Skip to main content

आई समीप येता

लेखक अजय जोशी यांनी शनिवार, 05/04/2008 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
आई समीप येता पुत्रांस शोक झाला | न जाणता तुला गे किती काळ व्यर्थ गेला || पुत्रांस आई वाटे देवापुढील ज्ञान | आईस पुत्र वाटे हृदयामधील प्राण || जगतात राम नाही आईशिवाय काही | सौंदर्य सृष्टी जगती आईमुळेच पाही || आईपुढेच नम्र आईपुढे कृतज्ञ | नमतो इथेच तोही सर्वांहुनि सर्वज्ञ ||

मकइ राइस

लेखक स्वाती दिनेश यांनी शनिवार, 05/04/2008 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
१वाटी बासमती तांदूळ,१ मध्यम कांदा ,२ टेबल स्पून पिवळे मके, मीठ चवीनुसार,१ हिरवी मिरची,१ टेबल स्पून तेल/साजूक तूप +१ चहाचा चमचा साजूक तूप, १ टे‌. स्पून काजू तुकडे भात मोकळा शिजवून घ्या.कांदा उभा चिरून घ्या. मिरची बारीक चिरा.ताजे मक्याच्या दाण्यातील मके असतील तर वाफवून घ्या,कॅन मधील मके वाफवून घ्यायची गरज नाही. एका कढईत/नॉन स्टीक पॅन मध्ये तेल /तूप तापत ठेवा.त्यात जिरे घाला,मिरच्यांचे तुकडे घाला,कांदा घाला.कांदा गुलाबीसर परता,नंतर काजू तुकडे घालून परता, मके घाला,थोडे परता.भात घाला,मीठ घाला,हलक्या हाताने शीत न मोडेल अशा बेताने परता,साजूक तूप सोडा‍‍.
Taxonomy upgrade extras

हरवले ते गवसले...

लेखक प्रगती यांनी शनिवार, 05/04/2008 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मि.पा. वरिल सगळ्या मंडळींना प्रगती व कल्पनाचा नमस्कार. मिसळ्पाव हे संकेतस्थळ सूरू केल्याबद्द्ल धन्यवाद. आणी हे संकेतस्थळ आम्हाला दा़खवल्या बद्द्ल मदनबाण यांचे आभार! मि.पा वरिल सगळे सदस्य अपतिम ले़ख, विडंबन ,कथा विनोद लिहितात त्यांचे शतश अभिनंदन. सगळयाच्या प्रतिक्रिया अगदि झकास असतात अगदी ह. ह. पु. वा. आपल्या मि.पा.मुळे आमच्या सारख्या बाहेरुन शिक्षण घेतलेल्यांना कालेज कट्टा काय असतो, तिथे काय गमती जमती असतात याचा अनुभव आला. ताण तणाव घालवन्यासाठी तसंच फक्त मराठीतुन बोलण्यासाठी (इंग्रजीची सरमिसळ न करता) आंम्हाला मि.पा.

प्रॉन्स बालचाव

लेखक प्रभाकर पेठकर यांनी शनिवार, 05/04/2008 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः कोलंबी - १/२ किलो कांदे - २ मध्यम काश्मिरी मिरच्या - १२-१५ किंवा काश्मिरी मिरची पावडर २ टेबल स्पून किंवा कुठलेही भडक रंगाचे तिखट आपल्या अंदाजानुसार जिरं - १ टी स्पून अख्खी काळी मिरी - १ टी स्पून हळद - १ टी स्पून मीठ - चवीनुसार साखर - २ टीस्पून व्हिनेगर - १-१/२ (दिड) कप आलं - १ इंच लसूण - ३ कांदे कढीपत्ता - २ काड्या तेल - १ कप कृती: कोलंबी सोलून साफ करून घ्या. कांदे बारीक चिरून घ्या. आलं - लसूण एकदम बारीक चॉप करून घ्या. मिरच्या (किंवा तिखट) + जिरं + काळी मिरी + हळ
Taxonomy upgrade extras

