Skip to main content

पावाच्या पांचशे पंचावन्न पौष्टिक पदार्थांची पाककृती

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 25/02/2008 22:55 या दिवशी प्रकाशित केले.

मिसळपाव डॉट कॉमचा सदस्य झाल्यापासून खाद्यसंस्कृतीबद्दल मला जास्तच आस्था वाटायला लागली आहे. त्यावर निर्माण होत असलेल्या अनमोल साहित्यात आपणही अल्पशी भर घालावी असे वाटल्यामुळे हा लेख लिहिला आहे. वेळ वाचवण्यासाठी 'गागरमें सागर' म्हणतात ना तसे पांचशे पंचावन्न पदार्थ एका पोटळीत बांधून सादर करायचे ठरवले आहे.

Taxonomy upgrade extras

सूर्यास्त ३ - (उडता/ बुडता)

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 25/02/2008 19:03 या दिवशी प्रकाशित केले.

तो अजस्त्र पक्षी उंचावरची निळाई सोडुन अलगद ढगांच्या दुलईत शिरला तेव्हाच लक्षात आले की उतरायची वेळ जवळ आली. मस्तपैकी जांभई देत जरा आखडलेले अंग ताणले आणि मांडीवरचा कॅमेरा सटकता सटकता वाचला. संध्याकाळ होत आली होती. कॅमेरा हाती लागताच विचार चमकला, चला संधी मिळाली तर आज उडता सूर्यास्त टिपावा! मी कॅमेरा सज्ज करुन ढग पार व्हायची आतुरतेने वाट पाहु लागलो. मात्र आणखी थोडे खाली येताच भ्रमनिरास झाला. आज मळभ होते, आकाशात ढगांचे राज्य होते. सूर्यनारायण आज दर्शन द्यायला राजी नसावेत. अचानक काळ्या ढगांचा पडदा किंचितसा उसवला आणि झरोक्याला इंद्रधनुष्यी छटा देत सूर्यनारायण हळूच डोकावले आणि परत गायब झाले.

क्रिकेटचं चांगभल

लेखक मोहन यांनी सोमवार, 25/02/2008 17:47 या दिवशी प्रकाशित केले.

गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपेक्षा त्यातल्या  "कोटींची" चर्चा वाचून / पाहून बरेच विचार मनात येताहेत. आयपीएल नामक क्रिकेट-व्यापार आता सूरू झाला आहे. खर पाहिलं तर व्यापार हा समाजाच्या भरभराटीचा निर्द्शक समजला जातो.  नफा कमावण्याचा मुख्यहेतू असुनही, रोजगार निर्मिती, क्षेत्रिय विकास, सामाजीक व पर्यावरणाचा विकास  इत्यादि हेतू  साध्य करायचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवायचे अभिप्रेत असते. 

आयपीएल क्रिकेट-व्यापार काय साध्य करेल ?

क्रिकेटची प्रगती ? -   क्रिकेट तज्ञच या बद्दल साशंक आहेत. आपण काय लिहीणार?

हे शब्द कोठे गेले

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 25/02/2008 16:49 या दिवशी प्रकाशित केले.

मराठी मधे अनेक शब्द वापरले जातात्.त्यातले काही टिकतात्.काही विसरले जातात.

उदा: अंमळ आणि खुश्की हे दोन शब्द कोठे गेले

अंमळ हा जरा/ थोडेसे या अर्थाने वापरला जायचा तो ही दे जरा अंमळ थोडेसे...किंवा मी जरा अंमळ झोपतो थोडसा. अशा प्रकारे वापरात होता. 

हा शब्द कोणत्या भाशेतुन मराठीत आला? त्याचा नक्की अर्थ काय?

खुश्की हा फारशी शब्द्..जमीन(कोरडे ठिकाण) या अर्थाने वापरला जायचा .इतिहासात तुर्कानी इस्तान्बुल शहाराचा ताबा घेतला आणि युरोपियन लोकना भारातात येण्याचा खुश्कीचा मर्ग बन्द झाला.( या एकमेव वाक्याशिवाय हा शब्द मी कोठिही ऐकला नाही)

कलिन्दर या प्राण्या बद्दल कोणाला काही माहित आहे का?

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 25/02/2008 15:12 या दिवशी प्रकाशित केले.

मी लहान असताना आमच्याकडे घराना पोटमाळे असत. त्यात कलिन्दर नावाचे प्राणि वसति साठी असत. काळा रन्ग , लाम्ब शेपटी , लाल डोळे, माकड आणि मांजर सद्रुश हा प्राणी पोटमाळे असलेली घरे संपली तसा नहिसा झाला.

या प्राण्या बद्दल कोणास काही माहित असल्यास सांगावी

जस्सं च्या तस्स राहिल का सारं ?

लेखक धमाल मुलगा यांनी सोमवार, 25/02/2008 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
जस्सं च्या तस्स राहिल का सारं ?
हाक नुसती एकुन थांबेल का वारं?

धपाट्याबरोबर मिळतील का
आईच्या हातचे पोहे ?
रिजल्टवरच्या सहीसह
बाबांचा प्रश्न - काय हे ?
सहलीच्या आदल्या दिवशी
उडालेली झोप,
आजीबरोबर लावलेलं
पहिलंवहिलं रोप

ती दीड रुपया भाड्याची सायकल
ब्रेकडान्स व मुनवौक
करणारा तो मायकल
खांद्यावर दिसेल का ती
आदिदासची बॅग ?
अन मानेला रुतेल का तो नव्या
शर्टाचा टॅग ?

आवडती छत्री हरवेल का परत ?
मोडतील का बेत आल्यावर ठरत ?
शाळेतील मैत्रीण मारेल का
परत हाक ?
मिळेल का कधी खिडकीजवळचा बाक ?

ऐन सुट्टीत हरवेल का

संपादक कसा वापरावा ?

लेखक सरपंच यांनी सोमवार, 25/02/2008 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वर आता श्रीमंत संपादक (Rich Text Editor) आहे. त्यावर लेखसंपादनासाठी लागणार्‍या जवळपास सर्व प्रकारची बटन्स दिलेली आहेत.
आकार : याने  तुम्ही आकार वाढवू शकाल.
ठ : अक्षरे  ठळक करता येतील.
ति : याने अक्षरे  तिरकी होतात.
अ : याने अक्षरांना अधोरेखांकन करता येते.

संकेतस्थळ उघडण्यास अडचण ?

लेखक सरपंच यांनी सोमवार, 25/02/2008 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार,

काही सदस्यांना संकेतस्थळ  उघड्यास अडचण येते आहे. ही अडचण नेमकीकाय आहे ते सांगता येईल का?
त्या सोबत तुमची OS  आणि ब्राऊजरची आवृत्ती सुध्दा  द्या.  काही संदेश येत असेलतर तोही द्या.
मोझीला फायरफॉक्स वर अशी काही अडचण आहे का ?