संस्कृत १
परवा मिपावरील एका लेखकू महाशयांनी विधान केले की त्यांना संस्कृत अजिबात कळत नाही. हे म्हणजे थोडेसे प्रसिद्धीचा हव्यास असणारे लोक जसे अधून मधून भडक व सवंग विधाने करून जनतेचे लक्ष वेधून घेतात तसा प्रकार झाला.
मी जर म्हटले, "मम नाम सृष्टीलावण्या । अहं दादरनगरे निवसामि । अहं प्रत्येक-बुधवासरे रेलयानेन
वान्द्रानगरं गच्छामि । अहं युवति । अहं शिक्षिका । अहं अनुवादिका च। अहं भारतीया, महाराष्ट्रीया च। आशा नाम मम माता। अनंत नाम मम पिता।"
भले प्रत्येकालाच संस्कृत बोलता येत नसेल पण ही वाक्ये कळायला काही कठिणता असेल असे मला वाटत नाही. म्हणून मी म्हणेन संस्कृत अजिबात कळत नाही हे एक विसंगत विधान आहे.
पण भारतात बरेच जणांना संस्कृतभाषेबद्दल, भारतीय संस्कृतिबद्दल येता जाता काहीतरी पिंक टाकायची सवयच आहे. त्यातच त्यांना भूषण वाटते.
संस्कृतबद्दल सर्वात मोठा गैरसमज म्हणजे ही अध्यात्माची भाषा असून ती विशिष्ट जातीशी निगडित आहे. संस्कृतमधील आद्यकाव्य रामायण ज्यात १ लाखापेक्षा जास्त श्लोक आहेत ते एका वाल्मिकी नावाच्या कोळ्याने रचले आहे. संस्कृतमधील महाकवि कालिदास हा गुराखी (गवळी समाजाचा) होता. महाभारतात ज्याच्या तोंडी संस्कृत संवाद आहेत तो कर्ण सूतपुत्र (सूत=सारथी) होता. म्हणजे आजच्या काळातील ड्रायव्हर / टांगेवाला समाज.
इतकेच काय शंकराचार्याशी ज्याने वादविवाद केला तो चांडाळ (समाजाचा) म्हणजे स्मशानात काम
करणारा होता. पण लोकांची उगीचच धारणा आहे की संस्कृत ही पुरोहित वर्गाची भाषा आहे आणि हा गैरसमज ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर दोघांनीही मनापासून जपलाय. ब्राह्मण संस्कृतवरील आपला हक्क सोडायला तयार नाहीत आणि ब्राह्मणेतरांना आज संस्कृत शिकायची संधी असूनही ती भाषा न शिकता त्याविषयी मनात येईल ते ठोकून द्यायला आवडते. मनुस्मृती न वाचताच जाळणे हा तर नेतेमंडळींचा आवडता उद्योग.
पण अगदी अलिकडच्या काळात संस्कृत उत्तम बोलणार्यांमध्ये / जाणणार्यांमध्ये शांता शेळके (देवांग कोष्टी, विणकर समाज), मारुति चितमपल्ली (भटके विमुक्त समाज), बाबासाहेब आंबेडकर (दलित समाज), गुलाम दस्तगीर बिराजदार (मुसलमान) ही मंडळी सुद्धा आहेत.
इतकेच काय माझी मैत्रिण स्वाती जाधव उत्तम संस्कृत पण्डिता आहे. आज तिला मुंबईतील लोक संस्कृतसाठी प्रचंड मान देतात.
मला खात्री आहे की एवढ्या विवेचनानंतर सुद्धा काही मंडळींना खुसपटे काढण्याची सवय असेल. त्यांच्या
समाधानासाठी पुढील भागात माझी लाडकी "सत्यकाम जाबालीची कथा" देणारच आहे.
माझी तमाम वाचकांना एव्हढीच विनम्र विनंती की केवळ वरील मुद्द्याला अनुसरून मते द्यावीत कारण पुढील भागांत मी इतर मुद्द्यांकडे वळेनच.
>
>
मना बोलणे नीच सोशित जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावें ।।
वाचने
25852
वाचनखूण
प्रतिक्रिया
69
स्वागत..
In reply to स्वागत.. by विसोबा खेचर
महाभारतातील संस्कृत बोलणारी पात्रे
In reply to महाभारतातील संस्कृत बोलणारी पात्रे by प्रियाली
जबरा...
In reply to महाभारतातील संस्कृत बोलणारी पात्रे by प्रियाली
शुभेच्छा
In reply to महाभारतातील संस्कृत बोलणारी पात्रे by प्रियाली
प्रियालीचा विजय असो..:)
In reply to प्रियालीचा विजय असो..:) by विसोबा खेचर
कप्पाळ!!
