मसूराची आमटी
टीप -ही आमटी एकदा आमचे एक घराचे स्नेही श्यामराव म्हणून होते त्यांनी माझ्या लहानपणी हौशीने आमच्या घरी येऊन केली होती असे आठवते. आमच्या आजीचे अनेकांशी घरातल्यासारखे संबंध होते, त्यातील हे एक. त्यांच्याबरोबर त्यांच्या घरची मंडळीही कधीकधी येत. बाहेरची बरीच मंडळी आली की घाउक प्रमाणावर करता येतील असे पदार्थ आमच्या घरी होत. तेव्हा मी फारच लहान होते (८-९ वर्षांची) त्यामुळे सर्व जिन्नस माहिती करून घेतले नसणार याची खात्री आहे. त्यानंतर त्या आमटीत थोडेफार बदल करून आमच्या घरी ती होतच राहिली. पूर्वी आमच्या गावी घरोघरी सायकलवर ब्रेड विकायला एक ब्रेडवाला येत असे.
मिसळपाव