Skip to main content

छायाचित्र टीका

लेखक गणा मास्तर यांनी शनिवार, 20/12/2008 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
nikko निक्को नावाच्या जपानमधील पर्यटनस्थळी गेलो असताना काढलेला हा फोटो. खरेतर पानगळ चालु होती, पण ह्या शेवाळाचेच छायाचित्र चांगले आले. अवांतर : सदर छायाचित्र मीच काढले आहे आणि उपक्रमवरही डकविलेले आहे.

आपलेच दात, आपलेच ओठ!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 20/12/2008 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपलेच दात, आपलेच ओठ! ---------- मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यांचा तणाव सुरक्षा दलांबरोबरच सगळ्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना जाणवत होता. सुमारे तीन आठवडे हा तणाव घेऊन वावरणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. देशावरचा हा सर्वांत मोठा हल्ला होता. काहींनी त्याची गणना 11 सप्टेंबरच्या अमेरिकेवरील हल्ल्याशीही केली होती. विशेष म्हणजे पाकिस्तानी दहशतवादाविरोधात या वेळी सर्वच राजकीय पक्ष एकत्र आले होते. पाकिस्तानचा निषेध एकमुखाने केला होता आणि कठोर पावले उचलण्याची मागणीही करत होते. एवढे दिवस हा तणाव सगळ्यांनाच असह्य झाला होता...त्यातून सुटका प्रत्येकालाच हवीहवीशी वाटत होती.

(संपेल ना कधीही , हा खेळ दहशतीचा!! )

लेखक अमोल केळकर यांनी शनिवार, 20/12/2008 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
चाल : रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा ----------------------------------------- रात्रीत गेम झाला, वस्तीतल्या गुंडाचा! संपेल ना कधीही , हा खेळ दहशतीचा!! हा गुंड ना स्वयंभू, जामिन राहतो हा दंग्यात माणसांच्या, जाळपोळ करतो हा पोलीस होई साथी, हा दूत शासनाचा संपेल ना कधीही , हा खेळ दहशतीचा!! खंडणी मागती हा, बॉलीवुडला शाप जे 'भाई' सांगती ते करती आपोआप हसतात नशिबाला हा दोष जाणीवांचा!

मैत्रीण नसलेल्या मित्रांसाठी !

लेखक अनिरुद्धशेटे यांनी शनिवार, 20/12/2008 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्रीण नसलेल्या मित्रांसाठी ! मैत्रीण मैत्रीण नाव आहे. माझ्या मनाच एक गाव आहे तिच्याशिवाय कुणासासाठीही न उघड्णारं या गावाला एक दार आहे ! नको शब्द नको यमक तिची साथ फक्त हवी आहे लिन्गभेदाच्या या बुरसटलेल्या जगात आमच वेगळ विश्व आहे ! निर्मळ मनाचे पाप नको अन वासनेच्या कुशीतल पुण्यही नको आमच्या दोघान्च्या मैत्रीला चंद्रावरल्या हरणाचाही डाग नको ! ह्या विश्वाच्या अंतापर्यंत आपली मैत्री माझ्या ह्रदयात राहणार आहे आणी कल्पांतानंतर माझ मन आपल्या अम्रुतमयी मैत्रीची गाणी गाणार आहे ! अनिरुद्ध
Taxonomy upgrade extras

मोफत जादुची झप्पी

लेखक दवबिन्दु यांनी शनिवार, 20/12/2008 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
एक मानुस होता. जुआन माण नावाचा. तो सिडनीला आपल्या घरी चाल्ला होता. विमानतळावर पाहिलं तं कोनीच त्याला घ्यायास आलेलं नव्हतं. आजुबाजुला सर्वजनांचे नातलग आल्ते. एकमेकांना मिठि मारुन राहिले होते. त्याला खुप दु:ख वाटुन राहिले. की आपल्याला कोनीच भेटायला आलेलं नाही. मग त्याने एक मोठा पुट्ठा, रंगीत पेनं विकत घेतली. त्यावर दोनी बाजूला लिहलं Free Hug - मोफत जादुची झप्पी आनि उबा राहिला लोकान्च्या मधे जाउन. लोक त्याच्याकडं पाह्यचे फुडे जायचे. मग एक बाई थाबली. त्याला म्हनाली, माझं कुत्र मेलं आज सकाली. आनि माझ्या मुलीची आजच पहिली बरसी आहे. ती गेल्या वर्षी अपघातात मरन पावली.

