आपली ऑपरेटींग सिस्टीम अपडेट आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आपण अनेकदा वेबसाईटवरुन वेगवेगळे पॅचेस, सिक्युरीटी अपडेटस, सर्व्हिस पॅक्स डाउनलोड करत असतो. पण आपल्या दुर्दैवाने आपली ओएस क्रॅश होते. विंडोज ऑपरेटींग सिस्टीम वापरणार्या बर्याच जणांना हा अनुभव असेल. ओएस इन्स्टॉल केल्यानंतर पुन्हा आपला पीसी पुर्ववत होण्यासाठी परत सगळे पॅचेस, सिक्युरीटी अपडेटस, सर्व्हिस पॅक्स इन्स्टॉल करावे लागतात. कारण आपल्याकडे ऑपरेटींग सिस्टीमची फक्त बेसिक इन्स्टॉलेशनची सीडी असते. कधी कधी ह्या सीडी मध्ये आवश्यक असे ड्रायव्हर्स नसतात. ते आपल्याला परत टा़कावे लागतात. ह्या सगळ्या प्रकारात बराच वेळ जातो. ह्या सगळ्या कटकटींपासुन सुटका करण्यासाठी आपण करुया आपल्या काँप्युटरसाठी कस्टमाईझ केलेली सीडी, ज्यात असतील तुम्हाला लागणारे सर्व ड्रायव्हर्स ,पॅचेस, सिक्युरीटी अपडेटस आणि सर्व्हिस पॅक्स!!!
यासाठी लागेल डॉटनेट फ्रेमवर्क २.०, nLite 1.4.9.1, तुमची विंडोज ऑपरेटींग सिस्टीमची बेसिक सीडी आणि तुम्हाला लागणारे सगळे ड्रायव्हर्स ,पॅचेस, सिक्युरीटी अपडेटस आणि सर्व्हिस पॅक्स.
१. डॉटनेट फ्रेमवर्क २.० मायक्रोसॉफ्टच्या साईटवर मिळेल. सध्या लेटेस्ट .नेट फ्रेमवर्क ३.५एसपी१ आहे. ते टाकले तरी चालेल. मी २.० टाकले आहे.
२. http://www.nliteos.com/ या साईटवरुन nLite 1.4.9.1 डाउनलोड करा.
३. ऑपरेटींग सिस्टीमची बेसिक सीडी तुमच्याकडे असेलच.( नसली तर तुम्हाला शक्य असलेल्या सर्व उपायांनी मिळवा!! :) म्हणजे खरेदी अथवा कॉपी, टॉरेंट, पी२पी, इत्यादी... )
४. ड्रायव्हर्स तुमच्या काँप्युटरच्या उत्पादकाच्या साईटवर मिळतील. बाकी पॅचेस, सिक्युरीटी अपडेटस आणि सर्व्हिस पॅक्स साठी मायक्रोसॉफ्ट आहेच!
माझ्याकडे विंडोज एक्सपी सर्व्हिस पॅक १ ची सीडी आहे. या सीडीमध्ये मी एक्सपी सर्व्हिस पॅक ३ आणि साटा ड्रायव्हर इंटीग्रेट केला. (साटा ड्रायव्हरमुळे तयार होणरी नवी सीडी लॅपटॉपवर एक्सपी इन्स्टॉल करण्यासाठी सुद्धा चालेल!!! :) )
कॄती:
१. सर्वप्रथम डॉटनेट फ्रेमवर्क इन्स्टॉल करा. त्यानंतर nLite इन्स्टॉल करा.
२. एक्सपीची सीडी तुमच्या हार्डडिस्कवर कॉपी करा. लागणारे सर्व ड्रायव्हर्स ,पॅचेस, सिक्युरीटी अपडेटस आणि सर्व्हिस पॅक्स एका वेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह करा.
३. nLite सुरु केल्यावर येणार्या विंडोमध्ये तुम्ही कॉपी केलेल्या एक्सपी फोल्डरचा पाथ द्या. पाथ दिल्यावर तुमच्या सीडीविषयी माहिती दिसुन येइल.
४. नेक्स्ट क्लिक केल्यावर आधीचे सेशन लोड करायची विंडो येइल. nLite पहिल्यांदाच रन केलेले असल्याने सेशन नसतील. पुन्हा नेक्स्ट क्लिक!!
५.आता येते टास्क सिलेक्शनची विंडो. मी सर्व्हिस पॅक आणि साटा ड्रायव्हर इंटीग्रेट करणार असल्याने फक्त लागणारे ऑप्शन्स सिलेक्ट केले.
६.सर्व्हिस पॅकच्या .exe फाईलचा पाथ सिलेक्ट बटनावर क्लिक करुन द्या. सर्व्हिस पॅकच्या फाईल्स एक्सॅट्रॅक्ट करुन nlite त्या फाईल्स विंडोजच्या सेटअपमध्ये इंटीग्रेट करेल. ही सर्व प्रोसेस झाल्यावर तुम्हाला तुमच्या सेटअपची व्हर्जन बदलल्याचे दिसुन येइल.
७. आता येइल ड्रायव्हर सिलेक्शनची विंडो. यात ड्रायव्हरसोबत असलेल्या .inf फाईलचा पाथ द्यावा लागेल. त्याबरोबर nlite .inf फाईलमध्ये असलेले सगळे ड्रायव्हर्स दाखवेल. हे ड्रायव्हर्स कुठल्या मोडमध्ये (पीएनपी की टेक्स्टमोड) इन्सर्ट करायचे हे सिलेक्ट करावे लागेल. पीएनपी म्हणजे प्लग & प्ले. या मोडमध्ये इन्सर्ट केलेले ड्रायव्हर्स विंडोज सुरु झाल्यावर लोड होतील. टेक्स्टमोड मध्ये इन्सर्ट केलेले ड्रायव्हर्स विंडोज सुरु होताना म्हणजे बूट होताना लोड होतील. आता मी टेक्स्टमोडमध्ये ड्रायव्हर्स इन्सर्ट केले.
८.ड्रायव्हर्स इंटीग्रेट केल्यावर .iso फाईल तयार करण्याची प्रोसेस चालू होइल. ही .iso फाईल तुमच्या ड्राईव्हवर सेव्ह करा. किंवा तुम्हाला हवे असल्यास डायरेक्ट सीडीवर राईट करा.
९. .iso फाईल तयार झाल्यावर कस्टमायझेशन फिनिश्ड म्हणून विंडो येइल. ही .iso फाईल निरोमधून सीडीवर राईट करता येइल.

वाचन संख्या
3980
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
मदत करा
बरोबर. आपल्
In reply to मदत करा by अनंत छंदी
लायनक्समध्ये
In reply to बरोबर. आपल् by लिखाळ
अच्छा..
In reply to लायनक्समध्ये by आजानुकर्ण
दुरुस्त केला आहे....
In reply to बरोबर. आपल् by लिखाळ
माहिती नाही....
In reply to मदत करा by अनंत छंदी
महत्वपुर्ण माहिती
>>माहितीबद्
In reply to महत्वपुर्ण माहिती by चैतन्यकुलकर्णी
चुक
>>३.
In reply to चुक by आनंदयात्री
हो गुन्हा आहे.
In reply to >>३. by ३_१४ विक्षिप्त अदिती
खरेदी...
In reply to हो गुन्हा आहे. by आनंदयात्री
आयएसओ इमेज
झकास आहे हे