मिपा दंगल भाम्बुर्डा(पुणे) वृत्तान्त
आमच्या वार्ताहाराकडुन
दिनांक २२ जुन
स्थळ : भांबुर्डा
२२जुन हा उभ्या महाराष्ट्राला एक अविस्मरणीय दिवस. बर्रोब्बर एकशे दहा वर्षापूर्वी याच भांबुर्ड्याच्या गणेश खिंडीत एक ऐतिहासीक प्रसंग घडला होता. या प्रसंगाची पुन्हा बरोबरी होणे नाही.
याच दिवसाचा पूर्व दिन भाम्बुर्डा दंगलीसाठी म्हणुन मुक्रर झाला करण्यात आला होता.दंगलीचा काळ ठरला होता पण स्थळ काही ठरत नव्हते.विजुभौ नी लैच टीमकी बडवली म्हणुन शांग्रीला अशा नेपाळी नावाच्या म-हाठी हाटीलात ( पहा एकविसाव्या शतकात देशांच्या सीमा कशा लहान होत चालल्यात ते)दंगल ठरवली.
मिसळपाव