Skip to main content

Khaproli

लेखक Sanika यांनी शुक्रवार, 22/08/2008 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
1 cup kanik, 1/2 cup chirlela gool, 1 motha chamcha khobare, chimutbhar meeth, paani aani tel. Pratham ek bhandyat kanik, khobare, meeth, goolneet mix karun ghya.Mishran ekdam doshyachya mishranapramane patal have.Tavyawar tel tapavun daavbhar mishran gheun pasarava.Eka side ne neet gulabi kharpus bhajle ki dusri side neet bhaja. Ekdam khuskhushit wa chavila chan lagtat.

प्रति(मा)भा उरी धरूनी तू काव्य करीत रहावे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 22/08/2008 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
"हो मी तुझी कविता ब्लॉगवर आली रे आली की प्रथम वाचतो.पण शरद ह्यावेळची तुझी कविता खूपच दुःखी होती.तुझ्या कवितेचा संग्रह पाहिला तर जास्त करून त्या दुःखी असतात.एखाद्दया कवीला दुःखाशिवाय कविता लिहायला विषय़च नसतो का रे?" काल शरद मला चौपाटीवर भेटला.थोडी दाढी वाढलेला चेहरा,खाली लेंगा,वरती झुळझुळीत पैरण,पायात चप्पल असा पेहराव करून सकाळीच समुद्राच्या दिशेने क्षितीजाकडे टक लावून उभा होता.माझी खात्री होई पर्यंत मी त्याचा जवळ गेलो आणि हा शरदच आहे असं पाहिल्यावर म्हणालो, "अरे, काय तुझी ही दशा करून घेतली आहेस,मला तू शरद असशिल याची खात्रीच नव्हती." हंसायला पाहिजे म्हणून हंसल्याचा अविर्भाव करून मला म्हणाला

ऍसेट.

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 22/08/2008 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
Live stock (Poultry mgmt.) research साठी कामशेट मध्ये सहा वर्शे जात होतो. साधारण आठवड्याला दोन दिवस. ठाणे ते लोणावळा प्रवास ट्रेनने. फार्मच्या शेटने गाडी देउ केली होती.पण म्हटलं नको. ही जमात घटकेत सौभाग्यवती तर घटकेत गंगाभारती.मोठमोठी कर्जं काढायची आणि फुगवायची खरीखुरी आजीवन लोन-आवळा क्लब मेंबर्स. एक चांगला फायदा झाला या अप डाउन चा. तो म्हणजे अफ्फाट जनसंपर्क,साध्याशा गोष्टीवरून चर्चा सुरु व्हायच्या आणि काशीची कावड रामेश्वरापर्यंत पोचायची. हल्ली काय उकाडा आहे अशी सुरु झालेली चर्चा एकमेकांच्या ऍसेट पर्यंत . शेअर्स ,म्युच्युअल फंड ,प्लॉट , सोनं वगैरेच्या चर्चांना जोर यायचा. सगळी मंडळी रोजचीच.

...उर्फ सुगरणीचा सल्ला ४

लेखक मेघना भुस्कुटे यांनी शुक्रवार, 22/08/2008 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
हे आधीचे दुवे - http://www.misalpav.com/node/2432 http://www.misalpav.com/node/2540 http://www.misalpav.com/node/2696 परवा हापिसात नशिबाला पुजलेली इडली गिळताना नेमकी एका मराठमोळ्या सुबक ठेंगणीशी गाठ पडली. 'काय, कसं काय'वर न भागता तिचा पाकशाळेत स्वहस्ते रांधलेला डबाही दृष्टीस पडला. अंमळ असूयेनंच मी कसंबसं म्हटलं, "वा, साबुदाण्याची खिचडी कशी काय?" 'मला साबुदाणा भिजवायचं वेळच्या वेळी आठवतं, जमतं.

काश्मिर - काल, आज आणि उद्या

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 22/08/2008 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
"आम्ही पाकिस्तानी आहोत, कारण आम्ही मुस्लिम आहोत", जहाल हुरीयत नेते सय्य्द अली शाह गिलानी गरजले. परंतु त्यांचे शब्द वार्‍यावर विरून जाण्यापूर्वीच त्यांनी काश्मिरी जनतेची बिनशर्त माफी मागितली. भारतीय जनता ह्या घटनेचा अन्वयार्थ कसा लावणार आहे? असे काय होते त्यांच्या वक्त्यव्यात ते काश्मिरी जनतेला रुचले नाही, पटले नाही? कश्मिरीयत ही काय चीज आहे? निमित्त झाले ते विसूनाना यांनी लिहिलेल्या काश्मिरविषयीच्या लेखाचे. सर्वप्रथम त्या लेखाला प्रतिसाद देण्याचा विचार केला.

हुरहुर

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 22/08/2008 06:22 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नातली फुले ती, सत्यात कां न दिसली? मज जाग जरा येता, ती रात कां हरवली? रात्रीत प्यायले होते, मी अश्रु यक्षीणीचे विरही व्यथेत ओले, मृदुगंध पापणीचे येता रवी उदयास, ती आसवेही सुकली मज जाग जरा येता, ती रात का हरवली? होता मनात माझ्या, कोपरा उजळला एक कवडसे नृत्य करीत, लयबद्धसे सुरेख ती उजळताच प्राची, सावली अंतरी धरली मज जाग जरा येता, ती रात का हरवली? मज सूर गवसला जो, कोठे हवेत विरला? ती साद ऐकू ये ना, स्वप्नील भाव सरला जाणीव करूनी सुन्न, जाणीव कां परतली? मज जाग जरा येता, ती रात का हरवली? पाहीले रुप सुंदर, तव नयनी मी बुडालो मी गमविले स्वतःला, माझाच मी न उरलो अस्तीत्व कां मिळाले?

'बिग बॉस' आणि तुमचं मत !

लेखक संदीप चित्रे यांनी शुक्रवार, 22/08/2008 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
ही बातमी वाचलीत ? 'बिग बॉस' ह्या रिऍलिटी शोच्या दुसर्‍या भागात आपल्याला सहभागी होण्यासाठी बोलावूनही जातीच्या आधारावर आपल्याला वगळण्यात आले आहे / डावलण्यात आले आहे अशी तक्रार खा. आठवले ह्यांनी केली आहे ? मिपावरची संवेदनशील चर्चा वाचून उत्सुकता वाटली की इथल्या माझ्या मित्र / मैत्रिणींना ह्या बातमीबद्दल काय वाटतं पहावं. जर जातीच्या आधारावर रिझर्व्हेशन, बढतीमधे प्रेफरन्स इ. गोष्टींचा लाभ उठवणं वावगं नसेल तर जातीच्याच आधारावर डावलले गेल्यास तक्रार करणे योग्य आहे का ?

भीमाशंकर

लेखक ॐकार यांनी शुक्रवार, 22/08/2008 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
दोन आठवड्यांपूर्वीच्या तुफान पावसात भीमाशंकर आणि आसपासच्या गावात भटकंती चालू होती.