Skip to main content

काव्यशास्त्रविनोद:। (काव्यशास्त्राद्वारे विनोद)

लेखक सृष्टीलावण्या यांनी शुक्रवार, 15/02/2008 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
चितां प्रज्वलितां दृष्ट्वा वैद्य: विस्मयम् आगत: । नाहं गतो न मे भ्राता कस्य इदं हस्तलाघवम् ।। भावार्थ -चितेला जळताना पाहून वैद्यबुवांना आश्चर्य वाटले, ते मनांत म्हणाले, ह्या व्यक्तिवर उपचार करायला मी सुद्धा गेलो नव्हतो आणि माझा भाऊ पण. मग कोणाचे बरे हे हस्तकौशल्य?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 14553
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

काही कळ्ळं नाही....

In reply to by वरदा

वरदाबाई,भावार्थ सांगून सुद्धा तुम्हाला कसं 'कळ्ळं' नाही हेच मला कळ्ळं नाही.(ह.घ्या.) बाकी विनोद छान आहे...चालू द्या...

In reply to by वरदा

@काही कळ्ळं नाही.... वरदाताई, ही तर माझ्यासारख्या व्यावसायिक भाषांतरकारासाठी नामुष्कीची बाब आहे. असे केले तर, तुम्ही जवळपासच्या डॉक्टरांना ह्याचा अर्थ विचारा अर्थात त्यांची मनस्थिती (mood) चांगली आहे का हे पाहूनच.

In reply to by वरदा

वरदाशी सहमत आहे. खरं सांगायचं तर मलाही काही कळलं नाही! हा विनोद होता का? तात्या.

In reply to by वरदा

हा हा हा हा हा, छान छान. अशीच सुभाषिते येऊ द्या. आपला, (गीर्वाणप्रेमी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

>>वरदाबाई,भावार्थ सांगून सुद्धा तुम्हाला कसं 'कळ्ळं' नाही हेच मला कळ्ळं नाही.(ह.घ्या.) तरी बरं की या वरदाबाईंचे आडनाव वैद्य नाही. वैद्यबुवांचे तर्कट आवडले.

छान आहे. वैद्यबुवांची कमालच म्हणायची , इतका विश्वास स्वतःच्या हातच्या गुणा(??)बद्दल! - प्राजु

असे विनोद अजून अनुभवायला मिळाले तर आपल्या चेह-यावर खळीसंगे हास्य फुलतं... व आपण आनंदलो आहोत ह्या जाणीवेनेच समाधान वाटतं... येऊद्यात अजून काही विनोद(भावार्थासकट द्या - आम्हांला काहीच 'कळ्ळे' नाही असे होता कामा नये)

शूलिजातः कदशनवशाद भैक्ष्ययोगात्कपाली वस्राभावाद्गगनवसन स्नेहशून्याज्जटावान इथ्थम राजन्स्तवपरिचयात इश्वरत्त्वमयाप्तम तस्मान्मैह्यम किमिति क्रुपया नार्धचंद्रम ददासि भावार्थ : ( कवी राजाकडे मदत मागत असावा)...( हे राजा बघ माझे कसे हाल झाले आहेत, )अन्न नाही, वस्त्र नाही, तेल नसल्यामुळे केसांच्या जटा झाल्या आहेत्,म्हणजे मी ईश्वरत्त्वालाच पोचलो आहे (मी जणू जटाधारी शंकर झालो आहे)..तर मग हे राजा तू मला ( एकच गोष्ट उरली ती म्हणजे) अर्धचंद्र का देत नाहीस?...( याचा दुसरा अर्थ म्हणजे मला हाकलून का देत नाहीस?) अवांतर : संस्क्रुत शुद्धलेखन मिष्टेक्ससाठी माफी असावी... बर्‍याच वर्षांनी लिहितोय ...

अवांतर : आता इथे बरेच संस्क्रुत लिहिणार, पण पायमोड्या म कसा लिहायचा?

In reply to by धोंडोपंत

धोंडोपंत, मला वाटते त्याना पाय मोड्या म म्हणजे अर्धा म म्हणायचे असावे. ----------- [अंदाज बांधणारा केशवराव. ]

पायमोड्या म आणि इतर मराठी टंकलेखनासाठी माझ्यामते http://www.chhahari.com/unicode/ सगळ्यात सोपे आणि उपयोगकर्ता मित्रत्वाचे (user friendly) आहे.

सुंदर, मनोहारी, चित्तवेधक....

वैद्य राज नमस्तुभ्यम यमराज सहोदरः. एकः हरति प्राणं अपरः प्राणानि धनानि च.. समजायला सोपे आहे असे मला वाटते नाना

पुरा कवीनाम् गणनाप्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यापितत्तुल्यकवेरभावात् अनामिका सार्थवती बभूव भावार्थ : पूर्वी एकदा कवींची गणना करताना ( करंगळीपासून मोजणी सुरू केली) प्रथम स्थान कालिदासाला दिले गेले. पण अजूनही कालिदासाच्या तुलनेचा कवी नसल्यामुळे ( शेजारील बोटाचे )अनामिका हे नाव सार्थ झाले.

