उद्या १६ एप्रिल. विदर्भात आणि इतरत्रही बर्याच मतदारसंघांत लोकसभेच्या निवडणुका आहेत. लोकशाहीमुळे जनतेला जे अधिकार मिळालेले आहेत, आणि जी कर्तव्ये हा महान देश उभा ठेवण्यासाठी जनतेला पार पाडावी लागतात, त्यातला "मतदान" हा अधिकार आणि कर्तव्य आहे.
परंतु, निवडणूक आयोग, हा हिटलरच्या बापाचा अवतार आहे. टी एन शेषन पासून लोकशाहीवर गदा आणण्याचे काम निवडणूक आयोगाने केला आहे. लोकशाहीत, कुठलेही कायदे अस्तित्वात नसताना, निवडणूक आयोग दरवेळी आपली मनमानी करीत असतो.