Skip to main content

हापुस लस्सि

लेखक chikusi यांनी शुक्रवार, 10/04/2009 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
Method: 1. Mix curd and mango pulp in 2:1 ratio (2 cups of curd : 1 cup of pulp) 2. Add two spoons of sugar for 1 cup of mango pulp 3. Blend this mixture In the blender/mixture 4. Garnish with small cashew pieces Estimation : Approx. 1 cup mango pulp per person

जगावे की जगू नये?

लेखक उमेश कोठीकर यांनी गुरुवार, 09/04/2009 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
जगावे की जगू नये? हाच खरा प्रश्न आहे रक्त माझे! श्वास तुझे! सारखेच उष्ण आहे का जगू मी? काय माझे? देवदेखील चोर आहे कधी येतील घरी बाबा? मनी मात्र मोर आहे बालकांचे रक्त सांडे भयतू! कलीचा घोष आहे भूक लागे पण तरी अजब जीवोन्मेष आहे! पृथ्वी वांझ! पृथ्वी दग्ध! भविष्य हे घनघोर आहे तरी फुले जन्मतात राखेला मोहोर आहे भ्रांत मन! जाऊ? राहू? श्वास फक्त अंतर आहे! आळवितो परमपित्या सांग काय निरंतर आहे? ऐकून माझी रुद्ध वाणी देव बोले! आकाशवाणी! "अंती सत्या विजय होतो विजयी जे ते सत्य आहे! सत्य शाश्वत! सत्य अंतीम सत्य जीवन! बोध आहे मृत्यू व्यर्थ! मृत्यू षंढ जन्म हाच थोर आहे जन्म ब्रम्ह!
Taxonomy upgrade extras

मि.पा. ला जालिंदर जलालाबादींच्या विरोधकांचा विळखा...

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 09/04/2009 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
गेले आठ दिवस मी मि.पा. चे संकेतस्थळ पाहतोय. नवीन सदस्य या स्तंभात सतत तेचतेच पाच नविन सदस्यांचीच नावे दिसत आहेत. (GAURIBHADE, असुगो, अल्पना, सचिन घुले, मंजुश्री अशोक बनकर) त्यामुळे मि.पा. च्या कार्यप्रणाली मध्ये काहीतरी बदल झालेला दिसतोय. नाहितर आठ दिवसात एकही नविन सदस्य नोंदणी करु शकत नाही असे होउ शकत नाही.

हे राम ! व जालिंदर जलालाबादी

लेखक दशानन यांनी गुरुवार, 09/04/2009 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
मास्तरांचा जालिंदर जलालाबादी ह्याच्या वरील माहीती पर लेख काय आला मिपा जगतात खळबळ उडाली, एका सामान्य प्रतीच्या लेखकाला मिपावर येवढी प्रसिध्दी मिळाली की दगडफोड्या, कावलिया व रेवा ह्यांना जालिंदर जलालाबादीच्या माहीतीपुर्ण लेखामुळे त्याच्यावर लेखन करावेसे वाटले व कावलिया तर सरळ त्यांना भेटायला गेला हे पाहून मनात आग धुसमसत होती, काय ती पुस्तके काय ती त्यांची नावे कधीच वाचायचे नाही असे ठरवले होते पण "चालते व्हा" चा उल्लेख झाला व जराशी खटपट करताच आमच्या गुप्त सुत्राद्वारे ते पुस्तक भगव्या रंगाच्या कपड्यामध्ये मला उपलब्ध झाले, व प्रस्थापित लेखकांच्या वर खास करु महाजालावरील काही महान (

अपुर्ण वर्तुळ

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 09/04/2009 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
एवढ्या मोठ्या हॉस्पिटल मधे तुझी केस नेमकी माझ्या टेबलवरच यावी हा निव्वळ योगायोग नसणार. "डॉक्टर, होइल ना हो मुल"? आधी वाटले की तु चेष्टा करत आहेस. सासु समोर ओळख न दाखवता ओळख आहे का?