ऊर्जा संवर्धन दिवस १४ डिसेम्बर

लेखक अमोल नागपूरकर यांनी शनिवार, 20/12/2008 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
१४ डिसेम्बर हा ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्याला उपल्ब्ध असलेली ऊर्जा ही बहुतेक करुन लवकर नष्ट होणारे आणि मर्यादित नैसर्गिक स्रोतान्पासून निर्माण होते. ज्या इन्धनाला तयार होण्यास ३० लाख वर्षे जावी लागली त्याच ६० टक्के भाग आपण गेल्या २०० वर्षातच खर्च केला आहे. आपल्या देशाला पेट्रोलियम उत्पादने आयात करावी लागतात. त्यमुळे आपल्याला परकीय चलन तर खर्च करावे लागतेच पण आपली ऊर्जा सुरक्षा धोक्यात येते. शिवाय अशाप्रकारे होणारया ऊर्जा निर्मितिमुळे पर्यावरणाचीही अपरिमित हानि होते आहे. इ स १८६० पेक्षा आजचे जागतिक ताप्मान जवळ पास ०.७५ अंशाने वाढले आहे.

शेपु भात

लेखक स्नेहश्री यांनी शनिवार, 20/12/2008 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
माझे बाबा नेहमी सांगतात आम्हाला की जे पोटासाठी चांगलं ते चवीला वाईट आणि जे चवीला चांगलं ते पोटाला वाईट. काही चवीला उग्र अश्या भाज्या आपल्याला आवडत नाहीत जसा शेपु. शेपू ही भाजी चवीला उग्र असली तरी ती पोटाच्या आरोग्यासठी उत्तम अशी भाजी आहे. शेपू भात. २ वाटी तांदूळ २कांदे उभे चिरुन १+१/२ वाटी बारीक चिरलेला शेपू ५/६ लसणीच्या पाकळ्या बारिक वाटुन २/३ मोठे चमचे लोणी २ चमचे तिखट मीठ चवीनुसार ४-४ प्रत्येकी लवंग , मिरीचे दाणे ४ वाट्या आधणाचे पाणी तूप प्रथम २ वाटी तांदूळ धुवून कोरडे करुन घ्यावेत. नंतर एका जाड बुडाच्या पातेल्यात लोणी घाला.मग ते वितळू लागल्यावर त्यात लवंग , मिरीचे दाणे घाला.

विहंग तो विहरता झाला...

लेखक स्वाती फडणीस यांनी शनिवार, 20/12/2008 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
विहंग तो विहरता झाला... =========================== . . तडफडला फडफडला पक्षी जीवाकांताने कळवळला.. साद घातली काळाला ने.. ने.. मजसी वदला.. . खुरडत खुरडत सरपटला भाजला.. सोलवटला.. प्राणासहीत निश्चल पडला वेदनांनी पिळवटला..! . मंद मंद धुगधूग जिवात.. जमले कावळे टोचण्या! घाबरला.. थरथरला.. हालला..! बळ एकवटून फडफडला.. . जागच्या जागी फरफटला.. खाल्ल्या दोन-चार गटांगळ्या..! ठुसठूसत्या पसरून पंखांना विहंग तो विहरता झाला... . . =========================== स्वाती फडणीस ......................... ०१-०४-०७
Taxonomy upgrade extras

सासरेबुवा

लेखक अंकुश चव्हाण यांनी शनिवार, 20/12/2008 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
सासरेबुवा सासरेबुवा सासरेबुवा काय तुमची कथा, अहो काय तुमची कथा? तुमची होते गंमत मात्र आमची होते व्यथा. अहो काय तुमची कथा. सासरेबुवा सासरेबुवा काय तुमची शिस्त, अहो काय तुमची शिस्त? एकावेळी नाश्त्याला दोन कोंबड्या फस्त. अहो काय तुमची शिस्त? सासरेबुवा सासरेबुवा काय तुमची करणी, अहो काय तुमची करणी? तुमच्या आकारापुडे फिकी पडते बरणी. अहो काय तुमची करणी? सासरेबुवा सासरेबुवा काय तुमची पोट, अहो काय तुमची पोट? एकावेळी लागतात तुम्हाला चार जणांचे कोट. अहो काय तुमचे पोट? सासरेबुवा सासरेबुवा काय तुमच्या मिशा, अहो काय तुमच्या मिशा? आता कळले सासुबाई घाबरतात कशा. अहो काय तुमच्या मिशा? सासरेबुवा सासरेबुव
Taxonomy upgrade extras