काही काळाच्या ओघात हरवलेले लेख/मुलाखती
खुप वर्षापूर्वी कालनिर्णय मध्ये पु.ल.देशपांडेंनी एक पाककृती (विनोदी) लिहिली होती, त्यातले केवळ एक वाक्य मला आठवतेय "वाण्याकडून आणलेल्या गुळाची आख्खी पूडी पातेल्यात टाकावी... कागद व दोर्यासकट". कोणाकडे हा लेख (पाककृती) आहे का?
पुलंच्या काळात पण साहित्य, संगीत ह्यांची चोरी व्हायची, असाच एकदा हा विषय निघाला आणी पुलं नी हातात पेटी घेऊन असा काही नजराणा पेश केला की सगळे गार झाले, संपल्यावर पुलं म्हणाले "पाहू या ह्याची नक्कल कोणी करु शकतो का" ह्या घटनेबद्दल कोणाला जास्त माहित आहे का?
धन्यवाद
प्रशांत
मिसळपाव

आज चैत्र पाडवा! नव्या वर्षाची सुरुवात.
आज आपण घरोघरी गुढी उभारुन हा नवा दिवस साजरा करतो. सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. आल्हाददायक असे उल्हसित करणारे वातावरण मन प्रसन्न करते.
आपण जी गुढी उभी करतो त्याला आंब्याची डहाळी, साखरेची माळ, एक वस्त्र आणि तांब्या लावतो. घरी जरी गोड्-धोड असले तरी एक प्रकार शास्त्रकारांनी सांगितला आहे; तो म्हणजे कडुनिंबाची चटणी. हा खाद्यप्रकार बर्याच जणांना आवडत नाही. अनेक लोक तेवढे सोडून बाकी सर्व काही करतात.