मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वप्न

मनोज · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
अशी काजळली रात चंद्र ढगात लपला जीवनाचा सारा प्रकाश प्रिये कोठे ग लोपला कसे विझले अकाश नाही चांदनी पेटत झोप गेली दुर देशी नाही पापनी मिटत अशी एकटीचा वाट का केंव्हाची सरेना लाख जपल्या जखमा त्याला काळीज पुरेना झाला श्रावण पाहुणा अता ग्रीष्मात जगणे खडे फेकत नदीत गोल तरंग बघणे झाले ओसाड जीवन वांझ मनाचीया आशा गांव मोडला स्वप्नांचा फक्त ऊरला नकाशा

वाचने 1403 वाचनखूण प्रतिक्रिया 4

चन्द्रशेखर गोखले 14/04/2009 - 06:56
छान ! अवडली, लिहीणे चालु ठेवा..!

आनंदयात्री 14/04/2009 - 07:13
शेवटचे कडवे मस्त जमले आहे .. >>गांव मोडला स्वप्नांचा >>फक्त ऊरला नकाशा फक्त उरला नकाशा ही कल्पना छान आहे .. नविन आहे. लिहित रहा.

क्रान्ति 14/04/2009 - 14:07
सुन्दर कल्पना. शेवटची दोन्ही कडवी तर अप्रतिम! कविता खूप आवडली. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

क्रान्ति 14/04/2009 - 14:07
सुन्दर कल्पना. शेवटची दोन्ही कडवी तर अप्रतिम! कविता खूप आवडली. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com