Skip to main content

गजानन वाट्व्यांचे निधन

लेखक शुभान्कर यांनी गुरुवार, 02/04/2009 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
थोडयावेळापूर्वी कळले की गजानन वाटवे गेले. मराठी भावगीताचा जनक हरवला त्यांना विनम्र श्रद्धांजली.

ब्रेड पुडिंग

लेखक परीसा यांनी गुरुवार, 02/04/2009 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकर, तशी मी स्वाती ताई, प्राजुताई, प्रभाकर काका, चकलीताई ह्यांसारखी जेवण करण्यात एवढी काही माहीर नाही. पण कधीतरी नवीन पदार्थ बनवण्याची ईच्छा ठेवते. गेल्या रविवरी मी असाच प्रयोग करुन पाहिला आणि तो सफल झाला. आता हा प्रयोग कोणबरोबर तरी शेअर करावासा वाटत होता. आणि मिपा सारखी दुसरी जागा मला अजुन सुचली नाही. मी केलेल्या प्रयोगात तुम्हाला अजुन काही सुचवावयाचे वाटत असेल तर सांगा म्हणजे पुढच्या वेळी मी ते चेंजेस करेन. प्रयोग कृती अशी आहे, साहित्यः १/२ लिटर दुध, ४ ब्रेडचे स्लाईस, ३ अंडी, २ छोट्या वाट्या साखर्,(आवडीनुसार कमी-जास्त करु शकता) १टी. स्पु.

(चेहरा)

लेखक दशानन यांनी गुरुवार, 02/04/2009 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
चेहर्‍या मागे चेहरे दडलेला खरे-खोटे कुणास कळला? तुझा रंग प्रत्येक वेळी वेगळा काळा, गोरा कधी सावळा मेकअप मध्ये कधी लपलेला जसे काळ्यावरती पिठ फासलेला तुझा नेहमीच रंग वेगळा प्रत्येक वेळी भाव वेगळा आरसाशी तुझा लपंडाव चाललेला दुस-याला धसका घ्यावा लागलेला विना मेकअप बघुन तुला चक्कर येऊन पडलेला होवो ना प्रत्येक वेळी सामना चेहराचा ना राहो तुझ्या चेहरा नेहमी समोर दर्शनी धुतलेला अन विना मेकअप, सडलेला. ____ जागुची माफी मागून ;) प्रेरणा
Taxonomy upgrade extras

चेहरा

लेखक जागु यांनी गुरुवार, 02/04/2009 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
चेहर्‍या मागे चेहरे दडलेला खरे-खोटे कुणास कळला? प्रत्येकाचा रंग वेगळा काळा, गोरा कुणी सावळा गोर्‍यात कधी काळा लपलेला काळ्यावरती गोरा फासलेला सावळ्याचाही रंग वेगळा प्रत्येक चेहर्‍याचा भाव वेगळा भाव-भावातही लपंडाव चालला दुसर्‍यच्या दु:खात सुख दडलेला सुखात दुसर्‍याच्या चेहरा पडलेला होवो प्रत्येक चेहरा समानतेचा पारदर्शी माणूसकीचा अन सुंदर, सज्जन निर्मळतेचा.
Taxonomy upgrade extras

१५ ऑगस्ट चा दिवस

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 02/04/2009 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या रुपात मन कैद माझे झाले. तो कविता वाचत होता. "गप रे" ति वैतगली होति. जरा सिरीयस बन. २ वर्षे झालीत.. बाबा मागे लागलेत लग्नासाठी..ति म्हणाली माझा हो कळव.. तो हसत म्हणाला.. अन काय कळवणार? तुला ना नोकरी, ना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे गंमत नाहि......ति सिरियस् झाली होति अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, प्रेम, एक मेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न.....तो वेडा आहेस. अरे लग्न म्हणजे संसार, म्हणजे घर, दुध, किराणा, मुल, म्हणजे पैसा..ति म्हणाली हातात हात तुझा, अन तुझी साथ. पैसा ये‌इल. येतो.

३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 02/04/2009 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
३ एप्रिल हा छत्रपतींचा निर्वाण दिन ! त्या पुण्यश्लोक छत्रपतींचे हे पुण्यस्मरण ! काय वाटत असेल आज त्यांना ? ही कल्पना मांडणारा हा लेख ..... उदय गंगाधर सप्रेअर्पण..... आज ३ एप्रिल २००९ ! या इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे / तारखेप्रमाणे आजपासून ३२९ वर्षांपूर्वी..... शिवरायांचे स्वगत : आज हनुमान जयंती - चैत्र शुध्द पौर्णिमा !

आणखी एक कविता पूर्ण करा

लेखक अभिरत भिरभि-या यांनी गुरुवार, 02/04/2009 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी एका (अर्धवट) कवीची (अर्धवट बिघडलेली) कविता. बघा ब्वॉ रिपेअर करता येते का .. रात्र झाली, दीप निवले आकाश झाले काळे | भुरा चंद्र हसे पहा; बोले काय गो झाले |
Taxonomy upgrade extras

लतादीदीस सप्रेम.........

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 02/04/2009 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे गाणे तुझे नाही तुझे असणे तुझे नाही ते किंचित हंसणे तुझे नाही.. तो गंधार, तो मल्हार असतील ते सुर तुझे, पण त्याचे वेड तुझे नाही ! तुझ्या ओठीचा शब्द तुझ्या गळ्याचे सुर व्यसन कोकीळे ते तुझे नाही ! तुझ्या सुरातली तंद्री तुझ्या स्वरातली धुंदी ते धुंदावणे तुझे नाही ! तानपुर्‍याची मधुर तान किंचित लवणारी सुरेल मान ते वेडावणे तुझे नाही ! तुझे सुर श्वासात भिनलेले त्या स्वरांसह श्वासांची गती वाढणे तुझे नाही! तो हक्क आम्हा रसिकांचा तुझ्या गळ्याच्या गुलामाचा ते भाग्य कोकिळे तुझे नाही स्वरकोकिळा मा. लतादीदींच्या एका वाढदिवशी ही कविता केली होती. विशाल

श्रद्धांजली..

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 02/04/2009 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच मिपाकर सहजराव यांच्या वडिलांना देवाज्ञा झाल्याचे कळले. संपूर्ण मिपा परिवारातर्फे विनम्र आदरांजली... तात्या.