परवा झी टीव्ही वरील नक्षत्रांचे देणे कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पंडितजीनी गायलेले एकमेव (म्हणूनही अद्वितीय ) भावगीताचा - 'सखि मंद झाल्या तारका' थोडे ऐकण्याचा योग आला. इथे मिपावर त्याचा धागा मिळून अनेकदा ऐकून झाले होतेच; तरीही पुनःप्रत्ययाचा आनंद.
मनात आले, की पंडितजीनी इतर सर्व प्रकारची गाणी गायली. नाट्य - चित्रपट - शास्त्रीय, उपशास्त्रीय, विविध भाषांमधे गायली. किती - याला मोजदादच नाही, किती छान - याला काही सीमाच नाही. परवाच्या कार्यक्रमात पुलं नी त्याना हवाई गंधर्व म्हटले वगैरे उल्लेख आला - किती लोकांनी त्याना अशा किती लहान मोठ्या उपाधीनी गौरविले - याला ही काही तोड नाही.