Skip to main content

संपादक कसा वापरावा ?

लेखक सरपंच यांनी सोमवार, 25/02/2008 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वर आता श्रीमंत संपादक (Rich Text Editor) आहे. त्यावर लेखसंपादनासाठी लागणार्‍या जवळपास सर्व प्रकारची बटन्स दिलेली आहेत.
आकार : याने  तुम्ही आकार वाढवू शकाल.
ठ : अक्षरे  ठळक करता येतील.
ति : याने अक्षरे  तिरकी होतात.
अ : याने अक्षरांना अधोरेखांकन करता येते.
काड : याने अक्षरांवर काड मारता येते.
खाली : याने  अक्षरांच्या खाली  लिहीता येते. शास्त्रीय लिखानाच्या वेळी याचा उपयोग होतो.
वरः याने अक्षरांच्या वर लिहिता येते.  घातांक वगैरे लिहीण्यासाठी ह्याचा  उपयोग होतो.

या पुढील तीन बटन्स एकूण लेख डाव्या, उजव्या अथवा मध्य भागी केंद्रितकरण्यासाठी उपयोगाची आहेत.
पुढील दोन  सूची बनवण्यासाठी कामाची आहेत.
त्यापुढची दोन सुध्दा लेख कसा दिसावा या साठीची आहेत.

खालील ओळीत
रंग : यामुळे शब्दांना रंग देता येतो.
पार्श्वरंग : यामुळे शब्दांना पार्श्वरंग देता येतो.
कापा : हवे तेवढे लेखन काढता येईल.
प्रत करा: हव्या त्या लेखाची प्रत करता येईल.
डकवा : हव्या त्या लेखाला चौकटीत डकवता येईल.

प्रतिक्रमः  सलग क्रमाने केलेल्या कृती उलट करत जाईल.
अनुक्रम : उलट केलेल्या कृती सलग करत जाईल.

टेबलः लेखात टेबल लावण्यासाठी.

चित्रे : लेखामधे चित्रे लावता येतील.

दूवा : लेखामधे दूवा देण्यासाठी उपयोगी.

HTML :  लेखाचा HTML  कोड बघता येईल.

 आणि:  ह्यात काही सामन्यतः चुकणार्‍या मराठी शब्दांची काळजी घेतलीआहे. ते आपसूक योग्य लिहील्या जातील.

F1 : हे मदत पान आहे. गमभनचा विस्तृत कळ फलक येथे दिलेला आहे.


-----------------------------------------------------------------------------
माहिती असलेल्या अडचणी : फायरफॉक्स मधे पार्श्वरंग देता येत नाहित.म्हणजेच पार्श्वरंग दिल्यास तो त्या शब्दांपुरता मर्यादित न राहतासंपुर्ण लेखाचा पार्श्वरंग होतो. इन्टरनेट एक्स्प्लोरर मधे असं होत नाही.

वाचने 6105
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

लिहिण्याची भाषा मराठी निवडली कि इंग्रजी आणि इंग्रजी निवडली कि मराठीत लिहिले जात आहे.

इथल्या coding चा दोष असेल तर पहावे.

 


In reply to by यशोदेचा घनश्याम

कदाचित माझ्याकडुनच काहि चूकिचे होत होते.

आता नीट निवडली जात आहे.


खुप प्रयत्न करुनही मला पिकासाच्या मदतीने फोटो मिसळ्पाव वर चढवता येत नाहियेत, तरी क्रुपया मदत करा.

ह्या संबंधी माहिती देणारा धागा आहे होय! मग हरकत नाही. आधी 'संपादक कसा वापरावा?' हे शीर्षक वाचून अंमळ दचकलोच होतो! :T (संपादक)चतुरंग

In reply to by चतुरंग

मला ही तसंच वाटलं होतं !! पण मग पाहिलं .. धागा पण्णास वर्षांपुर्वीचा आहे !! मग प्रतिसादवलं नाही !! -(भावी संपादक) टारझन

In reply to by टारझन

>>धागा पण्णास वर्षांपुर्वीचा आहे आयला खरंच की. तो जालिंदर बाबाचा धागा आणि अजून येक मिपासंबंधीचा प्राचीण धागा पण असाच पुन्हा वर आलाय. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

In reply to by टारझन

>>धागा पण्णास वर्षांपुर्वीचा आहे !! :) मलाही पन्नास वर्षापूर्वीचा धागा वर आल्याने आश्चर्य वाटले. तरी तात्यांना म्हणत होतो. प्रतिसाद वर आला तर चालेल पणा धागा वरती नको यायला ! पण काही वेगळे असले पाहिजे त्याशिवायही मजा नाही. असो, चालायचेच...! -दिलीप बिरुटे (मिपा आहे, तसे इंजॉय करणारा)

हा श्रीमंत संपादक कार्यान्वित (activate) कसा करावा? मला नेहमीचेच , , दिसत आहे. :O तसेच अशिक्षितांच्या सोयीसाठी शब्दार्थ मराठीत द्यावेत. जसे प्रतिक्रम= मराठीत undo अनुक्रम= मराठीत redo :D शुद्धलेखनाचा उंट तात्यांनी तंबूत घेतला म्हणायचा. :? नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

अक्षरांचा रंग कसा बदलावा? कुणी मदत करेल का? वर सांगितल्या प्रमाणे (रंग : यामुळे शब्दांना रंग देता येतो.) हे वापरुन पाहिले पण अक्षरांना रंग चढलेला दिसत नाही. ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* यावन रावनकी सभा शंभु बंध्यो बजरंग । लहू लसत सिंदूरसम खूब खेल्यो रणरंग ।। रबि छबि लखत खयोत बदरंग । राजन् तव तेज निहारके लखत त्यजो अवरंग ।। -कवी कलश