Skip to main content

मुक्तक

चन्द्रशेखर गोखले यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
एक सरप्राइझ आहे .. ओळख मी प्रश्नांकित गप्प.. तू बाबा अन् मी आई होणार ती आरक्त लाजून म्हणाली.. मी रोमांचित तिला खसकन जवळ ओढली.. अरे हळू.. ती जराशी दूर झाली.. बघता बघता ती आई झाली.. ती बाळासाठी वेडीपिशी मी उसासे टाकीत होतो घेउनी ऊशी.. मात्र एकदा संयम सुटतो खसकन तिला जवळ ओढतो.. स्शू ...हळू बाळ उठेल ना.. दूर सरकुन ती वदली.. कधी मोठा होणारेस जरा संयम पाळ तू आता बाबा झालैस.. लडीवाळ पणे ती पुन्हा म्हणाली.. मी हिरमुसतो खट्टू होतो डोक्यावरती उशी घुऊन कूस बदलतो .......... रागावलास...? मला बिलगुन ती म्हणाली .... दांडगाई नाही हं मात्र जरा सावकाश.. असे बोलुन कुशीत शिरली मी उत्तेजीत तीही फुलली अन इतक्यात बाळ रडते बघ तरी सांगत होते ऐकलं नाहेस ती सावरते दिवा लावते अन बाळाला जवळ घेते.. पुन्हा उसासे.. झोप हिला जवळ घेउन उशी फेकुन अंगावरती ती सांगते खुदुखुदु हासते.. मी खजील मनात म्हणतो तीला बरे हे लगेच जमते.. ...... दिवा विझवितो मीही विझतो अन तिघेही बिलगुन गाढ झोपतो...
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by अवलिया

>>>जबरा ! -दिलीप बिरुटे
27/09/2010 - 20:39 Permalink