Skip to main content

डबके..

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी गुरुवार, 30/04/2009 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
माळावर पडलो डबके होऊन आहे अन् मी असाचं राहीन मंजूर मजला हे विश्व थिटे लखलाभ तुम्हा ते सागरगोटे प्यार मजला माझा चिख्खल तळातील ती ओली दलदल ते म्हशींचे मजेत डुंबणे डुकरांचे अन् सुखनैव लोळणे बगळ्यांचे ते ध्यानबहाणे हळुच गटकन बेडुक गिळणे हिंस्र श्वापदे रात्री येती पिऊनी जलं हे तहान मिटविती कशास तोडू मी माझी बंधने नकोच मजला सागर होणे नदी नाले अन् सागर डबके सृष्टीला तर सगळेच सारखे माणूसच करतो असले भेद कुणी काळा तर कुणी सफेद

(खालीबसा पट्कन)

लेखक आंबोळी यांनी गुरुवार, 30/04/2009 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
गुरूवर्यांवर चालून आलेला शाहिस्तेखान बघून आम्हाला राहवलं नाही ठार मी झालो खरा... खालीबसा पट्कन आला केश्यामिल्याचा हिरा... खालीबसा पट्कन म्हणे शक्ती , नाच, डॉन,द्रोण घालून आणू कवितेचा झरा... खालीबसा पट्कन ब्लॅक दीवार खाकी करून , फुलवीन कवितेच मोगरा... खालीबसा पट्कन आले मिल्या, केसु ,रंगा आणि खोडसाळ घ्या टेबलाचा आसरा... खालीबसा पट्कन तोल ना सांभाळता आला कुली मधे तो बसेल तुम्हालाही ठोसा... खालीबसा पट्कन लिहीतील चीजा, म्हणतील बच्चन कवितेमध्ये वापरा... खालीबसा पट्कन स्क्रीन वर येताच असल्या कविता , शोधा कोपरा अन कोपरा...
Taxonomy upgrade extras

कवितेचे गाव

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 30/04/2009 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
ऑरकुट वर आम्हा कविचि एक कवितेचे गाव नावाचि कम्युनिटी आहे..ज्याचे साधारण १८५ सभासद आहेत..या कम्युनिटी तर्फे खास ब्रेल लिपितुन अंध मुलांसाठी कविता संग्रह व सी.डी चे प्रकाशन दिनांक ३ मे रोजि होणार आहे..

प्रश्न नव्हे उत्सुकता: आपण खाणावळीच्या डब्यांमधे आणि बाजारू टायरच्या दुकानांत काय पहातो?

लेखक टारझन यांनी गुरुवार, 30/04/2009 03:17 या दिवशी प्रकाशित केले.
हेडर : येथे जमलेल्या माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो .. काकांनो आणि काकुंनो, नानांनो (नानी नाहियेत आल्या आजुन ..आणि काही चान्स पण दिसत नाही.. त्यामुळे गाळतो ही जागा) तात्यांनो आणि उरलेल्या सर्व गबाळ्यांनो .. आज मी तुम्हाला ह्या कुटाकुटीतुन एक नविन विचार करायला लावणारा आणि कौल, जो न देखे रवी, संपादकिय, kala dalan याच्या पलीकडे गेलेला एक महान कुटाकुट लेख सांगणार आहे , तर तो तुम्ही शांत चित्ताने ( बाकीचं ब्राऊझिंग जरावेळ बंद करून ) वाचावा एवढीच इच्छा व्यक्त करून मी लेख लिहायला सुरूवात करतो .

