१४ डिसेम्बर हा ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्याला उपल्ब्ध असलेली ऊर्जा ही बहुतेक करुन लवकर नष्ट होणारे आणि मर्यादित नैसर्गिक स्रोतान्पासून निर्माण होते. ज्या इन्धनाला तयार होण्यास ३० लाख वर्षे जावी लागली त्याच ६० टक्के भाग आपण गेल्या २०० वर्षातच खर्च केला आहे. आपल्या देशाला पेट्रोलियम उत्पादने आयात करावी लागतात. त्यमुळे आपल्याला परकीय चलन तर खर्च करावे लागतेच पण आपली ऊर्जा सुरक्षा धोक्यात येते.
शिवाय अशाप्रकारे होणारया ऊर्जा निर्मितिमुळे पर्यावरणाचीही अपरिमित हानि होते आहे. इ स १८६० पेक्षा आजचे जागतिक ताप्मान जवळ पास ०.७५ अंशाने वाढले आहे. ते ह्या शतकाच्या शेवटि ६ अंशानी वाढण्याची शक्यता आहे.
ह्या सर्वान्वर ऊर्जा संवर्धन हा एकच उपाय आहे.
ऊर्जा संवर्धन म्हणजे परिणामात फरक न करता ऊर्जेचा न्याय्य उपयोग आणि ऊर्जेच्या वापराचे प्रमाण कमी करणे. ऊर्ज वाचवणे हे ऊर्ज निर्माण करण्यापेक्षा खूप सोपे आणि बिनखर्चाचे आहे. त्याचे काहि उपाय खालिलपैकी आहेत.
१) तुम्हाला काम नसेल तेव्हा तुमचा पीसी /लैपटोप शट डाऊन करा. तसेच गरज नसेल तेव्हा दिवे, पंखे आनि इतर विजेची उपकरणे बन्द ठेवा.
२)तुमच्या एसी चे टेम्प सेटिन्ग २५ अंशान्वर ठेवा.
३) औफिसला जाताना कार पूलीन्ग चा उपयोग करा.
४) सी एफल दिव्यान्चा उपयोग करा.
आपण आपल्या दैनन्दिन आयुष्यात वीज आणि ऊर्जा वाचवून आपला आणि देशाचा विकास करू या.
वाचन संख्या
8563
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी
जवळ्पास
In reply to भारी by विनायक प्रभू
आणखी काही ...
In reply to भारी by विनायक प्रभू
उत्तम
छान चर्चा.
खी
आणखी काही उपाय
आणखी काही उपाय -२