काह्ही केल्या आवडतच नाही! :)
राम राम मंडळी,
नाट्य व चित्रपट कलावंतांसंदर्भात हा काथ्याकूट आहे हे सर्वप्रथम नमूद करतो आणि या काथ्याकुटाचा प्रवास याच मंडळींसंदर्भात चालावा अशी विनंतीवजा अपेक्षा करतो!
तर मंडळी, काही काही नाट्य व चित्र कलावंत हे त्यांच्या त्यांच्या जागी गुणीच असतात. त्यांनी आपलं काहीच बिघडवलेलं नसतं. एक कलाकार म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल उचित आदरही असतो.
पण...
यापैकी काही कलावंत हे आपल्याला काह्ही म्हणजे काह्ही केल्या आवडतच नाहीत/नसतात. काय असेल ते असो पण त्यांना पडद्यावर पाहिलं की अगदी नक्को वाटतं! :)
हा कथ्याकूट हा याच मंडळींची नांवे लिहिण्याकरता मी सुरू करत आहे.
मिसळपाव