मार्केटिंग - विनोदी कथाकथन भाग-१
बायकोसोबत मार्केटिंगला जाणं म्हणजे एक सुखद अनुभव असतो... म्हणजे आपापल्या बायकोसोबत. ही गोष्ट कोणीही नाकारु शकणार नाही विशेशत: जर त्यांच्या बायकांसमोर विचारलं तर...
मी आणि माझी पत्नी एकदा मार्केटिंगसाठी गेलो होतो. जसंकी नेहमी होतं ती पुढे चालत होती आणि मी आपला मागे मागे... काही घेण्यासारखं आहेका ते बघत होतो. एका दुकानावर लावलेल्या एका जाहिरातीने माझं लक्ष आकर्षित केलं.
लिहिलं होतं, " लसून शिलण्याचं यंत्र .... फक्त दहा रुपए'. "यंत्र' या शब्दाने माझी उत्सुकता चाळवली गेली ... तसे तर आजकल कोणत्याही गोष्टीचे यंत्र मिळतात ... मी दुकानदाराजवळ गेलो... त्याला मी ते "यंत्र' दाखवायला सांगितलं...
मिसळपाव