संकेतस्थळांचे उपयोग - मिपा सदस्यांना विनंती
नमस्कार मंडळी,
सर्वप्रथमः "मिपाचे मालक/विश्वस्त तात्या यांच्याशी चर्चा करूनच मी हा प्रस्ताव मांडत आहे व सदर चर्चाप्रस्तावास मिसळपाव डॉट कॉम या संस्थळाचा पूर्ण पाठिंबा आहे. सबब, सदर प्रस्ताव ही मिपाचीच अधिकृत घोषणा आहे असे समजावे!"
आपण सर्वचजणं मिपावर येण्याचा आणि गप्पाटप्पा मारण्याचा आनंद मनापासून घेत आहोत. प्रत्येकाचे प्रत्येकाशी पटत नसेल, वादविवाद घडत असले अगदी तात्यांच्या हाताच्या टपल्यापण खाल्या तरी बहुतांशी सर्वजण पुन्हपुन्हा येत राहतात. मिपाचे हे यश वृद्धींगत होवोत ही मनःपूर्वक शुभेच्छा!
तर अशाच एका चर्चेत (छोटा डॉनने चालू केलेल्या चर्चेत) मी काही मुद्दे मांडले. विषय होता भारताबाबत आणि आपण एकत्र राहू का नाही, समाजाची अवस्था वगैरे आणि मूळ लेखाचा मथळा होता: इंडीया-दी वन नेशन आणि धार्मीक, जातीय व प्रादेशिक अस्मिता त्यावर मुक्तसुनीत यांनी मला काही खरडले... त्यांचा मूळ मुद्दा होता मिपासारखी संकेतस्थळे या संदर्भात काय करू शकतात? याला उत्तर देणे प्रतिसादा इतके सोपे नव्हते म्हणलं विचार करतो... तर नंतर परत गेल्या एका वादामधील माझ्या प्रतिसादावर त्यांनी मला आठवण करून दिली. मग काही गोष्टी खरडल्या, तात्यांना व्य.नि.ने विचारल्या आणि मुक्तसुनीत यांच्यापण त्यासंबंधात सुचना घेतल्या.
हे सर्व सांगायचे (नमनाला घडाभर तेलाचे) कारण काय? - तर संकेतस्थळातील देवाणघेवाणितून विरंगुळा जसा होवू शकतो तसाच काही भरीव गोष्टी करण्यासाठीपण एकमेकांना न बघता देखील उपयोग होऊ शकतो हे यातून दिसून येते. तर आता जे आमची निरोपानिरोपी झाली ती खाली मी देतो. मूळ कल्पना मुक्तसुनीत यांची, संकेतस्थळ तात्यांचे, मी फक्त निमित्त...
मिपाला गणेश चतुर्थीला वर्ष पूर्ण होईल. इथे इतकी माणसे येत असतात ते वास्तवात भेटून कट्टे करत असतात या कट्ट्यांचाच उपयोग त्या त्या कट्ट्यातील मेंबरांनी काहीतरी स्थानिक गरज असलेल्या गोष्टींना मदत करण्यासाठी केला तर एक चांगला पायंडा पडेल. याचा अर्थ त्यांनी टिपी करू नये असा अजिबात नाही. पण त्याचबरोबर काहीतरी सामाजीक जाण ठेवली गेली त्यातून काही उपक्रम (संकेतस्थळ नाही बरं का!) तयार झाला राबवला गेला तर बरेच काही साध्य होईल. कुणाचे काहीतरी चांगभले होईल तर कुणाला तसे करण्याची नकळत सवय लागेल. यात कोणी काय करावे, कुणाबरोबर करावे हा ज्याचा/जीचा/त्याचा/तिचा प्रश्न असेल आणि स्वभावाप्रमाणे त्यांनी काहीतरी करावे. कुठल्याही चांगल्या/प्रामाणिक संस्थेबरोबर काम करावे - पैसे देऊन अथवा बौद्धीक दान देऊन किंवा अजून कशातरी पद्धतीने. त्यात राजकारण नसावे -कुठल्याही विचारांच्या संस्थांना एखाद्या विशिष्ठ प्रोजेक्टसाठी मदत करता येईल, कधी कधी शाळांना अथवा गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांची अथवा अजून कसली मदत करता येईल. कुठल्या संस्थेकडून होते ह्याने काही फरक पडत नाही - सर्व लोकगंगेला मिळाल्याशी कारण... संस्था प्रामाणिक आणि ट्रॅकरेकॉर्ड असलेली असावी, त्यातून कुठलाही भेदभाव तयार होऊ नये इतकीच काय ती प्रामाणिक इच्छा/अट असावी...