गोठलेले शब्द (या संग्रहातून ;)

लेखक लिखाळ यांनी गुरुवार, 09/04/2009 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
गोठलेले शब्द या जालिंदरांच्या कविता संग्रहातील एक कविता येथे लिहिण्याचा मोह आवरत नाही. वास्तविक हा संग्रह माझ्याकडे नाही. पण ती कविता कधीकाळी त्यांच्या 'भाषणाच्या बदल्यात भाकरी' या भाषणादरम्यान त्यांनी म्हटली आणि मी लिहून घेतली होती असे फिकट आठवते आहे. एखादेवेळी ही कविता त्या संग्रहात संग्राहित केली नसण्याची शक्यताही आहेच. पण आस्वाद घ्यायला काय हरकत? माझ्याकडील कविता एका जीर्ण पिवळ्या कागदावर हिरव्या शाईने लिहिली होती. कवितेतील काही शब्द वृत्त-मात्रांत बसत नसतील तर दोष त्या कागदाच्या प्रतिचा अथवा शाईच्या टिकून न राहण्याच्या गुणधर्माचा आहे.
Taxonomy upgrade extras

साडीखरेदीची गोष्ट

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 09/04/2009 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच वर्षांनी मला एका जवळच्या नातेवाईक कुटुंबासोबत पुण्याच्या कुमठेकर रस्त्यावर असलेल्या एका प्रसिद्ध साडी दुकानात जाण्याचा योग आला. बायकांची साडी खरेदी म्हणजे भल्या-भल्यांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहणारी प्रक्रिया असते असा माझा समज असल्याने मी सहसा त्या वाटेला जात नाही. बायकोसोबत मी आतापर्यंत एकदाही साडी खरेदीला गेलेलो नाही यातच माझ्या ठाम निश्चयाचे यश दडलेले आहे. पण यावेळेस मी शक्य तेवढ्या थापा मारून देखील माझा नाईलाज झाला. आमची एक दूरची नातेवाईक, तिचा नवरा आणि त्या दोघांच्या दोन मुली अशा सगळ्यांनी मला येण्याचा आग्रह केला.

स्वप्न

लेखक मनोज यांनी गुरुवार, 09/04/2009 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
अशी काजळली रात चंद्र ढगात लपला जीवनाचा सारा प्रकाश प्रिये कोठे ग लोपला कसे विझले अकाश नाही चांदनी पेटत झोप गेली दुर देशी नाही पापनी मिटत अशी एकटीचा वाट का केंव्हाची सरेना लाख जपल्या जखमा त्याला काळीज पुरेना झाला श्रावण पाहुणा अता ग्रीष्मात जगणे खडे फेकत नदीत गोल तरंग बघणे झाले ओसाड जीवन वांझ मनाचीया आशा गांव मोडला स्वप्नांचा फक्त ऊरला नकाशा

कावड , टरबुज अन शक्ती !

लेखक पहाटवारा यांनी गुरुवार, 09/04/2009 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही या नव्या घरी रहायला येउन २-३ आठवडेच झाले होते. काल संध्याकाळि घरि येताना गल्लीच्या तोंडाशी थोडि गजबज जाणवलि. तिथे एक मारुतिचे मंदिर आहे. एरवी एक पुजारि अन एक दोन वयस्क सोडले तर कुणी फारसे दिसले नव्हते. हिला विचारले, "आज कोणवार गं, बुधवार ना ?" "ह्म्म !" दिवसभराच्या ऑफिसच्या रगाड्यामुळे दमलेल्या आवाजात तिने ऊत्तर दिले. "मग बरोबर आहे. ऊद्या हनुमान जयंती ना ! त्याचीच गड्बड असेल." मी थोडेसे मनाशीच बोलल्यासारखे म्हणलो. "तुला काय माहित? कालनिर्णय तर सापडत नाहिये नविन घरात आल्यापासुन" "अगं, शुक्रवारिच तर रामनवमीची सुटि होती ना? मग रामनवमी पासुन सहा दिवसांनी हनुमान जयंती!