Skip to main content

मन कसे वेडे-पिसे

लेखक पल्लवी यांनी बुधवार, 28/01/2009 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
मन कसे वेडे-पिसे कधी हसे कधी रुसे कल्लोळात भावनांच्या कधी अलगद फसे ! मन कसे वेडे-पिसे कधी असे कधी तसे बोलघेवड्या मनात मूक आठवांचे ठसे ! मन कसे वेडे-पिसे स्वप्नं जुनी जाळितसे शांतावल्या चितेवर स्वप्नं नवी रचितसे ! मन कसे वेडे-पिसे सप्तरंगी वस्त्र जसे शुभ्र-सुखाच्या सोबती दु:ख काळे शोभतसे ! मन कसे वेडे-पिसे मोरपीस नाजुकसे आठवांच्या झोतासवे कृष्णामाथी डुलतसे ! मन कसे वेडे-पिसे जणु नभ पोकळसे जाता धरु नाठाळास हाती येते कवडसे ! ~पल्लवी~
Taxonomy upgrade extras

गुलाबाचे काटे

लेखक पुष्कराज यांनी बुधवार, 28/01/2009 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे माझे गुलाबाचे जुळ्लेच नाही नाते गुलाबाच्या गंधाहून काट्याचीच ओढ वाटे मैत्री मध्ये आपुल्या या भांडणच होती फार रुसुनिया कित्येकदा शब्दांचीच मारामार गुलाबाचे फुल देता काटे तुला बोचतात शब्द तुझे प्रेममय रातदिन टोचतात शब्दाविना फुलाविना तुझे माझे आहे नाते म्हणुनच गुलाबाच्या काट्यांचीही ओढ वाटे
Taxonomy upgrade extras

((आपल्याला पटते क ?))

लेखक ब्रिटिश यांनी बुधवार, 28/01/2009 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
तूमाला पटते का (विथ ब्रॅकेट,विदाउट ब्रॅकेट) हे दोनीव लेख वाचल्यावर आमी जरा ईचारमग्न होऊन गुडघा खाजवु लागलो. बायकांनी मंगलसूत्र घालावे का, पुरुषांनी बायकांकडे बघावे क नाय, ह्या सारक्या चर्चा व त्यावर मीपाच्या म्हान प्रतीभावंत सदस्यांच्या परतीक्रिया वाचू पार गूडघा आउट झाला. ह्या बायकाच नसत्या त काय झाले आसते ? धरतीवरचे समाज जीवन कसे आसते? आमच्या गुडघ्यात तर असे आले क मीपा सदस्यांच्या वागण्यात काय बदल झाले आसते ? उदा. मास्तर ने कोनत्या विषयाचे समुपदेशन केले आसते, तात्यांने न आवलीयाने खव मध्ये कोनाचा फोटो लावला आसता ई.

भरले tomato

लेखक मानसी मनोजजोशी यांनी बुधवार, 28/01/2009 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- १. ४/५ छोटे tomato २. अर्धी वाटी ओल खोबर, ४ /५ लसूण पाकळ्या,अर्धा चमचा आल, १/२ हिरव्या मिरच्या व कोथिम्बीर एकत्रीत वाटून ३. १ चमचा गरम मसाला ४. १चमचा धने-जिरे पावडर ५. १ चमचा लाल तिखट ६. १ कान्दा बारिक चिरुन ७. अर्धा चमचा साखर ८.४/५ कढिपत्त्याची पाने ९. फोडणीसाठि - तेल, मोहरी, जिर, हिन्ग, हळद १०. मीठ चविनुसार १. tomato च्या देठाकडील भाग थोडासा कापून tomatoतिल गर काढून घ्यावा. २. खोबर,लसूण, आल, मिरचि व कोथिम्बीरीच्या वाटणात गरम मसाला, धने-जिरे पावडर , लाल तिखट, चमचा साखर व मिठ घालून एकत्रीत करावे. ३. गर काढलेल्या tomato मधे वरिल मिश्रण भरावे. ४.

