अघोषित युद्ध..!
मुंबैवरचा आतंकवादी हल्ला अजूनही सुरूच.. ताजमध्ये अतिरेक्यांनी पुन्हा फायरिंग ओपन केलं आहे..
छाबडा हाऊसमध्ये बेछुट गोळीबार.. तेथे एक इस्रायली कुटुंब ओलीस. नरिमन हाऊसमध्येही अतिरेकी घुसले आहेत..ओबेरॉय हॉटेलात लष्करी कारवाई जोरात सुरू.. मर्चंट हाऊसमध्येही अतिरेकी लपल्याची शंका..
विधानभवनासमोर दोन हॅन्ड ग्रेनेड मिळाले तेही पोलिसांनी निकामी केले आहेत...अतिरेक्यांकडे ग्रेनेड, एके ४७, एके ५७ यासारखी हत्यारे बर्याच मोठ्या प्रमाणावर असल्याचा अंदाज..
आता हा हमला केवळ मुबईवर नसून भारतावरच आहे, भारताच्या सार्वभौमत्वावर आहे!
मिसळपाव