Skip to main content

काही चित्रे

लेखक माझी दुनिया यांनी गुरुवार, 29/01/2009 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या १० वर्षाच्या लेकाने काढलेली ही काही चित्रे.

होमोसेक्स्युअलिटी -

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 29/01/2009 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
सेम सेक्स लव्ह इन इंडिया..होमोसेक्स्युअलिटी - हिंदुस्थान टाइम्स मधला एक लेख आहे रुथ वनिता आणि सलिम किडवई ह्यांच्या पुस्तकावर. ह्या दोघांनी लिहिलेल्या पुस्तकाचे- सेम सेक्स लव्ह इन ईंडिया पुस्तकाचे स्वैर परिक्षण आहे . मनाला बोचणारा एक उल्लेख आहे ह्या पेपर मधे . अगदी लेखाच्या सुरुवातिलाच, माथेफिरु विश्व हिंदु परिषदेच्या लोकांना हे पुस्तक आवडणार नाही असा स्पष्ट उल्लेख आहे . त्या लेखामधे ह्या पुस्तकाचा सारांशदिला आहे. मुळ पुस्तक ४ भागात विभागले आहे.. पुस्तकाची जे काही लिहिलं आहे ते अगदी अफाट मुढतेचा अर्क आहे.

"मानवनिर्मित" समस्या

लेखक सुनील यांनी गुरुवार, 29/01/2009 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांपासून मिपावर एक समस्या भेडसावते आहे (निदान मला तरी). कधीकधी अचानक लॉगआऊट होणे तर कधी "गमन"वर टिचकी मारूनही गमन न होणे. ही समस्या नक्कीच "मानवनिर्मित" आहे. कृपया लवकरात लवकर याचा बंदोबस्त करावा, ही विनंती.

फुस्स् ऽऽऽ

लेखक शक्तिमान यांनी गुरुवार, 29/01/2009 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
        फुस्स् ऽऽऽ     अखेर माझ्या सायकलच्या जीर्ण टायरने पुण्यातील रस्त्यांसमोर शरणागती पत्करली (यात नवीन काहीच नव्हते). परंतु या शरणागतीमुळे एक गोष्ट माझ्या पथ्यावरच पडली... कधी नव्हे ते क्लास बुडवायची नामी संधी चालून आली होती. आणि "opportunity knocks the door once" या सुप्रसिद्ध वचनाला अनुसरून मी ती संधी गमवायचा मूर्खपणा अजिबात केला नाही.     मी माझी सायकल घेऊन आपल्या नेहमीच्याच सायकल मार्ट मध्ये गेलो. मी घडलेला सगळा प्रसंग तेथील माणसाला सांगितला.

मृगजळ

लेखक सचिन यांनी गुरुवार, 29/01/2009 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
मृगजळामागे धावत राहिलो वाळूचे इमले बांधत राहिलो लाटेकडे दुर्लक्ष झाले अन् चुकले हिशेब मांडत राहिलो सुखांच्या बेरजा करता करता समाधान वजा करत राहिलो पत्त्यांचा बंगला सावरण्यासाठी वार्‍याला विरोध करत राहिलो पुढे जायचे अन् पुढेच जायचे मागचे सारे विसरत राहिलो काय सापडले माहीत नाही खूप काही हरवून बसलो

सखि मंद झाल्या तारका!

लेखक शशिधर केळकर यांनी गुरुवार, 29/01/2009 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
परवा झी टीव्ही वरील नक्षत्रांचे देणे कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पंडितजीनी गायलेले एकमेव (म्हणूनही अद्वितीय ) भावगीताचा - 'सखि मंद झाल्या तारका' थोडे ऐकण्याचा योग आला. इथे मिपावर त्याचा धागा मिळून अनेकदा ऐकून झाले होतेच; तरीही पुनःप्रत्ययाचा आनंद. मनात आले, की पंडितजीनी इतर सर्व प्रकारची गाणी गायली. नाट्य - चित्रपट - शास्त्रीय, उपशास्त्रीय, विविध भाषांमधे गायली. किती - याला मोजदादच नाही, किती छान - याला काही सीमाच नाही. परवाच्या कार्यक्रमात पुलं नी त्याना हवाई गंधर्व म्हटले वगैरे उल्लेख आला - किती लोकांनी त्याना अशा किती लहान मोठ्या उपाधीनी गौरविले - याला ही काही तोड नाही.

तू

लेखक सचिन यांनी गुरुवार, 29/01/2009 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे येणे अन् ही सर काही संबंध असावा चोहीकडे सप्तरंग पसरले--कधी ? कसे ? तुझी पावले की भाग्य काही संबंध असावा सारे ऋतू माझे सदा असे बहरले कसे ? तुझा स्पर्श वा परीस काही संबंध असावा क्षण अन् कणही माझे उजळले तरी कसे ? तुझे हसणे की फुले काही संबंध असावा घरभर ताटवे हे मग उमलले कसे ? तुझे प्रेम नि सागर काही संबंध असावा या लाटा तो किनारा दोन्ही लाभतात कसे ?

मी वेळ

लेखक फटाकडी यांनी गुरुवार, 29/01/2009 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
"मी वेळ" म्हणजे नक्की काय असे विचाराल तर, काही वेळ जो तुम्ही फक्त स्वतः करता घालवता. आता विचाराल की स्वत: करता असा वेगळा वेळ कशाला द्यायला पहीजे?
  • स्वत: करता वेळ दिल्याने आपल्या डोक्यातले विचार कमी होतात आणि आपल्या मधे एक प्रकारची तरारी जाणवते
  • वैज्ञ्यानीक द्रुषट्या विचार केला तर, जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा आपल्या शरीरात cortisol नावाचा Hormone जास्त प्रमाणात तयार होतो ज्याच्या मुळे वजन वढणे आणि ह्र्दयविकाराचा झतका येण्याचे प्रमाण वाढु शकते
  • cortisol Hormone मुळे स्मरण शक्ती कमी होते आणि जास्त चिडचिड व्हायला होते.
  • मनाच्या कुपितले-पडदा पडताना

    लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 28/01/2009 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
    मनाच्या कुपीतले या सदरातला हा पाचवा लेख
    पडदा पडताना !
    पार्श्वसंगीत चालू ......... "चालत राहील हे युध्द विचारांचे..........." असं म्हणत सर्व कलाकार स्तब्ध. आवाज वाढत जातो आणि पडदा पडतो, एका प्रयोगाचा शेवट होतो. नाटक ............. मानवी मनाला थेट भिडणारे माध्यम ..... जशी मैफलीतील एखादी चीज काळीज चर्र करते. तसेच नाटकातला एखादा संवाद हृदय फाडून टाकतो. म्हणूनच जशी एखादी शास्त्रीय संगीताची मैफल संपताना सर्वांची समाधी लागते. तशीच अगदी तशीच समाधी एखादा अत्युत्तम प्रयोग संपल्यानंतर होते.