Skip to main content

दोन फुल एक हाफ

लेखक तात्या विन्चू यांनी बुधवार, 20/02/2008 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
या रविवारच्या लोकसत्ता मध्ये चतुरन्ग पुरवणीतील दोन फुल एक हाफ वाचला. लेख मराठी अस्मितेचे राजकारण करणारया राजकीय पक्षाविषयी असुन फारच मार्मीक आहे. मिपा करासाठी त्याची URL येथे देत आहे. (http://www.loksatta.com/daily/20080217/lr05.htm) जरूर आस्वाद घ्यावा व प्रतिक्रिया नोन्दवाव्यात. आपला, ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू

आंबा लस्सी

लेखक राजमुद्रा यांनी बुधवार, 20/02/2008 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : आंब्याचा गर ४ वाट्या, दही १ वाटी, दूध ४ वाट्या, साखर ३ चचमचे, वेलदोडे पूड १/२ चमचा. हे सगळ मिक्सरमध्ये फिरवून फ्रिजमध्ये थंड केली की झाली आंबा लस्सी तय्यार! उन्हाळा जवळ येत आहे, आंबेही येत आहेत. तेव्हा लागा तयारीला :) राजमुद्रा :)

संडे स्पेशल (फालुदा)

लेखक स्वाती राजेश यांनी बुधवार, 20/02/2008 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
फालुदा साहित्यः १/२ कप बारीक शेवया १ ग्लास फिजमधील चिल्ड दुध २ च.पिठी साखर/साधी साखर चवीनुसार ३ च्.सब्जाचे बी/ बासिल बी. १/२ कप पिस्ता आणि बदाम प्रत्येकी.

बाप

लेखक माझी दुनिया यांनी बुधवार, 20/02/2008 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
मला विरोपाद्वारे आलेला हा एका ११ वीतल्या मुलीने लिहिलेला ’बाप’ या विषयावरचा निबंध वाचा

घशाशी

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 20/02/2008 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा बेसनलाडू यांची सुरेख कविता/गझल खर्डेघाशी जिलबीवर जिलबीच्या राशी जेवण झाले, अले घशाशी भले भुकेले राहू आम्ही खाऊ तर खाणार तुपाशी फोडासम सुजलेले शैशव तुलना झाली सदा फुग्याशी जरा बुटांशी खेळुन झाले, 'टॉमी'ने केली बदमाशी! किती पाखरे आली गेली एखादे आलेच गळ्याशी बांधून हे लग्नाचे बंधन "केश्या"ची झालेली काशी हिच्या बरोबर जगणे शिक्षा हीच का मरेस्तोवर फाशी?

कॅलिफोर्निया स्पेशल!!

लेखक पिवळा डांबिस यांनी बुधवार, 20/02/2008 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
आपली स्वतःची ओळख करून देणार्‍या धाग्यामध्ये आम्ही कॅलिफोर्नियाचे रहिवासी असल्याचे म्हटल्यावर आम्हाला नंदन आणि बेसनलाडू यांचे उत्तर आले की ते सुद्धा तिथेच रहातात. तेंव्हा एक कल्पना सुचली की कॅलिफोर्नियात रहाणारे किती मि.पा मेंबर आहेत त्याचा अंदाज घ्यावा... तर मि. पा. करांनो, जर तुम्ही सध्या कॅलिफोर्नियात वास्तव्य करीत असाल तर कृपया प्रतिसाद द्या... पुरेसे मेंबर जमले तर आपण मि. पा.

शिळा सप्तमी

लेखक सृष्टीलावण्या यांनी बुधवार, 20/02/2008 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे एकत्र मोठ्या कुटुंबामुळे सुरुवातीला शिळं उरणे हा प्रश्न नव्हता तसेच अ-तिथी (तिथी न ठरवून अचानक येणार्‍या पाहुण्यांची) कमी नव्हती पण कालौघात कुटुंबाचे विघटन झाले आणि शिळ्याचा प्रश्न उभा राहिला. शिळ्या भाताचा शक्यतो लसणाच्या फोडणीचा किंवा कांद्याच्या फोडणीचा भात व्हायचा पण सर्वांत जास्त वेळा व्हायचा तेल, तिखट, मीठ भात. कृति - भातात सढळ हाताने तेल घालावे. त्यात लाल तिखट भुकटी / उसळी मिरची (ताजी, ठसका लावणारी असेल तर प्राधान्य), मीठ, पावभाजीसाठी करतो तसा बारीक चिरलेला कांदा आणि दाण्याचे कुट आवडीनुसार घालून भात नीट मिसळून घ्यावा आणि वेळ न घालवता खावा.

तोंड लोकांचे

लेखक ऋषिकेश यांनी बुधवार, 20/02/2008 06:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसाद यांच्या गुंड लोकांचे या सुंदर कवितेपासून स्फुर्ती घेऊन हा प्रयत्न. तहानेने सुकत गेले तोंड लोकांचे भाषणाने फक्त चाले तोंड लोकांचे चतकोर भाकरी हि गुंतवी आशा आश्वासने केवळ पुसती तोंड लोकांचे! दुथडी भरून वाहे येथली कृष्णा कोरडेच उरले मराठी तोंड लोकांचे... दंगल बाहेर नि असती घरात हत्यारे दत्त आडनावच उजळी तोंड लोकांचे जरी मंचावर घालती गळ्यात हे गळे मुखवट्या आड दडले तोंड लोकांचे दोस्तहो तलवार नाही, लेखण्या परजा लेखणी नक्कीच फोडे तोंड लोकांचे... -ऋषिकेश
Taxonomy upgrade extras

माकडाची जात याची, मूढ कुठला केशवा

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 20/02/2008 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा प्रसाद यांची अप्रतिम गझल नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी आणि खोडसाळ यांचे तितकेच अप्रतिम विडंबन नोकरांना खाज सुटली, घर्म फुटला शेटजी माकडाची जात याची, मूढ कुठला केशवा जो तुम्हाला वाटला तो हा न इथला केशवा!