Skip to main content

मी बोचले म्हणालो

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 07/02/2009 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
मी बोचले म्हणालो, ती कोणत्या ठिकाणी? मी हे तुला कसे पण सांगू मिठीत राणी ठरवून काल लुटले मॉलात बायकोने आधी तिला कशाला न्यावे अशा ठिकाणी! गुंगीत राहतो मी सुस्तीत वागणारा असते सदैव पिउनी स्वारी घरी उताणी! असतो खुशीत तेव्हा घेतो मजेत झुरके जातो हवेत तेव्हा होते बधीर वाणी होणार काय ह्याचे आहे जगास पत्ता (हा ढोसतोय दारू समजून रोज पाणी ) खोड्या अशा कवींच्या का काढतोस "केश्या"? लिहिती कधी तरी हे असली सुरेल गाणी - केशवसुमार (सुवर्णमयींच्या ''मी बोचलो म्हणाले' या गझलेवर आधारित)

तु राजा की राजदुलारी मै....

लेखक दशानन यांनी शनिवार, 07/02/2009 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
तु राजा की राजदुलारी मै.. सिर्फ लंगोटे आला सुं ! भांग रगड के पिया करु....मै.. मुंडी सोटि याआला सुं ! तु राजा की छोरी से... मेरे एक भी दासी दास नही ! साधुसा आले ओढण आली म्हारा कंबल तक पास नही ! नवीन चित्रपट ओय लकी लकी ओये मधील हे एक गाणं ! हरयाणवी लोक संगितावर आधारलेले हे एके नितांत सुंदर गाणे आहे... ! हरयाणवी शब्दांमुळे ह्या गाण्याची गोडी एकदम अप्रतिम वाढते... ! एकदा प्ले करा.... तुम्हाला देखील आवडेल नक्कीच !!

मैने प्यार किया

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 06/02/2009 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमाच्या बाबतीत तर मला पाडगावकरांचं 'तुमचं आमचं अगदी सेम असतं', हे मुळीच पटत नाही. म्हणजे प्रत्येकाचं प्रेम त्याच्या किंवा तिच्यासाठी इतकं जिवलग आणि खास असतं की ते इतर कुणासारखं होऊच शकत नाही. मग त्यात फोनवरचं तासन् तास बोलणं असो; समुद्रकिनार्‍यावर एकत्र हिंडणं, एकत्र खाल्लेली भेळ किंवा भुट्टा किंवा 'कच्ची कैरी'चा गोला असो; की क्लासला ज़ातो/ते आहे सांगून बागेत भेटणं असो. सगळं अगदी स्पेशल आणि इतरांपेक्षा वेगळंच असतं.

अजितकाका

लेखक संदीप चित्रे यांनी शुक्रवार, 06/02/2009 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
“बिरजू महाराज, प्रभा मराठे, रोहिणी भाटे या कलावंतांचा अजित सोमण लाडका बासरीवादक होता” esakal.com वाचताना, वर दिलेल्या ओळीतला 'होता' हा भूतकाळ दर्शवणारा उल्लेख खटकला. मनात शंकेची पाल चुकचुकली…. पण म्हटलं, “हॅ ! तसं काही नसेल; आता अजितकाका कार्यक्रमांतून वाजवत नाहीत म्हणून तसं लिहिलं असेल. आपल्याला अजितकाकांनीच तर फोनवर दोन-तीन आठवड्यांपूर्वी सांगितलंय की ते आता कार्यक्रमांतून वाजवत नाहीत म्हणून !” दुर्दैवाने काही शंका खऱ्या ठरतात !

पनिर भूर्जी

लेखक मानसी मनोजजोशी यांनी शुक्रवार, 06/02/2009 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः- १. २०० ग्रॅम पनिर २. २ कांदे बारिक चिरलेले ३. १ टोमॅटो बारिक चिरलेला ४. १ मिरची बारिक चिरलेली ५. १ चमचा धने-जीरे पावडर ६ अर्धा चमचा गरम मसाला ७. १ चमचा तिखट ८. १ चमचा आल-लसूण पेस्ट ९. तेल, मिठ, हळद १०. पाव चमचा साखर ११. कोथिंबीर ११. १ चमचा बटर १. पनिर गरम पाण्यात घालावे व मऊ झाल्यावर कूस्करुन घ्यावे. २.कढईत तेल गरम करुन त्यात आल-लसूण पेस्ट व कांदा घालून परतावे ३. कांदा गुलाबी झाल्यावर बारिक चिरलेली मिरची, धने-जीरे पावडर, हळद, गरम मसाला व तिखट घालून परतावे . ४.

