Skip to main content

मतदान करा आणि राष्ट्रीय पक्षालाच करा !

लेखक मैत्र यांनी मंगळवार, 21/04/2009 07:24 या दिवशी प्रकाशित केले.
बहुतेक ठिकाणी २३ तारखेला मतदान आहे. इतरत्र ज्या तारखा जाहीर झाल्या असतील त्या तारखांप्रमाणे मतदान कराच. अजूनही देशात ५० - ६० % वर मतदान होत नाही. असंख्य वेळा चर्चा करून, वाचून, आवाहने करून सुद्धा सुशिक्षित विचारी मतदार मतदान करण्याचे कष्ट घेत नाही. सुटी म्हणजे निवांत पिक्चर बघणे, जवळपास पिकनिकला जाणे, मित्रांबरोबर पार्टी करणे असे बेत होतात. हेच लोक चर्चा करण्यात, नावे ठेवण्यात आणि ' काय अर्थ नाही हो राजकारणात, सगळे सारखेच!' हे म्हणण्यात आघाडीवर असतात. म्हणून कळकळीची विनंती - मतदान करा! दुसरा महत्त्वाचा मुद्दा.

आमचंबी कॉकटेल!!!

लेखक पिवळा डांबिस यांनी मंगळवार, 21/04/2009 06:25 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांपासून आपल्या सर्वांचे लाडके मिपाकर श्री. नाटक्या हे इथे विविध कॉकटेल्सची (अगदी मनमोहक फोटोंसकट!!) माहिती देत आहेत.... आणि थोड्याच दिवसांपूर्वी एक नाटक्या बेसनलाडूनी (गरज वाटल्यास स्वल्पविराम घालावेत!:)) उत्तर कॅलिफोर्नियात केलेल्या कॉकटेल पार्टीचा सविस्तर वृत्तांतही आपण वाचला..... तो वृत्तांत वाचून डांबिसकाका अस्वस्थ झाले आणि त्यांनी गर्जना केली, "अरे सदर्न कॅलिफोर्नियावाल्यांनो! बघा ती उत्तरेची भय्या (म्हणजे भाऊ हो!) मंडळी किती धमाल करून र्‍हायली!!

या फळाविषयी माहिती हवी आहे

लेखक ठकू यांनी मंगळवार, 21/04/2009 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
Monkey Fruit या फळाला मंकीफ्रूट असे म्हणतात व औषध म्हणून याचा उपयोग होतो इतकीच माहिती मिळाली. पण कोणत्या आजारावर औषध्,हे मात्र कळू शकले नाही. विकिदादागुगलकाकांकडे याची माहिती उपलब्ध नाही. कुणी या फळाचे योग्य नाव व इतर माहिती देऊ शकेल काय?

((बेत आहे..!))

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 20/04/2009 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
उपटसुंभाचे 'बेत' वाचून आम्हालाही पूर्वीचे बेत आठवले, काही आमचे आणि काही दुसर्‍यांचे...;) आज थोडीशी टकीला चाखण्याचा बेत आहे. आज थोडे टुन्न होउन लुढकण्याचा बेत आहे. भेटणे मजला पुन्हा ती टाळते नाक्यावरी का मज कळेना योग हा की कटवण्याचा बेत आहे. अंगणी माझ्या कशाला बायकांनी फेर धरला खेळ चैत्री चालले की चोपण्याचा बेत आहे! टाकली पोटात जेव्हा मी जराशी जास्त फेणी कोण वदले, आज टकुरे सडकण्याचा बेत आहे? रातचा गाठून कविला समज आपण नीट देऊ का असा पाडीत गजला राहण्याचा बेत आहे?

कृष्णस्वामिनी..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 20/04/2009 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
राजपुताना जन्म तिचा, मेवाडची महाराणी होती भातुकलीच्या खेळामध्ये श्रीकृष्णाची रमणी होती.. दिन सरले ऋतू सरले, खेळ ना तो संपला कधी गोविंदाच्या लीला मध्ये रमलेली ती तरूणी होती.. गीत तयाचे, नाव तयाचे, तन-मन अन रूप तयाचे संसाराच्या वेशीवरती, कृष्णमयी ती गृहिणी होती.. कुणी म्हणे तिज व्यभिचारी, कुणी म्हणे तिज बेताला कृष्णभक्तीचा नाद ल्यायली, ती वेडी तपस्विनी होती मधु म्हणूनी विष प्यायली, सर्पमाला ती ल्यायली कृष्णप्रेमा चिंब नाहली, ती अभिसारिणी होती.. सभोवताली अत्याचारी, मोह-माया पाश सारे अंध:कारी जगतामध्ये, लखलखती दामिनी होती 'पौरूष एकच, तो मुरलीधर, अन्य गोपिका....' ती सांगे रायदासी शिष्योत्तमा
Taxonomy upgrade extras

अभिनंदन

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 20/04/2009 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
घमघमणा-या अत्तरकुपीत बंद फुलांचं स्पंदन असतं उगाळण्यानं गंधाळायला दु:ख कधी का चंदन असतं? पंचम लावून कोकिळ गातो सुरेल मंजुळ वसंतगाणी कधी भासते प्रेमगीत ते, कधी भासते आर्त विराणी मनीमानसी सुखदु:खाचं अखंड सागरमंथन असतं दिवसरात्र या खुळ्या मनाची भिरभिर वा-यावरची वरात कधी, कुठं ते हरवुन जाईल, धडधड अन् काहूर उरात भीती कसली?

( बेत आहे..! )

लेखक मराठमोळा यांनी सोमवार, 20/04/2009 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा आज वेगळे भजन गाण्याचा बेत आहे. स्टँड नव्हे स्टेशनवर भीक मागण्याचा बेत आहे. भेटता मजला दानशुर नव्या वळणावरी ह्या आज दोन्ही पायाने लंगडा होण्याचा बेत आहे. संगे माझ्या कशाला इतर भिकार्‍यांनी फेर धरला ही त्यांची चाल की हा जागेच्या भांडणाचा बेत आहे. टाकली कटोर्‍यात जेव्हा लोकांनी जराशी जास्त नाणी देव वदला, आज तुला पिझ्झा देण्याचा बेत आहे. तु भेटलीस पुलाखाली की दोघे वडापाव खाऊ की तुझा आज चायनीज खाण्याचा बेत आहे. रोजच्यासम आज पोलिसा मी लाठी खाणार नाही आज माझाही जरासा आराम करण्याचा बेत आहे. आपला, मराठमोळा
Taxonomy upgrade extras