Skip to main content

धर्मवीर संभाजी महाराज - संस्मरण

लेखक शेखर यांनी मंगळवार, 11/03/2008 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
११ मार्च ही धर्मवीर संभाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे. सन १६८९ मध्ये ह्या महापुरुषाने आपला देह ठेवला. मुगलानी कपटाने पकडून त्यांना हाल हाल करुन ठार मारले. धैर्याने सगळ्या हाल अपेष्टांना तोंड देणार्‍या छाव्याला माझा त्रिवार मुजरा.. - (मराठी मावळा) शेखर

चारोळी म्हणजे

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 11/03/2008 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
चारोळी म्हणजे चारोळी म्हणजे चारोळी म्हणजे चारोळी असते तुमची आमची आणि सर्वंचि सेम असते चारोळी म्हणजे एक स्वप्न असते. चारोळी म्हणजे गुलबकावलिचे फूल असते मिळाले तर कूल नाही तर भूल असते चारोळी म्हणजे एक श्वास असतो.... आवडेल त्याला दरवळणारा धूंद सुवास असतो आवडली नाहितर भपकारयाचा वास असतो..... चारोळी असते एक घरटे आवडती साठी महाल आणि नावडती साठी खुरटे चारोळी म्हणजे एक सफर असते ज्यात दोन ओळींच्या मधे भावनेचे बफर असते... चारोळी म्हणजे चार ओळींचे एक नाजूक महाकाव्य असते ज्यातल्या भावनेचे चित्र नेहमीच अती भव्य असते दोन तुझ्या दोन माझ्या असा काही सौदा नसतो देण्या घेण्याचा काही एक वाद

तुम्हाला काय वाटते?

लेखक राजमुद्रा यांनी मंगळवार, 11/03/2008 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी पुणे मं.पा. येथे जमावाने ५० पेक्षा जास्त पी.एम्.टी. फोडल्या. कारण काय तर एक १२ वर्षाचा मुलगा सायकलवरून जात असताना पी.एम्.टी. च्या चाकाखाली आला. रस्त्यावर सगळीकडे काचाच काचा होत्या. खूप विचार करूनही ठरवता येईना जमावाची ही क्रुती चूक की बरोबर? भारताबाहेरही लोक असेच वागतात का? शक्य असल्यास सांगा तुम्हाला काय वाटते? राजमुद्रा :)

धुणे वाळवणे (चित्रे)

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 11/03/2008 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
घरचे गुपीत कोणी उघड्यावर आणले की इंग्रजीत म्हणतात "घाणेरड्या धुण्याच्या कपड्यांचे प्रदर्शन".

अरुणोदय झाला!

लेखक ॐकार यांनी मंगळवार, 11/03/2008 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यभूमीत डोंगराआड उगवणार्‍या सूर्याने दिलेले दर्शन :) ही वाट दूर जाते... माझिया पाषाणहृदयी वेदनेचे झाड आहे. सूर्यकिरण सोनेरी हे... तुझ्या नभाला गडे क

(भाउबंदकी)

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 11/03/2008 06:51 या दिवशी प्रकाशित केले.
बाई, बाटली, प्रेयसी, दारु, गुत्ते, बायको आणि तिचे तीर्थरुप..इ. ना विडंबनात न आणता विडंबन लिहिण्याचे ओपन च्यालेंज मिळ्याल्या पासून विडंबनासाठी कच्चा माल शोधत होतो आणि आज पहाटे पहाटे बेसनलाडू यांची भाउबंदकी वाचनात आली.. म्हणल बघू जमतय का आपल्याला... किनार्‍या'वरी शिजलेला कट त्यांची निष्ठा, जगास कटकट! 'मांड्यां'ची चव नका विचारू जरा तंगडी आहे जळकट! चिलटांची त्या कशाच चिंत्ता? वशिंड भरले, शिंगे दणकट! काका पिटला ! पुतणा उठला! भाउबंदकी आहे बळकट विडंबने ही सुटली नाही "केश्या" मेला आहे, हलकट

वेश्याव्यवसायाची नैतिकता

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 11/03/2008 06:32 या दिवशी प्रकाशित केले.
या संकेतस्थळावर लोक मोठ्या मनाने, उघड्या विचारसरणीने "रौशनी" वाचत आहेत म्हणून हा चर्चाप्रस्ताव टाकतो आहे. तितक्याच उघड्या विचारसरणीने हा काथ्या कुटावा, अशी विनंती. समाजात वेश्याव्यवसायास सामान्यपणे अनैतिक मानतात, असे आपण ऐकतो, वाचतो. तो अनैतिक का हा विचार फारसा करत नाही. पण तुम्ही म्हणाल की दरोडे, खून, फसवणूक या सर्व गोष्टीही समाजात अनैतिक मानतात, त्यांच्याबद्दलही आपण फारसा "का?" असा विचार करत नाही. मग वेश्याव्यवसायात, आणि या अन्य "अनैतिक आचारांत" काही फरक असावा असे मला का वाटावे? कारण अन्य अनैतिक कृतींच्या अनुषंगाने जे काही येते त्या सर्वालाच आपण अयोग्य मानतो.

भाउबंदकी

लेखक बेसनलाडू यांनी मंगळवार, 11/03/2008 01:58 या दिवशी प्रकाशित केले.
कट्ट्यावरचे वासू तर्कट वाचा विष्ठा, मनही मळकट! मांड्यांची चव कोणा कळली? म्हटले सगळे - "तळकट, तुपकट!" माउलीसुधा सुटली नाही लेकरे अशी दिवटी, हलकट चिलटांची या मस्ती कसली? वशिंड भरले, शिंगे दणकट! काका कुठला?पुतणे कुठले? भाउबंदकी होवो बळकट

नान्या..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 11/03/2008 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
"तात्या, पोष्टाजवळचा टकल्या सातपुते खपला रे. वेळ असेल तर ये!" रात्री अकराच्या सुमारास जरा कुठे डोळा लागतो न लागतो तोच नान्याचा फोन! शिवनाथ पांडुरंग नवाथे, ऊर्फ नाना नवाथे, ऊर्फ नान्या! हा प्राणी मला कधी भेटला, कधी आमची घट्ट दोस्ती जमली आणि कधी हा माझा झाला ते कळलंच नाही. नान्याला मर्तिकं पोचवायची भारी हौस. छंदच म्हणा ना! जरा ओळखीपाळखीतलं कुणी मरायचा अवकाश, नान्या त्या घरात सर्वात पहिल्यांदा हजर! नुकतीच पोरगी पटलेल्या एखाद्या युवकाने ज्या लगबगीने तिच्याबरोबर सहाचा शो पाहायला जावं, त्याच उत्साहाने नान्या कुणाच्याही मयताला निघतो!