किंवा
अजून एक शक्यता : ज्याला काही एक विशिष्ट सामाजिक कार्य/प्रोजेक्ट करायचा आहे त्याने/तिने मिपावर एक पोस्ट टाकावे. आपल्या प्रोजेक्टची माहिती सविस्तर कळवावी. शेवटी आपल्या कॉन्टॅक्ट पर्सनचे नाव-पत्ता-फोनसकट डीटेल्स कळवावेत. ज्या ज्या मिसळपावकराला काही मदत करायची असेल त्याने त्याने एका विशिष्ट मुदतीमधे ती करावी. योग्य तसा निधी जमा झाल्यावर त्या संस्थेला जाऊन ती मदत सुपूर्त करण्यात यावी. या सगळ्याचा छायाचित्रांसकट वृत्तांत त्या त्या माणसाने मिपावर छापावा....
आणि हो असा एखादा प्रकल्प केलाच तर तो होण्यासाठी मिपा हे संकेतस्थळ कारणीभूत ठरले (कारण येथे भेटलेल्या सदस्यांच्या कट्ट्यातून होत असल्याने) असे जाहीरपणे म्हणायला/सांगायला विसरू नये अशी प्रेमळ अट.
म्हणले तर यात तसे कमी लॉजिस्टीक्स असेल. कोणी येथे येऊन गैरफायदा घेणार नाही ना अशी काळजी वाटू शकेल आणि त्यात काही चूक नाही. म्हणून च ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या सेवाभावी संस्था आणि फोकस्ड प्रॉजेक्ट्सचा विचार व्हावा. नुसत्या हृदयाने नाही तर डोक्याने विचार करूनच ज्याला/जीला जो प्रकल्प आवडेल/मानवेल त्याला/तिने स्वेच्छेने मदत करावी. ती मदत काही ठिकाणि पैशाने असेल पण काही ठिकाणि व्हॉलेंटिअरींग/सेवा पद्धतीची पण असू शकते.
यात अमुकने केले म्हणजे मला पण तितकेच केले पाहीजे असे प्रेशर आणायचे नाही आणि घेयचे नाही. पण हा प्रकल्प संसर्गजन्य होण्यासाठी (म्हणजे एकमेकांकडून प्रेरणा घेऊन) ज्याने असे काही केले ते येथे जाहीरपणे सांगावे. यात पब्लिसिटी आहे, एका हाताने केलेले दान इतर हातांना कळून त्यांना पण तसे करावेसे वाटायला लावणे हा उद्देश राहूदेत...
११५ वर्षांपूर्वी लोकमान्यांनी त्याकाळाला साजेसा आणि गरजेप्रमाणे राजकीय कारणांसाठी सार्वजनीक गणेशोत्सवाचा प्रारंभ आणि उपयोग केला. आता राजकारण नाही पण समाजकारणासाठी करता आला, जिथे असेल तिथे, यथाशक्ती तर काही तरी चांगला पायंडा पडेल असे वाटते.
आपले विचार समजून घेयला आवडतील.
