राम राम !
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी !
आज दोन महिन्यांनंतर पुन्हा रुजू होत आहे.
तसे ही आम्ही प्रतिसादापुरतेच जास्त असल्याने आपण अभिजात साहित्याला मुकला आहात असे मुळीच नाही. ( स्वतःला, आम्ही असे म्हणवून घ्यायची संधी आम्हाला इतरत्र कुठे मिळत नसल्याने संधीचा भरपूर उपयोग आम्ही इथे करत असतो. हे सांगणे न लगे :)
तर काय ! आज इथे येवून पुन्हा लिहायला सुरुवात केल्यावर आनंद झाला आहे. पुन्हा सर्वांच्या गाठी-भेटी होतील. खरडवह्यांतून महत्वाच्या माहितीची आदानप्रदान होईल असा विचार करता मन कसे प्रफुल्लीत झाले आहे. (आम्ही आताशा ललित लेख फारसे वाचत नसूनही पूर्व स्मृती जाग्या असल्याने डबक्यावर शेवाळ्या सारख्या साठलेल्या* शब्दातील काही शब्द आम्ही सुद्धा खिशात बाळगून असतो ! ) [*पुल सखाराम गटणे]
आमचा इथला वावर मुख्यत्वे (कोणी विचारले नसताना सुद्धा हे सांगणे म्हणजे आगाउपणा. पण आपण विचारलेच नाही तर मग कळफलक बडवायची संधी जाणार म्हणून हा प्रपंच :) हा... तर आमचा वावर मुख्यत्वे करमणूक, गप्पा-टप्पा यासाठीच असतो. अहो ! मराठी भाषेच्या अभिवृद्धी साठी वगैरे आम्ही येथे वावरतो असे म्हणणे, म्हणजे सकाळी पाण्यासाठी दोन तास रांगेत उभे राहून शिळोप्याच्या गप्पा मारल्यावर, जागतिक पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सभा आयोजित केली होती असे म्हणण्यापैकी आहे. तर काय की मौजमजा, विरंगुळा ही सदरे आमच्या आवडीची.
तर मंडळी ! आपण सर्व कशी आहात?
आपलाच,
-- लिखाळ.
वाचन
3553
प्रतिक्रिया
0