भरले tomato
साहित्य :-
१. ४/५ छोटे tomato
२. अर्धी वाटी ओल खोबर, ४ /५ लसूण पाकळ्या,अर्धा चमचा आल, १/२ हिरव्या मिरच्या व कोथिम्बीर एकत्रीत वाटून
३. १ चमचा गरम मसाला
४. १चमचा धने-जिरे पावडर
५. १ चमचा लाल तिखट
६. १ कान्दा बारिक चिरुन
७. अर्धा चमचा साखर
८.४/५ कढिपत्त्याची पाने
९. फोडणीसाठि - तेल, मोहरी, जिर, हिन्ग, हळद
१०. मीठ चविनुसार
१. tomato च्या देठाकडील भाग थोडासा कापून tomatoतिल गर काढून घ्यावा.
२. खोबर,लसूण, आल, मिरचि व कोथिम्बीरीच्या वाटणात गरम मसाला, धने-जिरे पावडर , लाल तिखट, चमचा साखर व मिठ घालून एकत्रीत करावे.
३. गर काढलेल्या tomato मधे वरिल मिश्रण भरावे.
४. कढईत तेल गरम करून फोडणी करावी
५. त्यात कढिपत्त्याची पाने,बारिक चिरुलेला कान्दा घालून परतावे.
६. कान्दा गूलाबी झाल्यावर त्यात उरलेले वाटण घालून परतावे .
७. मिश्रणाला तेल सुटल्यावर भरलेले tomato व थोडेसे पाणी घालुन पून्हा परतावे व झाकण ठेउन एक वाफ आणावी.
८. tomato शिजल्यावर गॅस बन्द करावा.
९. कोथिम्बीर पेरून सर्व करावे.
वाचने
5206
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
वाह
In reply to वाह by दशानन
धने - कोथिंबिर
In reply to धने - कोथिंबिर by सुनील
ओह ! असं
In reply to वाह by दशानन
पाकृ छान
कच्चे tomato अन वांगीही असे केले तरीही छान लागतील
मस्त
मी रवीवारी
आवडली
हेच म्हणते..
आम्ही पाकृ
छान!
In reply to छान! by पिवळा डांबिस
ज ब