वाचने
11679
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
उत्तम | पर्याय
- अपत्य दत्तक योजनांबद्दल सामाजिक जागरूकता आणि उत्तेजन - उपवर/विवाहोत्सुक तरुण-तरुणींमध्ये तसेच नवविवाहित जोडप्यांमध्ये अपत्य दत्तक घेण्यासंबंधीं जागरुकता निर्माण करणे,माहिती पुरवणे - कायदेशीर प्रक्रिया,संबंधित संस्था आणि इतर आवश्यक माहिती ,आणि दत्तक प्रक्रियेला उत्तेजन देणे
- कचरा व्यवस्थापन - ओल्या व सुक्या कचर्याची विभागणी,विल्हेवाट,पुनर्वापरयोग्य कचर्याचे व्यवस्थापन यांबद्दल जागरुकता,माहितीचे आदानप्रदान,उत्तेजन आणि सक्रीय पाठपुरावा
(कल्पक)बेसनलाडूIn reply to उत्तम | पर्याय by बेसनलाडू
असेच म्हणतो
उत्तम विचार...
उपक्रम चांगला आहे
विकासराव,
In reply to विकासराव, by विसोबा खेचर
प्लेजींग (प्रतिज्ञा)
In reply to प्लेजींग (प्रतिज्ञा) by मुक्तसुनीत
प्लेजिंग... उत्तम कल्पना...
In reply to विकासराव, by विसोबा खेचर
अगदी मान्य!
संपुर्ण अनुमोदन
In reply to संपुर्ण अनुमोदन by सहज
संपुर्ण अनुमोदन
हम्म
शुभस्य शिघ्रम् !!!
In reply to शुभस्य शिघ्रम् !!! by छोटा डॉन
+++१
In reply to +++१ by धमाल मुलगा
++११
आम्हिहि सहभागि होणार...
मदत
स्तुत्य
स्तुत्य उपक्रम....
मी ऐका NGO
धन्यवाद
- मिसळपावचा उल्लेख करून पैसे मागायचे नाहीत
- अनेकदा इमेल वर पैशाची मागणी करणार्या येतात - (अमुक आजारी आहे, तमुकचा पाय मोडला वगैरे) अशा विनंत्या कोणी कुणाला फॉरवर्ड करू नये आणि येथे पण पोस्ट करू नयेत
- स्वतःचे अनुभव अवश्य सांगा - चांगले आणि वाईटही पण वाईट सांगायचाच असला तर स्वतःचाच सांगा आणि तसे स्प्ष्ट आणि सभ्य शब्दात सांगा. अमुक म्हणाला वगैरे नाही. कारण कितीही झाले तरी नकळत एखाद्या संस्थेला यातून उगाच बदनामी मिळू शकेल. ह्या गोष्टी नाजूक असतात आणि त्या तशाच हाताळल्या तर इप्सित साध्य होऊ शकेल.
- राजकारण आणायचे नाही. भारतीय पद्धतीत अनेक विचारांच्या सेवाभावी संस्था कार्यरत आहेत - समाजवादी, साम्यवादी आणि हिंदूत्ववादी. पण आपण मदत करतोय ते केवळ एखादा प्रकल्प चांगला वाटला म्हणून इतकेच डोक्यात ठेवावे आणि त्यावरून वाद निर्माण करू नयेत. (मिशनरी संस्थापण आहेत ज्या धर्मांतराला प्रोत्साहन देत नसतील त्यांच्यापुरते मर्यादीत ठेवले तर बरे होईल पण तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे.)
- संस्थेची व्यवस्थित माहीती, त्यांचे काम वगैरे पाहून मदत करा. मदत नुसती पैशानेच होऊ शकते असे समजू नका!
पुढचे दिड-दोन दिवस मला मिपा अथवा संगणकाला "ऍक्सेस" नसेल. तेंव्हा एखाद्या प्रतिसादास उत्तर दिले नाही तरी गैरसमज करून घेउ नका! परत एकदा धन्यवाद.In reply to धन्यवाद by विकास
सर्वात महत्वाचा मुद्दा...!
मान गये उस्ताद! अनेकोत्तम शुभेच्छा!
In reply to मान गये उस्ताद! अनेकोत्तम शुभेच्छा! by संजीव नाईक
काय कारण?
टीच इन्डिया उपक्रम
मि नविन
In reply to मि नविन by शिप्रा
चहाटळपणा ?
मि चहाटळ