Skip to main content

लेखात दिलेला दुवा(link) हा नविन खिडकीत कसा उघडावा ?

लेखक सरपंच यांनी रविवार, 27/04/2008 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
1) संगणकाच्या उंदरावर(माऊस) उजवी टिचकी मारून 'नव्या खिडकीत उघडा' हा पर्याय निवडा. २) दुव्यावर उंदराने टिचकी मारताना डाव्या हाताने शिफ्ट बटन दाबून ठेवायचे, दुवा नव्या खिडकीत उघडतो.

अर्धे अक्षर आणि हलंत (पाय मोडणे.)

लेखक सरपंच यांनी रविवार, 27/04/2008 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
' सुस्वागतम ' मधील शेवटचा म अर्धा हवा. तो कसा लिहायचा ? -- १) शब्दाच्या शेवटी येणार्‍या अक्षराचा पाय मोडायचा असल्यास .h किंवा +h असे टंकावे . उदा. अतिपरिचयात् लिहायचे झाल्यास atiparichayaat.h असे किंवा atiparichayaat+h असे टंकावे. २) सुस्वागतम असे लिहून झाल्यावर पुन्हा "म" दाबणे ="म्म" असे दिसते, त्यातला दुसरा "म" काढून टाकला की = "म्" असे दिसते. सर्व व्यंजनांना हे लागू पडते.

संवाद

लेखक हेरंब यांनी रविवार, 27/04/2008 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
काही बोधपर व मनोरंजक संवाद
: - भटो भटो : - ओ : - कुठे गेला होता ? : - प्रवेश घ्यायला : - मिळाला ? : - नाही. : - का ? : - कोटा आडवा आला : - बरं झालं, आम्ही खातो गरे, तुम्ही खा आठळ्या! : - आठळ्याही तुम्हीच खा, मी जातो 'तिकडे'. : - भटो भटो : - ओ : - कधी आला ? : - परवाच : - काय आणलं ? : - चॉकलेटं : - उभी कापू का आडवी ? : - नका कापू, तुमच्यासाठीच आणलीयेत. : - मजा आहे ना तिकडे ? : - मजा नाहीये, पण सजा पण नाही. : - भटो भटो : - ओ : - कुठे गेला होता ? : - 'तिकडे', मुलाकडे. : - काय केलेत तिकडे ? : - नेहेमीचेच, आराम

मिपाचा सिंहगड कट्टा

लेखक इनोबा म्हणे यांनी रविवार, 27/04/2008 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, येत्या रविवारी दि.४ मे रोजी मिपाचा कट्टा सिंहगडावर भरवायचा मनसुबा आहे. या कट्ट्याचे मुख्य आकर्षण म्हणजे गडावर मोकळ्या हवेत मिपाच्या सदस्यांचा 'मुशायरा' आयोजीत करण्याचा विचार आहे. तरी या 'ऐतीहासिक कट्ट्यास' उपस्थित राहू इच्छिणार्‍या सदस्यांनी आपापली नावे/मते जाहिर करावी. इच्छूकांनी आपले भ्रमणध्वनी क्र. कळवावे. :-C : ९३७२-९३७२-१८

जीए

लेखक हेरंब यांनी शनिवार, 26/04/2008 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
जी. ए. यांचे 'पिंगळावेळ' व काजळमाया' हे दोन कथासंग्रह मी पहिल्यांदा वाचले तेंव्हा मनांत जे घडले त्यातून हे मुक्तक स्फुरले. त्यासाठी त्यांचे शब्द उसने घ्यावे लागले. त्यानंतर त्यांचे संपूर्ण लेखन वाचण्याची एक ओढच लागली.
Taxonomy upgrade extras

माणुसकीचा झरा

लेखक शितल यांनी शनिवार, 26/04/2008 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला एकदा तरी माणसातच देवाचे रुप दिसते, आणि त्या क्षणा करिता तीच व्यक्ती आपल्यासाठी देव असते. त्या व्यक्तीला आपण कधीच विसरत नाही त्याच्यातील माणुसकीला आपला सलाम असतो. मी येथे माझे दोन अनुभव सा॑गणार आहे.

मला मनाचे पटले नाही

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी शनिवार, 26/04/2008 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
मला मनाचे पटले नाही वाद आमचे मिटले नाही मला नेहमी ऐकू येते मनातही जे म्हटले नाही राग तुला याचाच असावा नाव तुझे पुटपुटले नाही मला भेटल्या जखमा सुंदर कुणात मन गुरफटले नाही? अभिलाषेचे वादळ आले पाय काधी लटपटले नाही फक्त ठेवले नावा पुरते नाते मी विस्कटले नाही शब्द आणले उधार थोडे दुःख तरी पण नटले नाही तुझे एवढे कर्ज उरावर या श्वासांनी फिटले नाही नको नकोसे जगणे झाले पाश तरी पण तुटले नाही तुझ्या पाहिले डोळ्यांमध्ये व्यसन कधी मग सुटले नाही अनिरुद्ध अभ्यंकर

मधु.....

लेखक वर्षा यांनी शनिवार, 26/04/2008 06:44 या दिवशी प्रकाशित केले.
या बाईसाहेबांना मूर्तिमंत कागदावर उतरवणं निव्वळ कठीण आहे! तिचा सर्वात सुंदर क्लोज-अप मिळवण्यासाठी प्रत्येक शॉटला पॉज घेत घेत मुगल-ए-आजम अथ पासून इतिपर्यंत मनसोक्त चाळला. सर्वात सुंदर माझ्या मते ती 'मोहे पनघट पे' च्या 'नैनोंसे जादू किया' च्या या दृष्यात दिसल्ये. :) Tools used: Derwent Charcol Medium & Dark, RAFFINE 2B Graphite pencil -वर्षा
Taxonomy upgrade extras

एका माणसाची कथा....

लेखक वाटाड्या... यांनी शनिवार, 26/04/2008 03:18 या दिवशी प्रकाशित केले.
एका माणसाची कथा.... मिपावरचा पहीलाच प्रयत्न...प्रचंड धाकधुक चालू आहे. आपण तज्ञ मंडळींना हा लेख कसा वाटला ते जरूर सांगा. आज मी तुम्हाला एका माणसाची कथा सांगणार आहे. विलक्षण स्वाभिमानी, करारी, निर्मळ, प्रामाणिक आणि प्रसंगी रागीट सुद्धा. मी असा एक माणुस पाहिलाय जो अतिशय तत्त्वशील, बुद्धीमान पण तरीही प्रसिद्धी पासून प्रयत्नपुर्वक दूर. ========================================================================================== स्वातंत्र्यापुर्वीचा काळ. कोल्हापुर पासून जवळ जवळ ३०/४० कि.मी. आत चिकोडी जिल्ह्यात संकेश्वर नावाचं एक गाव आहे. तिथे पुर्वी एक अण्णा सरंजारदार होते.