अवांतर प्रतिसाद आणि गप्पा
नमस्कार मंडळी,
मराठी संकेतस्थळांवर वावरायला लागल्यापासून 'अवांतर' या शब्दाची विशिष्ट छटा लक्षात यायला लागली. हा शब्द अनेकदा वापरला गेलेला पाहिला. अवांतर लेखनाबद्दल आपली मते जाणून घ्यावीत असे वाटल्याने काथ्याकूटासाठी हा प्रस्ताव मांडत आहे.
एखाद्या लेखामध्ये किंवा चर्चेमध्ये प्रतिसादात सदस्य काही उपमा देतो, मजेने काही लिहितो. वाचणार्याला वाटते की आपण दाद द्यावी. (इथेच अवांतर प्रतिसादाला सुरुवात होत असावी.) मग तो दाद देतो किंवा अजून काही भर घालतो. आता ज्याला उपप्रतिसाद आला आहे तो सौजन्य म्हणून त्वरित उत्तर देतो. या मध्ये हे उत्तर म्हणजे अक्षरशः मूळ लेखापेक्षा पूर्ण वेगळे होते.
मिसळपाव
माथेरानमधिल लेक ( शार्लॉट लेक )