Skip to main content

शि़क्षण

लेखक श्रेया यांनी मंगळवार, 13/01/2009 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
माहिती हवी आहे एकोनोमिक्स घेउन बि.ए केल्यास करिअर सुचवा

गवार

लेखक जृंभणश्वान यांनी मंगळवार, 13/01/2009 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
समिधाताईंनी दिलेली गवारीच्या पुर्‍यांची ही पाककृती वाचून गवारीच्या आठवणीने जीव व्याकुळ झाला. कविता अर्थातच रद्दड आहे, पण गवारीच्या प्रति व्यक्त केलेल्या भावना प्रामाणिक आहेत. *** गवार बारकुळी ती, हिरवी हिरवी, छान कोवळी, गवारशेंग मला हवी कुटाबरोबर वाफवलेली, छान रटरटीत शिजवलेली, गवारशेंग मला हवी भले कितीही गोड मटार, फोलपटे बेचव त्याची, पापुद्रयासहित दाण्यांची, गवारशेंग मला हवी आडदांड तो फ्लॉवर केवढा, सात्विक तो श्रावण घेवडा, दुध्याचा डौलदार आकडा अहो घ्या ते शेकडा, घ्या ते शेकडा, पण गवारीचाच सडा दारी माझ्या
Taxonomy upgrade extras

खुलासा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 13/01/2009 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
खुलासा काहि वेळा बायका भात "गिच्च गोळा" झाला अस म्हणतात.तर तश्याच भाताला काहिवेळा"गोळा गिच्च" असे म्हणतात..तर.. १]"गिच्च गोळा" म्ह्णजे नेमके काय???? २]"गोळा गिच्च"म्ह्णजे नेमके काय???? ३]"गिच्च गोळा" आणी "गोळा गिच्च" हि जुळी भावंडे आहेत काय??/ ४]जाणकार खुलासा करु शकतिल काय???

My मराठी...

लेखक झेल्या यांनी मंगळवार, 13/01/2009 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाजनहो... आपण असे नेहमी ऐकतो की ईंग्रजी ही 'बिझिनेस लँन्ग्वेज' आहे. विज्ञानात जसे 'आम्लारी' असतात तसे कट्टर 'आंग्लारी' लोकही आपण पाहतो. १. संपूर्ण जागतिक ज्ञान आणि माहिती मराठीत उपलब्ध करून काही फायदा होईल का? २. सद्ध्या कुठल्याही मध्यम व मोठ्या व्यवसायात ईंग्रजी (किंवा अन्य परकीय भाषा) शिका आणि अधिक समृद्ध व्हा असे समीकरण ढोबळ्पणे दिसते. ज्यांच्याकडे पैसा/अधिकार्/सत्ता असेल त्यांच्या भाषेला आपोआपच 'भाव' येतो. मराठी ला जागतिक व्यवसाय क्षेत्रात प्रतिष्ठा मिळ्वण्यासाठी कोणती पाऊले उचलली जावीत किंवा आपण उचलू शकतो? ३.

गवारीच्या पुर्‍या

लेखक समिधा यांनी मंगळवार, 13/01/2009 03:57 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याना गवार आवड्त नाही त्याना सुधा आवड्लेल्या पुर्‍या लहान मुलांसाठि खास आकार पण करता येतिल.

गुळाच्या पोळ्या

लेखक स्वाती राजेश यांनी मंगळवार, 13/01/2009 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १/२ किलो गुळ (चिक्कीचा गुळ नाही ना याची खात्री करून घ्या.) १/२ वाटी डाळीचे पीठ १/२ वाटी साजुक तूप १/४ वाटी तीळ १ टे.स्पून प्रत्येकी भाजलेली खसखस व खोबर्‍याचा कीस १ टी.स्पून वेलदोडा पूड १ टी.स्पून जायफळ पूड २ वाट्या कणिक, १ वाटी मैदा,पाव वाटीपेक्षा थोडे कमी डाळीचे पीठ, १ टे.स्पून तेल,१/२टी.स्पून मीठ, चिमूटभर हळद, लाटायला तांदळाची पीठी. कृती: एका कढईत गुळ चिरून घ्यावा. त्यात २ टे.स्पून पाणी घालून गॅसवर ठेवून विरघळून घ्यावा.

विजेची बचत

लेखक अनामिक यांनी मंगळवार, 13/01/2009 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या विकांताला इंटरनेटवर गायनाच्या रियालिटी शोचा फिनाले बघत होतो. शो छान वाटला, बघायला मजा आली. पण बघता बघता एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. ति म्हणजे त्या किंवा तत्सम कार्यक्रमात स्टेजवर केलेला 'झगमगाट'. प्रत्येक शो साठी वेगवेगळा स्टेज तयार करण्यात येतो आणि त्यावर गरज नसतानाही हजारो दिवे लावून स्टेज सजवले जाते. एकीकडे जिथे लोड शेडिंगमुळे सामान्य माणसाच्या घरात ८ ते १० तास वीज नसते (खेडे विभागात १२-१६ तास) तिथे अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी गरजेपेक्षा जास्त वीज वापरणे किती योग्य? यावर आपल्या सरकारचे काही नियम/ काही बंधनं असायला नकोत का? बरं टी. व्ही चॅनल्सची संख्या दिवसागणिक वाढतच जातेय.