परवा झी टीव्ही वरील नक्षत्रांचे देणे कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पंडितजीनी गायलेले एकमेव (म्हणूनही अद्वितीय ) भावगीताचा - 'सखि मंद झाल्या तारका' थोडे ऐकण्याचा योग आला. इथे मिपावर त्याचा धागा मिळून अनेकदा ऐकून झाले होतेच; तरीही पुनःप्रत्ययाचा आनंद.
मनात आले, की पंडितजीनी इतर सर्व प्रकारची गाणी गायली. नाट्य - चित्रपट - शास्त्रीय, उपशास्त्रीय, विविध भाषांमधे गायली. किती - याला मोजदादच नाही, किती छान - याला काही सीमाच नाही. परवाच्या कार्यक्रमात पुलं नी त्याना हवाई गंधर्व म्हटले वगैरे उल्लेख आला - किती लोकांनी त्याना अशा किती लहान मोठ्या उपाधीनी गौरविले - याला ही काही तोड नाही. पण ते असो. हे फार अवांतर झाले. तर, मनात असे आले, या गाण्याच्या निमित्ताने, की त्यानी आणखी भावगीते का नाही गायली? आणि गायली असती तर? ती अशीच इतकी लोकप्रिय झाली असती का? (हा काय प्रश्न आहे? तरी पण!)
की त्याना इच्छा असूनही त्याना ती गायला मिळालीच नाहीत? तेव्हाचे इतके मातबर संगीतकार त्याना कसे काय विसरले? की मंगेशकर कुटुंब आणि बाबूजी यांची इतकी जबरदस्त मोहिनी त्यां संगीतकारांवर होती की अण्णाना तिथे जागाच नव्हती?
पण तसे म्हटले तर इतर अनेक शास्त्रीय संगीत गायक गायिकांनी अनेक भावगीते गाण्यात स्थान प्राप्त केले - लगेच आठवणारे - कुमार गंधर्व, छोटा गंधर्व, रामदास कामत, वसंतराव देशपांडे, ज्योत्स्ना भोळे, किशोरी आमोणकर, .... कितीतरी.
आणि तसे पाहिले, तर भीमसेनांनी गायिलेली अभंगवाणी मधील सर्व 'गाणी' तशी 'भाव'गीतेच की! (अवांतरः भाव तेथे देव, देवाची गाणी, म्हणून भावगीते)
की त्याना अशी गाणी पसंत नव्हती?
वेळच नव्हता असे म्हणणे युक्त आहे. पण पुरेसे समाधानकारक नाही.
मनापासून असे वाटले - विशेषतः सखि मंद झाल्या तारका ऐकून, की आणखी खूप खूप भावगीते त्यांच्या गळ्यातून ऐकायला मिळायला हवी होती!
तुम्हाला काय वाटते? यातील काही उल्लेख चुकीचा असेल, तरीही कृपया सांगावे.
वाचने
3071
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
की त्याना
अपेक्षा
श्रिनिवास
सिंहाला पिंजर्यात....
अण्णांनी
अण्णा!
In reply to अण्णांनी by शंकरराव
शशिसाहेब, आ
In reply to अण्णा! by शशिधर केळकर
'सखि मंद झाल्या तारका'
प्रमोद देव यांनी
In reply to 'सखि मंद झाल्या तारका' by आपला अभिजित
शास्त्रीय संगीत आणि भावगीत