इब्लीस चाचा आणि इतर काही गोष्टी.
रविवारची सकाळ.चाचा आरामात पेपर पहात बसले होते.
चाची आली .चाचांना म्हणाली ,
"काय हो पेपर बरे वाचताय सकाळी"
"दुसरा काय ऑप्शन आहे गं आपल्याला.चाळीतली माणसं आपण .सकाळी दरवाजा खुल्ला ठेवावा लागतो ना. "
चाचा चाचीकडे डोळ्यात इश्क आणून म्हणाले.
चाची खमकी ."पेपर बघताय निस्ते ,चष्मा बरा लागत नाही "
चाचानी एक मोठ्ठा दर्दभरा सुस्कारा सोडला.
"आजकाल पेपरात बघण्यासारखंच असतंय ग.आणि तू मिड डे बंद केल्यापासून ....."चाचानी आणखी एक सुस्कारा सोडला.
"अहो काही लाज , शरम ,कुलकी मर्यादा काही आहे की नाही ..किती म्हणून पेपर बंद करायचे, आधी तो चावट पारशी करंजीया आणि त्याचं ब्लिट्झ.
मिसळपाव