Skip to main content

रोज पुडिंग

लेखक मिंटी यांनी गुरुवार, 26/02/2009 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
रोज पुडिंग अर्थात गुलकंद वापरुन केलेलं पुडिंग. ही मुळतः एक अमेरीकन डिश आहे. आयुर्वेदानुसार गुलकंद उन्हाळ्यात गर्मीपासुन होण्यार्‍या त्रासावर आणि ऍसिडीटीवर एक उत्तम आहे..... साहित्य : २ कप दुध ४ टेबलस्पून पाणी १ टेबलस्पून प्लेन जिलेटीन १ टेबलस्पून रुह अफ्झा किंवा डाबर रोज सिरप ( हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदलु शकता ) २ टेबलस्पून गुलकंद ( हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदलु शकता ) कृती : १. पाणी गरम करुन घ्यावे. एका कप मध्ये जिलेटीन पावडर घेऊन त्यावर गरम पाणी घालुन जिलेटीन पुर्णपणे विरघळेपर्यंत हलवुन घ्या. २.

गुलाबजाम

लेखक PRAPTI P यांनी गुरुवार, 26/02/2009 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मला गुलाबजामचे पीठ घरी कसे बनवायचे व त्यानंतर गुलाबजाम कसे बनवायचे याची कृती सागांवी. प्राप्ती

मदत हवीये

लेखक रम्या यांनी गुरुवार, 26/02/2009 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी काही प्रश्न आहेत. मागच्याच वर्षी घेतलेल्या घराच्या दुरुस्तीचं काम काढलं आहे. दुरूस्तीच्या वेळेस घराची एक खिडकी साधारणशी मोठी केली आहे आणि याला सोसायटीचा विरोध आहे. सोसायटी खिडकीचे अर्धवट बांधकाम पुन्हा तोडून खिडकी पुन्हा लहान करावी म्हणून सोसायटीच्या सभासदांनी कामगारांना दमदाटी करून काम बंद पाडले. या अनुषंगाने काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. १. कोणताही नियम सोसायटीच्या सर्वसाधरण सभेत लिखित स्वरूपात मंजूर झाला असेल आणि असा नियम एखाद्याने मोडला तर सोसायटी अशा वेळी काय कायदेशीर कारवाई करू शकते? २.

लग्न ठरलेल्या मुलीचे मनोगत

लेखक दत्ता काळे यांनी गुरुवार, 26/02/2009 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दात अर्ध-होकार ओठात लाजूनी आला स्वप्नाच्या हिंदोळ्यावर जीव घाबरा झाला मज सांग आई, तू सांग हा खेळ असे कि नाते ज्या वाटेवर मी फुलले ती वाट पोरकी होते गांव आता बदलेलं मिळतील नवी मज नाती काळीज मात्र व्याकुळ तुटतुटेल तुमच्यासाठी अडखळेल पाऊल हळवे मी सोडून जाता, जाता राहील उभा नि:शब्द मग वाटेवरती दादा मज स्मरेल जेव्हा घर हे श्रमसरत्या शांत दुपारी मी बघेन देव्हार्‍यात पितळेचा कृष्णमुरारी बांधीली गाठ शेल्याशी हातात हात मी घेते पाण्यास अर्पिले दिप ती नदी कुठे गं नेते ?
Taxonomy upgrade extras

बोंबील फ्राय पाककृती हवी आहे.

लेखक सालोमालो यांनी गुरुवार, 26/02/2009 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
मला बोंबील फ्राय पाककृती हवी आहे. जरा लवकर टाका. या शनिवारी पहिल्यांदाच फिश बनवून बघणार आहे. शुभारंभासाठी बोंबील निवडलाय. सालो

प्रेम / ईसवास

लेखक JayGanesh यांनी गुरुवार, 26/02/2009 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
''प्रेम'' या शब्दा वरुन माझा तर ''ईसवास'' उडालेला आहे, कारण, तुझ्या बरोबर ''प्रेम'' करुन मला तसा अनुभव आला आहे..
आणखी सुचवा!

तुम्ही कशी घेता?

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी गुरुवार, 26/02/2009 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
सोमरस किंवा दारु अथवा आणखी काहि नावे असतील ती तुम्ही कशी पिता म्हणजे कोणी पाणि टाकुन कोणी सोड्यात तर कुणी कच्चीच घेत तर चला करु सुरुवात सांगा बर तुम्ही कशी घेता ? ;) =D> येथे होणार्‍या चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी इच्छा आहे! :P :P संसार उध्वस्त करी दारु म्हणुनच म्हणतो संसारच नका करु ओन्ली एनजॉय विथ दारु चल्ला मग घेउ थोडी थोडी दारु

उपेक्षित सावरकर

लेखक भोचक यांनी गुरुवार, 26/02/2009 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
सावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि मग फार तर जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. पण समग्र सावरकर आपण समजून घेण्याचा प्रयत्न कधी केलाय? हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते आणि त्यातले अनेक आपल्याला पटणारे आणि न पटणारेही होते. पण म्हणून ते समजून न घेता त्याकडे दुर्लक्षच बरेच झाले. सावरकरांना समजून घेण्यात आपण कमी पडलो आणि त्यांचं मोठेपण इतरांपर्यंत पोहचविण्यातही आपल्याला अपयश आलं.