हे अगदी फ़ेमस आहे... इतरपापफ़लानि यथेच्छया विलिख तानि सहे चतुरानन अरसिकेषु कवित्त्वनिवेदनम् शिरसि मा लिख मा लिख मा लिख भावार्थ : हे ब्रह्मदेवा, ( माझ्या नशिबात) बाकी काहीही वाईट लिही , ते मी सहन करेन पण अरसिक माणसाला कवित्त्व शिकवण्याचे काम माझ्या माथी नको लिहूस ,नको लिहूस ,नको लिहूस....

अस्माकम् बदरीचक्रम् युष्माकम् बदरीतरु: बादरायणसंबंधात् यूयम् यूयम् वयम् वयम् भाषांतर : आमच्या ( बैलगाडीचे)बोरीच्या झाडापासून केलेले चाक, तु्मच्या दारात बोरीचे झाड... ( मात्र) बादरायणसंबंधामुळे तुम्ही तुम्ही आहात आणि आम्ही आम्ही आहोत............. भावार्थ : हा प्रवासी बैलगाडीतून आपली फ़ॆमिली घेऊन निघालाय आणि मुक्कामाच्या जागी दूरदूरच्या ओळखी काढून, संबंध जोडून फ़ुकटात मुक्काम करायची आणि पाहुणचार झोडायची कला त्याला चांगली साधली आहे.....म्हणून पहिल्या ओळीत फ़ुकट्या प्रवासी म्हणतो, " आमच्या बैलगाडीचे बोरीच्या झाडापासून केलेले चाक, तु्मच्या दारात बोरीचे झाड...आपला मोठा संबंध आहे"त्यावर तो खमक्या यजमान दुसया ओळीत म्हणतो, "आपल्यात असले ओढून ताणून नातं क्रिएट करू नका , हा असला बादरायणसंबंध आहे आणि तुम्ही तुम्ही आहात आणि आम्ही आम्ही आहोत...थोडक्यात चालू पडा..."

सृष्टीलावण्य, फार मस्त ! विनोदी काव्य आवडले. --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

कमले कमला श्येत्ये हरः श्येत्ये हिमालयौ| हरी: श्येत्ये क्षीरौदधी मन्ये मत्कूण शंकया|| कमळात कमला (लक्ष्मी) वसते (निजते), हर (महादेव) वसतो (निजतो) हिमालयात, हरी वसतो (निजतो) क्षीरसागरात, मला (तर) ढेकणाची शंका (येते).

वरदाबाई,भावार्थ सांगून सुद्धा तुम्हाला कसं 'कळ्ळं' नाही हेच मला कळ्ळं नाही.(ह.घ्या.) अहो हा विनोद आहे असं तुम्हाला वाटलं म्हणजे सगळ्यांनाच वाटेल असं नाही खरं ना? असे केले तर, तुम्ही जवळपासच्या डॉक्टरांना ह्याचा अर्थ विचारा अर्थात त्यांची मनस्थिती (mood) चांगली आहे का हे पाहूनच. गरज नाही वाटत मला...कळ्ळं नाही म्हणजे त्यात कसलाच विनोद वाटला नाही असं म्हणायचं होतं मला... ही तर माझ्यासारख्या व्यावसायिक भाषांतरकारासाठी नामुष्कीची बाब आहे. आता ते तुम्ही बघा बुवा मी प्रामाणिक प्रतिसाद दिला... बाकी सतलज यांचं सुभाषित आवडलं माझी आजी असं काहीसं म्हणंत असल्याचं आठवतंय छान सुभाषित आणि भावार्थही छान दिलाय....आणि मी यांचं सुभाषित आमच्या नववीच्या पुस्तकातलं खुप वर्षांनी वाचून छान वाटंलं.....

तातेन कथितं पुत्र | पत्र लिख ममाज्ञः | न तेन लिखितं पत्र | पितुराज्ञा न लंघिता || बापाने पोराला सांगितले, माझ्या आज्ञेनुसार पत्र लिही. पोराने पत्र लिहिले नाही आणि बापाची आज्ञाही उल्लंघली नाही !! आता हे कसे ? तातेन कथितं पुत्र | पत्र लिख ममाज्ञः | नतेन लिखितं पत्र | पितुराज्ञा न लंघिता || नतेन = नम्रपणाने. टीप : संस्कृत लिखाण हे स्मरणशक्तीच्या आधारे केले आहे. चुका आढळल्यास समजून घ्या आणि शक्य असल्यास सुधारून ध्या, ही विनंती. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.