।। भावार्थ -चितेला जळताना पाहून वैद्यबुवांना आश्चर्य वाटले, ते मनांत म्हणाले, ह्या व्यक्तिवर उपचार करायला मी सुद्धा गेलो नव्हतो आणि माझा भाऊ पण. मग कोणाचे बरे हे हस्तकौशल्य?

म्हशी

लेखक सृष्टीलावण्या यांनी शुक्रवार, 15/02/2008 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
एका ठिकाणी यज्ञविधी चालू असतो. पुरोहित पूजा सांगत असतात. त्याचवेळी तिथे अचानक दुसरा एक ब्राह्मण उपस्थित होतो. पूजा सांगता सांगताच पुरोहित त्या ब्राह्मणाला म्हणतो, अस्य मूर्खस्य यागस्य दक्षिणा महिषीशतम् । त्वया अर्धं च मया अर्धं विघ्नं मा कुरु पण्डित ।। ह्या मूर्खाच्या यज्ञात १०० म्हशी दक्षिणा म्हणून आहेत, तू अर्ध्या घे, मी अर्ध्या घेतो, (पण म्हशी दान केल्याने पुण्य नसते असे सांगून) हे पण्डिता ह्या यज्ञात विघ्न आणू नकोस.