कधी असे ...

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 06/02/2009 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
कधी असे मलाही वाटले होते नभ हे मेघांनी दाटले होते | शिशिरात कसे फूल उमलले होते ओलावा शोधीत मूळ पसरले होते | भासले वळणावरती कुणी थांबले होते हात घेण्या हाती मी ही चालले होते | र्‍हुदयी या मायेने गारुड घातले होते सर्वस्वसही माझे पणास लावले होते | आत्म्यास मोहाने असे जखडले होते मार्गावरी माझ्या काटे पसरले होते | भय, लोभ, द्वेषा चे रण पेटले होते अंध अहंकाराने चित्त गोठले होते | कोलाहलात सार्‍या गाणे हरवले होते गर्दीने माणसाला पुन्हा फसवले होते |

तो चावला मघाशी ह्यांना अशा ठिकाणी

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 06/02/2009 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
तो चावला मघाशी ह्यांना अशा ठिकाणी झटक्यात हाय गेली लागून आणिबाणी अडवून मीच धरले होते किती दमाने (फ्रेश्नर घरात नाही, भरपूर ओत पाणी!) गुत्त्यात राहुनी मी शुद्धीत राहणारा बेहोश विश्व भवती, बेताल बोलगाणी दररोज एक काढा साइट् नवी मराठी इतिहास थोर घडवा, बनवा तिला निशाणी! प्रतिसाद हा कुणाचा आहे कुणास पत्ता? (खोटी मिठास वाणी; खोटे छदाम, नाणी) बोके चलाख, सोदे गुरकावले कशाला? येता पुढ्यात माऊ गातात गोड गाणी प्रेरणा: मी बोचलो म्हणाले

घडतंय बिघडतंय...

लेखक नीलकांत यांनी शुक्रवार, 06/02/2009 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज सकाळपासून मिपाचा सेवादाता गंडतोय. मिपाचा ह्याशी काहीही संबंध नाही. मात्र तरीसुध्दा मिपाकरांची गैरसोय होतेय. त्याबद्दल दिलगीर आहे. तात्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर सेवा देऊ शकत नाही म्हणून स्वतःचीच लाज वाटतेय. डोमेन नेम सर्व्हर आणि मिपाचा डेटाबेस सर्व्हरचा इश्यु आहे. शक्यता आहे की आज रात्री जेव्हा मिपावर गर्दी नसेल तेव्हा ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न करता येईल. तो पर्यंत अडचण येणार नाही. डोमेन नेम सर्व्हरचे काम करतांना कदाचित असं होऊ शकतं की मिपा उघडणार नाही किंवा जुणी पानं उघडली जातील. पण हे थोड्यावेळासाठी असेल. उद्या सकाळपर्यंत सर्व सुरळीत असेल. नीलकांत

असा ही एक भावानुवाद "हो ना गं आई"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 06/02/2009 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
"हो ना गं आई....." अंधाराची भीती मज वाटे तरी मी ते कुणा न सांगे तुला ही मी ते सांगत नाही कदर तुझी करीतो मी आई माहित आहे तुला सर्व काही हो ना गं आई........ गर्दीमधे मला नको सोडून जाऊं घराकडे आई कसा मी परत येऊं दूर दूर मला नको असा पाठवूं सांग कसा मी तुला मग आठवूं एव्हडा व्रात्य असेन का मी हो का गं आई......... बाबा देती कधी उंच उंच हिंदोळे झुल्यावरी गं आई नयन माझे तुला शोधिती वाटे तू त्या थांबविशी गं आई नाही सांगत मी त्यांना परि मी मनात गोंधळून जाई गं आई चर्या माझी दिसत नाही परि मनोमनी हबकतो मी गं आई ठाऊक आहे तुला सर्व काही हो ना गं आई...... नेत्र माझे मूक होती जिव्हा माझी निःशब्द होई नसती क
Taxonomy upgrade extras