मित्रांनो ,
आपल्या या आवडत्या संकेतस्थळावर होणार्या हल्ल्याबद्दल, त्यावरील उपाययोजनांबद्दल , सर्व्हरच्या वेगाबद्दल , तो वाढवण्याबद्दल , वर्गणीबद्दल आपण सर्व इथे आपापले विचार मांडतच असतो. हा धागाही या संकेतस्थळाबद्दलचाच आहे.
अलिकडच्या काळात एक संपादक म्हणून आणि एक मित्र म्हणून मला काही व्य नी आले की , अवांतर प्रतिसाद , थट्टा मस्करी वगैरेचे प्रमाण खूप वाढले आहे आणि मुख्य म्हणजे, जिथे एखाद्याने एखादे मनोगत/चर्चाप्रस्ताव मांडला आहे तिथेही हेच घडल्याचे प्रकारही घडले आहेत. या संदर्भात संपादक मंडळाची काही जबाबदारी आहे की नाही ?