Skip to main content

निरव पावले (अनुवाद-गीतांजली)

लेखक लिखाळ यांनी शनिवार, 20/12/2008 04:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, रविंद्रनाथ टागोरांच्या गीतांजली काव्यसंग्रहातील एका गीताचा स्वैर अनुवाद करायचा प्रयत्न करत आहे.
निरव पावले तुम्ही ऐकली नाहित का त्याची निरव पावले? तो येतो, येतो, नेहमीच येतो प्रत्येक क्षणी प्रत्येक काळी प्रत्येक दिवशी प्रत्येक रात्री तो येतो, येतो, नेहमीच येतो गायली आहेत मी अनेक गाणी मनाच्या विविध स्थितींमध्ये, परंतु त्यांच्या सुरावटीने नेहमी हेच उद्घोषित केले, 'तो येतो, येतो, नेहमीच येतो' स्वच्छ सुगंधी वसंतात रानवाटांनी तो येतो येतो, नेहमीच येतो आणि पावसाळी गूढ रात्री गडगडाटी ढगांच्या रथातून लखलखत,
Taxonomy upgrade extras

एक होता पिझ्झा..

लेखक प्राजु यांनी शनिवार, 20/12/2008 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
डिक्लेमर : ज्यांनी पिझ्झा आवडतो आणि करायची इच्छा आहे त्यांनी आवर्जून वाचावे आणि ज्यांना आवडत नाही पण करायची इच्छा आहे त्यांनी ही वाचावे पण ज्यांना दादरच्या प्रकाश हॉटेलमधील भाजणीचं थालीपीठच फक्त आवडतं... त्यांनी जमले तर वाचावे.. म्हणजेच काय ज्यांना वाचायचे त्यांनी वाचावे.. पण यातील घटनांशी तुमचा संबंध आहे असे जाणवले तर लेखिकेला नक्की विचारावे.. :) मंडळी, लहानपणापासून तशी मला कुकिंगची (स्वयंपाकाची नव्हे) भारी आवड. तसंही मिपाची एक नंबरची सुगरण ठरले आहे मी..(काय म्हणालात...कोणी ठरवलं??........... ते ... .. हां.. मी आणि एक प्राजु म्हणून आहे मिपावर...

मी भुत पहिले आहे...(विश्वास नाही बसत...? माझा पण विश्वास नाही बसत)

लेखक राम दादा यांनी शनिवार, 20/12/2008 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार होता....आई सोमवारी गावी जाणार होती. आक्काकडे ..माझी बहिण ( आक्का)..आक्काने चटणी आणायला सांगितली होती येताना. घरच्या मिरच्या होत्या.

माझ्याच त-हा

लेखक स्वाती फडणीस यांनी शुक्रवार, 19/12/2008 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याच त-हा =========================== . . सांभाळलेला गारवा.. सांभाळलेला झरा.. अन तो सांभाळलेला कवडसा.. नाहीच मुळी मजहून वेगळा. . मीच गारवा मीच झरा. ऊन कवडसे माझ्याच त-हा!! अवखळ वेल्हाळ धबधबा लागला आता सपाटीला. . खंडी खंडी गाळतळा माझ्याच मी दाबला. एक प्रवाह अन किती धारा.. ओळखेना माझॆ मला!! . तो पहिला वेगळा माझा थेंब कोणता?...... . . ========================== स्वाती फडणीस...................... २००७

सशस्त्र क्रांति / लढ्याच्या मर्यादा.

लेखक कलंत्री यांनी शुक्रवार, 19/12/2008 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर सशस्त्र क्रांतिकारकांच्या लढ्याबद्दल नियमित लेख प्रसिद्ध होत असतात. याचा एक अर्थ सरळ सरळ असा आहे की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी क्रांतिकारकाचे भरीव योगदान आहे. दुसरा अर्थ असाही आहे की भारतीय जनमाणसाला क्रांतिकारकाचे अप्रुप वाटत असले तरी तत्कालिन राजकारणातील मुख्यलढ्याच्या समोर हा लढा तसा निष्प्रभ ठरत होता. पुढील विवेचन करण्याअगोदर काही स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. एकतर भारतातील एकंदरीतच सर्वच स्वातंत्र्य सेनानी आदर्शवादाने भारावलेले होते, त्यांचे मनोबल उच्चदर्जाचे होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे वर्तन, चरित्र हे निष्कंलक होते.

मदत हवी आहे.

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 19/12/2008 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक लंगोटीयार सध्या पुण्यातून मनीला (फिलीपाईन्स) इथे स्थलांतरित झालाय. सध्या तो एकटाच तिकडे गेलाय. थोड्याच दिवसात घर शोधून कुटूंब स्थलांतरित करेल. मिसळपावकरांपैकी कोणी मनीला इथे आहेत का? माझ्या मित्राला घर शोधायला मदत करु शकेल अशी माहीती कोणाला असल्यास कृपया व्य. नि. तून संपर्क साधावा. धन्यवाद! चतुरंग

मैलाचा दगड

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 19/12/2008 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर बरेच काथ्याकूट होतात. त्यात बर्‍याच शाब्दिक मारामार्‍याही होतात. त्यात गैर काही नाही. परंतु, नुकतीच "बंगालच्या वाघीणी" ही चर्चा झाली. मला ती बर्‍याच दृष्टीने मैलाचा दगड ठरली अशी वाटते. इतरांची मते जाणून घ्यायला आवडेल. पूर्वी साधारणतः असा एक क्रम होता- स्वातंत्र्यलढ्यातील एखाद्या क्रांतीकारकावर अथवा एखाद्या घटनेवर लेख येणार. लेखात वा कुठल्यातरी प्रतिसादात संबंध असो वा नसो, गांधीजींचा उल्लेख येणार. गांधींवर तोंडसुख घेतले जाणार. उर्वरीत प्रतिसाद हे बव्हंशी "सादर प्रणाम", "तुमच्यामुळेच आम्ही आहोत" या छापाचे. ह्याला छेद गेला तो वर उल्लेख केलेल्या लेखाने.