Skip to main content

ही नेहमीचीच हो माझी रामकहाणी...

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 15/02/2008 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता मी दुःख विसरण्यासाठी गातो गाणी... ................................................... ही नेहमीचीच हो माझी रामकहाणी...! ................................................... ही नेहमीचीच हो माझी रामकहाणी तोंडाचे माझ्या बघा पळाले पाणी ! ओढून इथे मज तिने आणले होते कोणी न तिथे हे,नीट जाणले होते... आहेच सखीही माझी खूप शहाणी ! काळोखच होता खरा... सोबती माझा तो एकच जिवलग...बरा सोबती माझा त्यालाच कळे ही अमुची प्रेमकहाणी! एकांत कधीही सरळ मिळाला नाही... तडमडे नेमका बाप तिचा तेव्हाही मज कधी न लाभे, संधी गोजीरवाणी ! साधीच अपेक्षा...पूर्ण कुठे पण झाली ? पदरात धुलाई...फक्त धुलाई आली... मी व्यर्थ याचना केली केविलवाणी ! चोपून काढला इतका मज मेल्याने लाथा बुक्या आणिक हो जोड्याने तो नसतो मेला कधीच हा अनवाणी ! आकांत हा मी जरी किती ही केला ... ह्या देहाचा बघ पुरा...खुळखुला झाला वेदना-वाजते आहे सर्व ठिकाणी! ही कशी लपावी कथा आज हो माझी वेशीवर गेली व्यथा टांगली माझी परक्यांना ही कळली सर्व कहाणी ही नेहमीचीच हो माझी रामकहाणी...! ................................................... - केशवसुमार ................................................... रचनाकाल ः १४ व १५ फेब्रुवारी २००८
लेखनविषय:

वाचने 3616
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

आणि लय हे प्रशंसनीय. त्यामुळे चित्रमय विडंबन मस्तच झाले आहे; बाकी नेहमीचेच. (नेहमीचाच)बेसनलाडू

तडमडे नेमका बाप तिचा तेव्हाही मज कधी न लाभे, संधी गोजीरवाणी ! केशवा, मस्त रे... :) चोपून काढला इतका मज मेल्याने लाथा बुक्या आणिक हो जोड्याने तो नसतो मेला कधीच हा अनवाणी ! हे पण मस्त! :) तात्या.

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार केशवसुमार

ग्रेट. मज्जा आली. ह्या देहाचा बघ पुरा...खुळखुला झाला वेदना-वाजते आहे सर्व ठिकाणी! असे छुपे धक्के पण छान आहेत. शब्दांच्या पलीकडे.