सत्यकाम जाबालीची कथा
:)
In reply to :) by विसोबा खेचर
कुणाची तरी
In reply to कुणाची तरी by सृष्टीलावण्या
असहमत..
In reply to असहमत.. by विसोबा खेचर
मी पण असहमत..
In reply to :) by विसोबा खेचर
अरे देवा...
In reply to अरे देवा... by सृष्टीलावण्या
म्हणजे काय ?
उपक्रम सुंदर..
In reply to उपक्रम सुंदर.. by प्राजु
कोण म्हणालं असं?
In reply to उपक्रम सुंदर.. by प्राजु
आपल्याला
संस्कृत,
In reply to संस्कृत, by सहज
हा हा हा
संस्कृत कळत नाही.
In reply to संस्कृत कळत नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:))
In reply to संस्कृत कळत नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पटले..
In reply to पटले.. by सृष्टीलावण्या
मेलास! :)
In reply to मेलास! :) by विसोबा खेचर
आमचे कोणीही प्रबोधन करु नये !!
In reply to आमचे कोणीही प्रबोधन करु नये !! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत..
स्वागत, शुभेच्छा, असहमती
In reply to स्वागत, शुभेच्छा, असहमती by धोंडोपंत
सहमत आहे..
In reply to स्वागत, शुभेच्छा, असहमती by धोंडोपंत
हे पण पटले...
अशा
In reply to अशा by अवलिया
राकट
तो लेखकू
In reply to तो लेखकू by धमाल मुलगा
आता धमाल तुझे काही खरं नाही!
In reply to आता धमाल तुझे काही खरं नाही! by राजमुद्रा
ते ......
सत्यकाम जाबली चा बळी..........
In reply to सत्यकाम जाबली चा बळी.......... by विजुभाऊ
च्यामारी..
In reply to च्यामारी.. by धमाल मुलगा
हाहाहा ....
In reply to सत्यकाम जाबली चा बळी.......... by विजुभाऊ
:))
In reply to :)) by विसोबा खेचर
भाषांतर
In reply to भाषांतर by llपुण्याचे पेशवेll
:)
वदतोव्याघात
In reply to वदतोव्याघात by विजुभाऊ
याचा अर्थ होतो...
In reply to वदतोव्याघात by विजुभाऊ
हा अर्थ मी मागील चर्चेत दिलाय.
माफ करा :) संस्कृत ग्रेटच आहे पण सोपी नाही.
In reply to माफ करा :) संस्कृत ग्रेटच आहे पण सोपी नाही. by राजमुद्रा
सृष्टीलावण्या क्लासेस
In reply to माफ करा :) संस्कृत ग्रेटच आहे पण सोपी नाही. by राजमुद्रा
सहमत आहे..
In reply to माफ करा :) संस्कृत ग्रेटच आहे पण सोपी नाही. by राजमुद्रा
हो.
होय धमाल्या
नमस्कार,
In reply to नमस्कार, by यन्ना _रास्कला
सुस्वागतम्
In reply to सुस्वागतम् by राजमुद्रा
टंकलेखनाची चूक?
In reply to टंकलेखनाची चूक? by इनोबा म्हणे
हाहाहा ....
In reply to हाहाहा .... by राजमुद्रा
रासभ कलाहि ....
बापरे
In reply to बापरे by यन्ना _रास्कला
अरे देवा !
सृष्टीलावण्य....
In reply to सृष्टीलावण्य.... by मनस्वी
परखड मत
In reply to सृष्टीलावण्य.... by मनस्वी
वा !!!
In reply to सृष्टीलावण्य.... by मनस्वी
सहमत...
योगक्षेमाय राष्ट्र्स्य सभ्यतायाश्च संस्कृते: ।
In reply to योगक्षेमाय राष्ट्र्स्य सभ्यतायाश्च संस्कृते: । by आर्य
उद्धट मराठी भाषिक?
In reply to योगक्षेमाय राष्ट्र्स्य सभ्यतायाश्च संस्कृते: । by आर्य
??
In reply to ?? by विसोबा खेचर
:-))
In reply to :-)) by धमाल मुलगा
हा हा हा....
In reply to ?? by विसोबा खेचर
म्हणजे ...
अवांतर-
In reply to अवांतर- by विसोबा खेचर
कालिदासशेठ :)))))))))))
छान उपक्रम
हिंदी गुळमटच
अभिमान आणि .......
मराठी बोलण्याचा आग्रह धरावा.