भटकंती - पहीला स्टॉप - गुडगांव ! (गुरुगांव)

लेखक दशानन यांनी बुधवार, 28/01/2009 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
पुरातनकाळात पांडव व कौरव ह्यांना शिक्षण देणारे गुरु द्रोणाचार्य ह्यांना आपल्या उपजाविकेसाठी हे गाव दान दिले होते म्हणून ह्याचे नाव गुडगाव (गुरु गाव) ह्या गावात एक प्राचीन शितला माताचे मंदिर सोडले व गुरु द्रोणाचार्याचा एक पुतळा सोडला तर ह्या बद्दल काहीच पुरावा सापडत नाही, तसेच हा भाग नेहमीच युध्दाच्या सावली खालीच राहीला ते दिल्ली मुळे.. दिल्ली फक्त १८ किलोमिटर दुर. इतिहासाचे साक्ष देणारे असे काहीच बांधकाम आसपास दिसत नाही ते मोगलांच्या आक्रमणामुळे..

साद

लेखक सुचेता यांनी बुधवार, 28/01/2009 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
घालावी तुज साद अव्याहत हाच नाद आवरता आवरेना थोपवू कसे मना क्शणोक्शणी तुझे भास भेटायाचे हिच आस कसाबसा सरे दिस रात उरे स्मरणास पुसण्यास नाही कोणी गालावर सुकले पाणी एकदाच तुज भेटावे मनीचे भाव जुळावे हिच शेवटली आस जिवाने घेतला ध्यास सुचेता सुळे

गांधी आणि नेहरू घराणे

लेखक तात्यालबाड यांनी बुधवार, 28/01/2009 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
२६ जानेवारी, १५ ऑगस्ट या आणि इतर दिवशी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांचे इतके कोडकौतुक होते की त्याला काही मर्यादाच नाहीत. जणू काही भारताला स्वातंत्र्य ह्याच दोघांनी मिळवून दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, राजगुरू, सुखदेव, भगतसिंग, इतरप्रांतीय अनेक अज्ञात स्वातंत्र्यसैनिक यांचे काहीच योगदान नाही ? ते काय तुरुंगात गोट्या खेळत होते ? ज्या शिक्षा ह्या स्वातंत्र्यसैनिकांनी भोगल्या आहेत त्या प्रकारच्या शिक्षा गांधी,नेहरू यांनी भोगल्या आहेत काय ? निदान मला तरी माहीत नाही. असल्यास माझा गैरसमज दूर करावा.

सावरकर आणि आपण

लेखक ए. प्रशांत यांनी बुधवार, 28/01/2009 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
लेखक - अभिनय कुलकर्णी सावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि मग फार तर जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. पण समग्र सावरकर आपण समजून घेण्याचा प्रयत्न कधी केलाय? हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते आणि त्यातले अनेक आपल्याला पटणारे आणि न पटणारेही होते. पण म्हणून ते समजून न घेता त्याकडे दुर्लक्षच बरेच झाले.

मारहाण वृध्दांना स्त्रियांना.... कितपत योग्य??

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 28/01/2009 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो... रामसेना आणि मनसे ... काल बातमी वाचली... वृध्द आणि स्त्रियांना मारहाण. आजच्या पेपरला बातमी वाचली. मनसे ने माफि मागितली आहे झाल्या प्रकाराबद्दल. कार्यकर्ते हे स्वघोषित नेत्ते झाले आहेत कां? ही अशी मार हाण कितपत योग्य आहे ( रामसेना असो की मन्से असो)?? http://tinyurl.com/dyrnwo

आताही प्रेम तसेच आहे का?

लेखक धनंजय यांनी बुधवार, 28/01/2009 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
आताही प्रेम तसेच आहे का? ********** नवे होते प्रेम जे वर्षांपूर्वी काही सांग आहे आताही ते तसेच का? भेटतो रोजच तुला सकाळ-संध्याकाळी काळीज प्रत्येकवेळी धडधडते का? सदाचा तोच तंटा भांडून झाल्यावरती होतो खालीवरती जीव तसाच का? तुझ्यासाठी झुरत नाही पूर्वीसारखा तरी नाही पारखा प्रेमाला मी आहे माझी खात्री असशील माझ्यासाठी घट्ट होतात गाठी ओढल्या तरी ********** (वाचलेल्या कवितेचा एम् पी ३ दुवा)
Taxonomy upgrade extras