Skip to main content

आम्ही बाराक ओबामाला मत देऊन पण टाकलं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 22/10/2008 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
"अजून ४ नोव्हेंबर उजाडायचा आहे.तो मतदानाचा दिवस आहे मग त्या अगोदर मत देणं कसं शक्य आहे?" असं आपण म्हणाल.पण खरं सांगू हीच तर अमेरिकेत गम्मत आहे.इथे स्वातंत्र्याला सिमा नाही.मात्र फक्त ते सर्व कायद्दात असलं पाहिजे.हम करे सो कायदा नाही चालत.आणि तसा काही अन्याय वाटला तर जा कोर्टात आणि मांडा तुमची कैफियत.कोर्टपण तत्पर असतं.

शंभर प्रश्न हवे आहेत.

लेखक रामदास यांनी बुधवार, 22/10/2008 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
कोजागीरी या विषयावर मी आणि माझे शास्त्री स्नेही बोलत होतो. रात्री लक्ष्मी येते आणि को जागर्ती ? असा प्रश्न विचारते आणि जे लोक जागे असतील त्यांचे घरी येते वगैरे माहीती होतीच पण मी शास्त्रींना विचारले यापेक्षा काहीतरी वेगळे कारण असावे असं वाटतं मला , तुम्ही काही माहिती सांगू शकाल का? शास्त्री हसले आणि म्हणाले होय . मनाला पटेल अशी एक कारण परंपरा या कोजागीरीच्या पाठीमागे आहे.त्यांनी सांगीतलेली माहीती अशी: शरदात दोन पौर्णीमा येतात. आश्वीनी नक्षत्रात कोजागीरी आणि कृत्तीका नक्षत्रावर कार्तीकी पौर्णीमा. आश्वीनी नक्षत्राचे स्वामी अश्वीनीकुमार .देवांचे वैद्य. कृत्तीकेचे स्वामी अग्नी.

विलास देशमुखांना खुले पत्र !

लेखक मयुरेशवैद्य यांनी बुधवार, 22/10/2008 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
विलास देशमुखांना खुले पत्र. बहुतेक वेळा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना "माननीय" असे संबोधण्याची प्रथा आहे. पण आपणाबाबत आता असे म्हणावेसे वाटेनासे झाले आहे. गेल्या काही वर्षात आपण व आपल्या पक्षाने महाराष्ट्राचे नक्की काय भले केले काही कल्पना नाही. मुंबईत बड्या बिल्डरांचे मॉल्स आलेत, गिरणगावातून मराठी हद्दपार होतेच आहे, शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे, विजेचा प्रश्न तसाच, टाटांची नॅनो महाराष्ट्राला हुलकावणी देऊन गुजराथाला निघून गेली. गेली काही वर्ष आपण मुंबईला शांघाय करण्याच्या वावड्या उठविल्या होत्या.

रेल्वे भरती ची माहिती हवी.

लेखक कलंत्री यांनी बुधवार, 22/10/2008 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी माझ्या एका सहकार्‍याशी ( तसा तो सिंधी आहे आणि गुजरात मध्ये पूर्वी नौकरी करीत असे) रेल्वे भरती कशी होते याबद्दल चर्चा करत होतो. त्या माहितीच्या आधारे हा लेख लिहित आहे. माझे समज ( याबद्दलच्या माहिती फक्त काही प्रांतातच येतात, त्या प्रांताच्या लोकांना वेगळी अशी वागणुक / सवलत मिळते, नेहमीप्रमाणे मराठी लोकाना डावलले जाते, अश्या जाहिराती मराठी वर्तमानपत्रात कधीच येत नाही, रेल्वे ही काय एका विशिष्ठ प्रातांचीच मक्तेदारी आहे काय? इत्यादी इत्यादी मी मुद्दे मांडले.) त्यावर त्याचे उत्तर मी मराठीत देत आहे -> अश्या परिक्षा देशातल्या वेगवेगळ्या भागात होत असतात.

अलौकिक

लेखक द्विज यांनी बुधवार, 22/10/2008 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
अलौकिक मैत्री आलोच होतो मी नाविण्याची इथे अनुमति घेउन अज्ञानाचे अलन्कार ह्रुदयावर लेवुन एक तुच मला इथे आपलीशी वाटली सारीच सद्भावना माझी तुझ्यापाशी दाटली नसेल पाहिले मी तुला कधी सात जन्मातही पण ह्रुदयातला गाभा ओळखण्यास्तव नजर लागत नाही आपुलकीशिवाय जीव तान्हाच असतो मुळी स्वभावाशिवाय तुझ्या जीव फुलत नाही मैत्री दिग॑तराचे ओजस्वी तार छेडो आपली त्याशिवाय जगाचे पान सुद्धा हलत नाही
Taxonomy upgrade extras

एक महत्वाची सूचना...

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 22/10/2008 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव डॉट कॉमच्या (मिपा) सर्व सभासदांकरता एक महत्वाची सूचना - मिपावर राजकीय अथवा सामाजिक परिस्थितीबाबत लिहीताना प्रक्षोभक, भडकावु, भावना उत्तेजीत करणारे,चिथावणीखोर, कुणाला पर्सनली टार्गेट करणारे शब्द ( जसे की बिनडोक, मेंटल, गुलछबु, षंढ ) वापरणे कटाक्षाने टाळावे. कायद्याच्या भाषेत ह्या गोष्टी गुन्ह्याच्या कक्षेत येतात. ह्यासाठी आपल्यावर "अब्रुनुकसानीचा गुन्हा, भावना भडाकवल्याचा, चिथावणी दिल्याचा गुन्हा " दाखल होऊ शकतो. असे कुठलेही लेखन येथे आढळल्यास ते येथून त्वरीत उडवून लावले जाईल व संबंधित सदस्याचा आयडी व आयपी ऍड्रेस ब्लॉक केला जाईल.

सावली

लेखक राघव यांनी बुधवार, 22/10/2008 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
मागे एकदा श्रीवर्धनला गेलो असतांना किनार्‍यावर मस्त वातावरण होते. त्या पार्श्वभूमीवर सावलीच्या माध्यमातून विरह मांडण्याची कल्पना सुचली. ती हुरहुर शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न!!
Taxonomy upgrade extras

ससा आणि कासव

लेखक अरुण वडुलेकर यांनी बुधवार, 22/10/2008 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
ससा आळसाने आणि आपल्या वेगाच्या घमेंडीने झाडाखाली झोपला आणि मागाहून आलेल्या कासवाने शर्यत जिंकली. ससा जागा झाला तसा कासवाने शर्यत जिंकलेली पाहून वास्तवाचा स्वीकार करण्याऐवजी संतापला. कासव जलचर आहे आणि आम्हा वनचरांच्या वनात येऊन आमच्यावर कुरघोडी करण्याचा त्यांना कांही एक अधिकार नाही असा घोष करू लागला. या वनावर आम्हां वनचरांचाच केवळ हक्क आहे. जलचरांनी येथून हद्दपार झाले पाहिजे असा डंका पिटू लागला. त्याच्या गर्जनांनी सगळे जंगल दणाणून गेले. वाघ,सिंह, लांडगे, कोल्हे सशाच्या गर्जनांचा आपापल्या परीने विचार करू लागले. पण नुसतेच विचार करीत राहिले.