Skip to main content

दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला द्यावा?

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी रविवार, 09/03/2008 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मते प्रख्यात खलनायक व बुजुर्ग चरित्र अभिनेता 'प्राण' या॑ना 'फाळके' पुरस्काराने सन्मानित करावे..इतर मिपाकरा॑ना काय वाटते..?

स्ट्रिकर्स - नग्नधुमकेतू

लेखक व्यंकट यांनी रविवार, 09/03/2008 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांत भारताच्या विजयापेक्षा अधिक प्रकर्षाने जी बातमी झळकली ती म्हणजे एक प्रेक्षक नग्नावस्थेत मैदानावर ऍन्ड्रू सायमंड्स च्या दिशेने धावत गेला आणि सायमंड्सने त्याला धक्का मारून पाडल्याची. अश्या नागव्याने धावण्याच्या कृत्यास पश्चिमी सभ्यतेत (?) 'स्ट्रिकींग' असे संबोधतात. विकीपिडीयानुसार स्ट्रिकींगचा शब्दशः अर्थ वेगाने जाणे असा होतो. स्ट्रिकींगचा अर्थ रहदारीच्या ठिकाणी नागव्याने ( धावत ) जाणे असा कधी झाला ते विकीपिडीयावरच वाचता येईल. अर्थात धावत जाणं महत्त्वाच नाही. काही संथपणे निर्विकार चेहर्‍यानी चालणारे सुद्धा असतात.

सारण की पुरण??

लेखक धनाधीश यांनी रविवार, 09/03/2008 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
करंज्यांमध्ये जे भरतात, त्याला आम्ही सारण म्हणतो. पण आमच्या शेजारी-पाजारी राहणा-या बहुजन समाजातील कुटुंबांमध्ये यालाच पुरण म्हणतात. माझ्या माहितीनुसार पुरणपोळीत जे असते, त्याला पुरण म्हणतात. मिपावरील खवय्ये याबाबतीत अधिक मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा.
Taxonomy upgrade extras

गोळी

लेखक केशवसुमार यांनी रविवार, 09/03/2008 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
आमच प्रेरणा सारंग यांची सुरेख कविता खुळी उगाच चरले काल रातरी काहीबाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही तसा वेंधळा जरा माझा स्वभाव आहे चपळाई या शब्दाचाही अभाव आहे भरीस आला प्रसंग आहे बाका हाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... हसून त्याने प्रश्नचिन्हसे मला पाहता हातानेच मी त्यास इशारा 'तो' करता कळून येतो भाव मनातील मग त्यालाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... अंतरातली उलथापालथ मी बावरते बंद पाहूनी दार जराशी मी घाबरते तो थांबून देतो धक्का तेव्हा दारालाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... ............ अन मी निघून जाता तोही

वाट फुटेल तिथे ४

लेखक सुधीर कांदळकर यांनी रविवार, 09/03/2008 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्य केरळी उच्चार आणि ती रहदारी ४ ऑक्टोबर २०००. मडिकेरीच्या रम्य आठवणी घेऊन निघालो. मॅसाचे आभार मानले. त्यांनी सकाळी वेळेवर बिल दिले. तेल्लीचेरीला जाणार रस्ता कोठून जातो त्याचे अगत्याने मार्गदर्शन केले. सारथ्यांनी व्यवस्थित समजून घेतले. त्यांचे आम्ही सर्वांनी पुन्हा आभार मानले. सातसाडेसातला निघालो. आता आम्ही वेगळ्या दिशेने जात होतो. रस्त्याला लागून डेरेदार वृक्ष. त्यापलीकडे दुतर्फ़ा चहाचे मळे. आल्हाददायक दृश्य. मी लहान मुलासारखा सीटवर गुढगे टेकून मागे तोंड करुन निसर्ग डोळ्यात साठवत होतो.

मला मराठी कविता लिहिणेही आवडते... पण

लेखक वडापाव यांनी रविवार, 09/03/2008 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
मी मराठीतही कविता लिहितो. विशेषतः मिपावर असताना माझ्या कल्पकशक्तीला प्रोत्साहन मिळते. पण यावेळी नकळतच इंग्रजीत प्रोत्साहन मिळाल्याने ही कविता सादर करतो.

विदर्भातला शेतकरी..

लेखक सृष्टीलावण्या यांनी रविवार, 09/03/2008 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
शेतकर्‍यांना कर्जमाफ झाल्यापासून गेल्या विदर्भात ८ दिवसांत २२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. ही बातमी खरोखरच चटका लावणारी आहे. बळीराजा हे आपला अन्नदाता, त्याच्या आत्महत्यांनी महाराष्ट्र ढवळून निघायला हवा पण दुर्दैवाने तसे झाल्याचे दिसत नाही ह्याचे मुख्य कारण ह्या सततच्या आत्महत्या केवळ विदर्भापुरत्याच मर्यादित आहेत. तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रात शेतकर्‍यांचे प्रामुख्याने ४ प्रकार १) कोकणातला २) खानदेशातला ३) विदर्भातला ४) मावळ प्रांतातला. कोकण प्रांतात पाऊस भरपुर पण पाणी साठवण्याची तंत्रे कमी त्यामुळे बहुतांश पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाते. नगदी पीके (ऊस, कापूस) नाहीत.

इक जरा छींक ही दो तुम - गुलजार ह्यांची अंतर्मुख करणारी एक कविता

लेखक व्यंकट यांनी रविवार, 09/03/2008 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
चिपचिपे दूध से नहलाते हैं आंगन में खड़ा कर के तुम्हें । शहद भी, तेल भी, हल्दी भी, ना जाने क्या क्या घोल के सर पे लुंढाते हैं गिलसियां भर के औरतें गाती हैं जब तीव्र सुरों में मिल कर पांव पर पांव लगाये खड़े रहते हो इक पथरायी सी मुस्कान लिये बुत नहीं हो तो परेशानी तो होती होगी । जब धुआं देता, लगातार पुजारी घी जलाता है कई तरह के छौंके देकर इक जरा छींक ही दो तुम, तो यकीं आए कि सब देख रहे हो । देवाच्या अस्तित्वावर, धार्मिक रुढींवर आणि सभोवतालच्या दांभिकतेवर एकाच वेळी सौम्य शब्दात प