मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तू

सचिन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
तुझे येणे अन् ही सर काही संबंध असावा चोहीकडे सप्तरंग पसरले--कधी ? कसे ? तुझी पावले की भाग्य काही संबंध असावा सारे ऋतू माझे सदा असे बहरले कसे ? तुझा स्पर्श वा परीस काही संबंध असावा क्षण अन् कणही माझे उजळले तरी कसे ? तुझे हसणे की फुले काही संबंध असावा घरभर ताटवे हे मग उमलले कसे ? तुझे प्रेम नि सागर काही संबंध असावा या लाटा तो किनारा दोन्ही लाभतात कसे ?

वाचने 1720 वाचनखूण प्रतिक्रिया 1