संडे स्पेशल(पुरणपोळी )

लेखक स्वाती राजेश यांनी शनिवार, 05/04/2008 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात पुरण्पोळी करताना दोन-तीन प्रकार आढळतात. नागपूरकडे पुरणात पुर्ण साखर वापरतात, तर कोल्हापूर भागात पुर्ण गुळ, खानदेशात तर हरभरा डाळ ऐवजी तुरीचे किंवा मुगाचे पुरण करतात. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात हरभराडाळ व त्याच्यात निम्मी साखर व निम्मा गुळ हे प्रमाण असते. साहित्यः ३ वाट्या हरभराडाळ ३ वाट्या गुळ (चवीप्रमाणे कमी जास्त करणे) १च.जायफळ पूड १च्.वेलची पूड ३ वाट्या कणिक ३ टे.स्पून मैदा मीठ ३/४ वाटी तेल तांदळाची पिठी १.
Taxonomy upgrade extras

तेव्हा आई तुझी खूप आठवण येते

लेखक फटू यांनी शनिवार, 05/04/2008 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
आरक्त चेह~याने सांज ढळते अन् पाखरांची किलबिल होते घराकडे मी परतत असताना आई तुझी खूप आठवण येते तेच कुठेतरी सॅक फेकून देणे तेच घाईघाईत कपडे बदलणे अस्ताव्यस्त कपडे उचलताना मात्र आई तुझी आठवण येते एका हाताने बेसिनमध्ये भांडी धुनं दुस~या हाताने कडवट चहा पिणं तव्यातील चपाती जेव्हा करपून जाते तेव्हा आई तुझी खूप आठवण येते पंख फुटल्यावर प्रत्येक पाखराला आकाशी झेप तर घ्यावीच लागते दमून जातो जेव्हा जीव पिल्लाचा तेव्हा आई तुझी खूप आठवण येते आजही इथे साता समुद्रापार आई कधीतरी डोळे भरून येतात अन् पापण्यात तुझी मूर्ती उभी राहते तेव्हा आई तुझी खूप आठवण येते

जॅझ जुगलबंदी

लेखक धनंजय यांनी शनिवार, 05/04/2008 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
सॅक्सोफोन आणि ड्रमची जुगलबंदी सॅक्सोफोन-ड्रमच्या जुगलबंदीमध्ये कोणी प्रमुख कलाकार नाही कोणी सहायक कलाकार नाही जेव्हा सॅक्सोफोन त्याच्या हरकतींमध्ये गती आणतो, त्याच्या सुरांत मध ओघळतो - तो गोफ विणतो हृदयातील नसांचा आर्त गीतामध्ये. ड्रमर कळे-न-कळे शिवतो ताशाला, आणि मानतो आपल्या भाग्याला - सॅक्सोफोनच्या भरारीमागचे स्पंदन होणे त्याला प्राप्त झाले.
Taxonomy upgrade extras

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

लेखक धोंडोपंत यांनी शनिवार, 05/04/2008 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, मिसळपावच्या सर्व सभासदांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो, आणि नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्री व्याडेश्वरचरणी प्रार्थना. आपला, (शुभचिंतक) धोंडोपंत पंचांगाबद्दल खुलासा:- दिनांक ०६/०४/२००८ रोजी आपले नवीन वर्ष सुरू होत आहे. या दिवशी सकाळी गुढी उभारून, नवीन पंचांगाची पूजा केली जाते. या वर्षी गुढीपाडव्याला क्षयतिथी आली आहे. याचा अर्थ शुद्ध प्रतिपदा कोणत्याही सूर्योदयाला नाही. सकाळी ९ वाजून २६ मिनीटांपर्यंत अमावास्या आहे. त्यानंतर प्रतिपदा लागते आहे.