अभिषेक बच्चन

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 30/04/2009 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
शाहिस्तेखानाने दिलेले उघड आव्हान बघून आम्हाला राहवलं नाही अभिषेक बच्चन आणि त्याच्या करोडो (? ) पंख्यांना समर्पित.... स्टार हा झाला खरा... अभिषेक बच्चन अमितजींचा हा हिरा... अभिषेक बच्चन नाच, दस, दिल्ली सहा, उमराव नि द्रोण करमणूकीचा झरा?... अभिषेक बच्चन धुम, गुरू, सरकार, दोस्ताना अन युवा यात थोडा हा बरा... अभिषेक बच्चन चोपडा, रामू, मणी आणिक करण जोहर हेच याचा आसरा... अभिषेक बच्चन रोल नात्यांचा मुळे प्रत्येक मिळतो ऍश याचा कासरा...

विंदा करंदीकरांची बालकविता - एक रसग्रहण

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 30/04/2009 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
विंदा करंदीकरांची बालकविता - एक रसग्रहण
विंदा करंदीकरांनी आधुनिक मराठी कवितेवर छाप पाडली आहे. विसाव्या शतकातले बदल समाजाला भरडत होते, तसे समाजाला नवी संधी सुद्धा देत होते. यातील काही विषण्ण, काही स्फूर्तीदायक, काही वैचारिक अशी काव्ये आपण वाचलेलीच आहेत. आता आपण त्यांच्या बालकवितांबद्दल थोडी चर्चा करूया. या काळातल्या कवींनी मराठीतील प्रौढासाठीच्या कवितांनाही एक वेगळा आकारही दिला. मराठीची नैसर्गिक आघातांची जी लय आहे, प्राचीन वृत्तांऐवजी त्या लयीत विंदा करंदीकरांनी रचना केली.

अंधार चांदण्यांचा

लेखक आनंदयात्री यांनी गुरुवार, 30/04/2009 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तररात्रीनंतर किंवा पहाटेच्या आधी पोर्णिमेचा सुरेख गोलाकार चंद्र पश्चिम क्षितिजावर त्याचे अस्तित्व टिकवायला झगडत असावा. आकाशाच्या छातीवर चित्रविचित्र आकार गोंदणारे गुढ तारकासमुह फिकट पडुन लुप्त होण्याची भिती बाळगुन असावेत, वाराही साफ पडलेला असावा. दिवसाला दिवस जोडणारा दुवा मी असाच उघड्या कोरड्या डोळ्यांनी संपवत आणलेला असावा. अन आता ते चंद्राचे पश्चिम क्षितिजावर बुडणे असह्य होत जावे... उघड्या डोळ्यांनी सुरु व्हावा एक स्वप्नमयी भास .. कुठल्याश्या गर्द झाडीत बुडालेल्या दोन डोंगरांच्या दरीत असलेली नदी आणी तिच्या किनार्‍यावर कोरलेली लेणी.

फिनिक्ससाठी मराठी शब्द सुचवता येईल?

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 29/04/2009 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
फिनिक्स हा आपल्याच राखेतून जन्माला येणारा पक्षी आहे, असं ऐकलं आहे. मला फिनिक्स या शब्दासाठी मराठी प्रतिशब्द हवा आहे. मला सुचलेले काही शब्द इथे देतेय, ते योग्य आहेत का, हेही सुचवावं. मला सुचलेले शब्द :- अग्निपाखी, अंगारपक्षी, भस्मजन्मा. आणखी नव्या शब्दांचं स्वागत आहे.

नवी मराठी अक्षरमुद्रा- अक्षरयोगिनी

लेखक अजय भागवत यांनी बुधवार, 29/04/2009 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
माझे स्नेही श्री. रवि पांडे ह्यांनी नुकतीच एक नवी मराठी अक्षरमुद्रा विकसित केली आहे. ह्या अक्षरमुद्रेला त्यांनी सुंदरसे नाव दिले आहे- अक्षरयोगिनी. त्यांचा विरोप पत्ता- 'panravi@yahoo.com' ही अक्षरमुद्रा तुम्हाला खालील दुव्यावरुन उतरवून घेता येईल. http://aksharyogini.sudhanwa.com/aksharyogini.html