मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मतदान करा आणि राष्ट्रीय पक्षालाच करा !

मैत्र · · काथ्याकूट
बहुतेक ठिकाणी २३ तारखेला मतदान आहे. इतरत्र ज्या तारखा जाहीर झाल्या असतील त्या तारखांप्रमाणे मतदान कराच. अजूनही देशात ५० - ६० % वर मतदान होत नाही. असंख्य वेळा चर्चा करून, वाचून, आवाहने करून सुद्धा सुशिक्षित विचारी मतदार मतदान करण्याचे कष्ट घेत नाही. सुटी म्हणजे निवांत पिक्चर बघणे, जवळपास पिकनिकला जाणे, मित्रांबरोबर पार्टी करणे असे बेत होतात. हेच लोक चर्चा करण्यात, नावे ठेवण्यात आणि ' काय अर्थ नाही हो राजकारणात, सगळे सारखेच!' हे म्हणण्यात आघाडीवर असतात. म्हणून कळकळीची विनंती - मतदान करा! दुसरा महत्त्वाचा मुद्दा. आपल्या मताप्रमाणे / इच्छेप्रमाणे काँग्रेस किंवा भाजपलाच मतदान करा! आर्थिक परिस्थिती आणि सुरक्षितता याचा विचार करता आत्ता देशाला इतर कशाही पेक्षा स्थिर सरकारची गरज आहे! स्थानिक प्रश्न हळूहळू सुटू शकतील. पण राष्ट्रीय पातळीवरचं अराजक अतिशय घातक ठरेल. सद्यस्थिती पाहता त्याची शक्यता जास्त आहे! ते टाळलेच पाहिजे यासाठी या दोन पैकी एका पक्षाला मतदान करा. जिथे यांचे परंपरागत साथीदार आहेत जसे शिवसेना / राष्ट्रवादी त्यांना मतदान करा. पण बसपा / सपा / प्रजाराज्यम / कम्युनिस्ट / अपक्ष अशा कुठल्याही पक्षाला नको. जर तुमचं मत काँग्रेस किंवा भाजपला असेल पण तुमच्या मतदारसंघात असलेला त्यांचा उमेदवार तुम्हाला योग्य वाटत नसेल तरीही शक्यतोवर तिसर्‍या पक्षाला मत देऊ नका ही विनंती! तुमचं मत बहुमोल आहे. त्याचा देशहितासाठी उपयोग करा!!

वाचन 35212 प्रतिक्रिया 0