हिंदूंनो, दिवाळीच्या सणातील पाश्चात्त्यांचे अंधानुकरण टाळा !
सध्या दिवाळीत विद्युत् सजावट, अनाठायी रोषणाई, नको तेवढा फटाक्यांवरील खर्च, आतषबाजी इत्यादी गोष्टींना अवास्तव महत्त्व दिले जात आहे. या सर्व बाह्य दिखाऊपणाने आता हळूहळू आमच्या धार्मिक कृती व प्रतीके यांवरही हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय आता हळूहळू पाश्चात्त्यांचे अनुकरण करू लागले आहेत; परंतु भारतीय संस्कृतीने दिलेला प्रत्येक विचार, परंपरा व तिची प्रतीके यांमागे एक शास्त्रसंमत अशी बैठक आहे, हे धर्मशिक्षणाच्या अभावामुळे त्यांच्या लक्षात येत नाही. पुढच्या पिढीला तर हे माहीतही होणार नाही, अशी स्थिती आहे.