काहीही नाव द्या...
खर म्हणजे हा एक प्रयोग होता. आता कोणता?? तर.. कटलेट बनवणे. म्हणजे कटलेट असं नाही म्हणता येणार पण, पॅटीस, किंवा अगदी भजी सुद्धा म्हणता येईल.
एरवी, भाजी- आमटी उरली की त्याची थालीपीठे करायची हा ठरलेला नेम. पण यावेळी म्हंटलं थोडं वेगळं करावं. कारण जी भाजी उरली होती ती जर थालीपीठात घातली असती तर त्याचं नक्की काय झालं असतं हे जरा सांगणं कठीणच. ती भाजी होती, पालक्-पनीर. त्या वाह रे वाह शेफ संजय टुम्मा ष्टाईल मध्ये केलेली. ती भाजी जरी उत्तम होत असली चवीला तरी शेवटी ती कोण करतं यावरही बरचसं अवलंबून असतं. म्हणजे मी केलेली भाजी फार वाईट झाली होती असं नव्हे.. पण चांगली झाली होती. तरीही ती बाऊल भर उरलीच.
मिसळपाव